TRENDING:

Rohit Sharma Fitness Plan : ब्रोन्को टेस्टसाठी रोहित शर्माने कमी केलं तब्बल 20 किलो वजन, पाहा कसा होता हिटमॅनचा Diet Plan?

Last Updated:

Rohit Sharma Diet Plan : टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माचा डाएट प्लॅन समोर आला आहे. रोहित शर्माने तातडीने 20 किलो वजन कसं कमी केलं? याची सविस्तर माहिती जाणून घ्या.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Rohit Sharma Fitness Plan : टीम इंडियाचा वनडे कॅप्टन रोहित शर्मा सध्या कुटुंबासोबत वेळ घालवतोय. खेळाडूंच्या फिटनेससाठी बीसीसीआयने नवा प्रणाली आमलात आणली होती. त्याचं नाव ब्रोन्को टेस्ट... या टेस्टसाठी (Rohit Sharma Bronco test) रोहित शर्मा याने तब्बल 20 किलो वजन कमी केलं होतं. 17 दिवसात रोहित शर्माने नियमित व्यायाम आणि डाएटच्या आधारावर 20 किलो वजन कमी केलं आहे. अशातच आता मीडिया रिपोर्टनुसार, रोहित शर्माचा डाएट प्लॅन समोर आला आहे. रोहित शर्माने तातडीने 20 किलो वजन कसं कमी केलं? याची सविस्तर माहिती जाणून घ्या.
Rohit Sharma sheds 20 kg Weight for bronco test
Rohit Sharma sheds 20 kg Weight for bronco test
advertisement

फिटनेससाठी डाएट प्लॅन

रोहित शर्माचा डाएट प्लॅन हा त्याच्या फिटनेससाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याच्या डाएटची सुरुवात सकाळी ७:०० वाजता होते, त्यावेळी तो ६ भिजवलेले बदाम, अंकुरलेले सॅलड आणि ताज्या फळांचा रस पितो. सकाळी ९:३० वाजताच्या नाश्त्यामध्ये फळांसोबत ओटमील आणि एक ग्लास दूध घेतो, ज्यामुळे त्याला दिवसभरासाठी ऊर्जा मिळते.

advertisement

दुपारच्या जेवणात काय काय? 

दुपारच्या जेवणाआधी सकाळी ११:३० वाजता तो दही, चिल्ला आणि नारळपाणी घेतो. यामुळे शरीरातील पाण्याची पातळी चांगली राहते. दुपारी १:३० वाजताच्या जेवणात ताज्या भाज्या आणि वरण-भात यांचा समावेश असतो, जे संतुलित आहाराचे उत्तम उदाहरण आहे.

रात्री हलका पण पौष्टिक आहार 

संध्याकाळी ४:३० वाजता रोहित फ्रूट स्मूदी आणि ड्रायफ्रुट्स खातो, ज्यामुळे त्याला पुन्हा ताजेतवाने वाटते. रात्री ७:३० वाजताच्या जेवणात तो भाज्यांसोबत पनीर, पुलाव आणि भाज्यांचे सूप घेतो, जो एक हलका पण पौष्टिक आहार आहे. रात्री ९:३० वाजता एक ग्लास दूध आणि मिक्स्ड नट्स घेऊन तो आपला दिवसभराचा डाएट पूर्ण करतो. अशाप्रकारे, रोहित शर्माचा डाएट प्लॅन हा त्याच्या आरोग्याची आणि फिटनेसची काळजी घेणारा आहे.

advertisement

दरम्यान, रोहित शर्माने याआधी देखील आपलं वजन कमी करून दाखवलं होतं. आता तो पुन्हा फिट झालाय. अनेक नेटकरी रोहित शर्माला त्याच्या वजनावरून ट्रोल करत असतात. मात्र, रोहितने पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध केलंय.

मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
Rohit Sharma Fitness Plan : ब्रोन्को टेस्टसाठी रोहित शर्माने कमी केलं तब्बल 20 किलो वजन, पाहा कसा होता हिटमॅनचा Diet Plan?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल