वाराणसी : शुक्राला सुख आणि ऐश्वर्याचं प्रतीक मानलं जातं. नवग्रहांमध्ये शुक्राचं एक विशेष स्थान आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, ज्यांच्या कुंडलीत शुक्राची स्थिती मजबूत असते, त्यांच्यावर लक्ष्मी देवीची कृपा सदैव राहते आणि त्यांना कधीच धनसंपत्तीची कमी भासत नाही. आता हाच सुखकारक मानला जाणारा शुक्र ग्रह राशीपरिवर्तन करणार आहे.
काशीचे ज्योतिषी स्वामी कन्हैया महाराज यांनी सांगितलं की, 18 जानेवारी 2024 रोजी शुक्र वृश्चिक राशीतून धनू राशीत प्रवेश करेल. 12 फेब्रुवारीपर्यंत शुक्राचा मुक्काम याच राशीत असेल. त्यानंतर शुक्र मकर राशीत जाईल. दरम्यान, शुक्राच्या या राशीबदलाचा सर्व 12 राशींवर परिणाम होईल, परंतु 3 राशींसाठी हा काळ अगदी सुवर्ण असेल. त्या राशी नेमक्या कोणत्या, पाहूया.
advertisement
500 वर्षांनी आला योग, 'या' राशींचं नशीब १०० टक्के उघडणार! आता सुख येणार
'या' राशींचं उजळणार नशीब
मेष : आपल्यासाठी 24 दिवसांचा काळ अत्यंत शुभ असेल. नोकरी आणि व्यवसायात नव्या संधी मिळतील. आर्थिक समस्या दूर होतील आणि मानसिक शांततादेखील मिळेल. शिवाय कुटुंबात आनंदाचं वातावरण असेल.
सूर्याचा उत्तरायण सुरू, आता शुभ कार्य होतील; तुमच्या राशीला हा काळ धोक्याचा नाही ना?
मिथुन : आपल्याला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. आपल्याला एखाद्या मित्राची किंवा ओळखीच्या व्यक्तीची मदत मिळेल, ज्यामुळे करियरमध्ये प्रगती होईल. व्यावसायिकांसाठीदेखील हा काळ अत्यंत शुभ आहे.
कन्या : आपल्याला कार्यक्षेत्रात आनंदाची बातमी मिळू शकते. नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. शिवाय व्यवसाय सुरू करायचा असल्यास त्यातही यश मिळेल. कुटुंबीय आणि जोडीदारासह आनंदाचे क्षण घालवाल.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)