TRENDING:

Farmers Success Story: पारंपरिक शेतीला फाटा, शेतकऱ्यानं पिकवलं फायद्याचं पीक, कमाई 50 लाख!

Last Updated:
मराठवाड्यातील शेतकरी पारंपरिक शेतीला फाटा देत फळशेतीकडे वळत आहेत. छत्रपती संभाजीनगरमधील लाडसावंगी येथील शेतकरी बाबासाहेब पडूळ हे गेल्या 14 वर्षांपासून फायद्याची शेती करत आहेत.
advertisement
1/7
पारंपरिक शेतीला फाटा, शेतकऱ्यानं पिकवलं फायद्याचं पीक, कमाई 50 लाख!
गेल्या काही काळात मराठवाड्यातील शेतकरी पारंपरिक शेतीला फाटा देत फळशेतीकडे वळत आहेत. छत्रपती संभाजीनगरमधील लाडसावंगी येथील शेतकरी बाबासाहेब पडूळ हे गेल्या 14 वर्षांपासून डाळिंब शेती करत आहेत.
advertisement
2/7
300 झाडांपासून सुरू केलेली डाळिंब शेती आता 1800 झाडांवर गेली असून गतवर्षी तब्बल 28 लाखांचं उत्पन्न निघालं. तर यंदा दर चांगला असून 50 लाखांवर उत्पन्न जाईल, असे उद्यम पंडित पुरस्कार विजेते शेतकरी बाबासाहेब यांनी लोकल18 सोबत बोलताना सांगितले.
advertisement
3/7
शेतकरी बाबासाहेब पडूळ सांगतात की, “सुरुवातीला पारंपारिक शेतीतून परिवाराचा उदरनिर्वाह भागवत असे. पण ही शेती परवडत नव्हती. तेव्हा अधिक उत्पन्न मिळावे यासाठी डाळिंब शेतीचा पर्याय निवडला. त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रीय फलोत्पादन योजनेचा लाभ मिळाला.
advertisement
4/7
या योजनेतून 14 वर्षांपूर्वी 300 डाळिंब झाडांची लागवड केली. आता 8 एकर क्षेत्रात डाळिंबाची 1800 झाडे आहेत. यातून गरवर्षी 28 लाख रुपयांचं उत्पन्न मिळालं. तर यंदा 50 लाखांपर्यंत उत्पन्न जाण्याचा अंदाज आहे.”
advertisement
5/7
“डाळिंब शेती करताना अनेक अडचणी निर्माण होतात. फळबागेवर रोगराई पसरण्याचं संकट कायम असतं. डाळिंब या फळावर तेल्या आणि प्लेग रोगाचा प्रादुर्भाव दरवर्षी होत असतो. मात्र आपण यावर नियंत्रण मिळवण्यासाठी न्युट्रेशन लेवल केले तर तेल्या आणि प्लेग रोगाला हरवू शकतो. त्यामुळे बिकट परिस्थितीत देखील फळबाग फायदेशीर ठरू शकते,” असेही पडूळ सांगतात.
advertisement
6/7
डाळिंब बागेत पैसा मिळू शकतो. त्यासाठी शेती करण्याच्या अगोदर सर्व औषधांची माहिती असणे आवश्यक आहे. तसेच योग्य नियोजन करण्याची गरज असते. मातीचे आणि झाडांचे परिक्षण करून किंवा त्जज्ञांचे मार्गदर्शन घेऊन डाळिंब शेती करायला पाहिजे.
advertisement
7/7
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि रोगराईवर नियंत्रण मिळवणे या बाबी डाळिंब शेतीसाठी महत्त्वाच्या ठरतात. तरुण शेतकऱ्यांनी ऑरगॅनिक शेतीकडे वळले पाहिजे. दुसरीकडे कमी पैशात काम करण्यापेक्षा शेतीत मन लावून आणि नियोजनानुसार काम केलं तर 2 एकर शेतीत महिन्याकाठी 50 हजार रुपयांचे उत्पन्न निघू शकते, असे देखील पडूळ यांनी सांगितले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कृषी/
Farmers Success Story: पारंपरिक शेतीला फाटा, शेतकऱ्यानं पिकवलं फायद्याचं पीक, कमाई 50 लाख!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल