Success Story : शिक्षण घेतांनी शेतीकडे लक्ष, गोविंदने केली गुलाब लागवड, वर्षाला 7 लाख कमाई
- Published by:Mohan Najan
- Reported by:Prashant Pawar
Last Updated:
बीएससी नर्सिंगचे शिक्षण घेत असतानाच त्यांनी शेतीकडे लक्ष केंद्रित केले आणि आधुनिक शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला. शिक्षण आणि शेती या दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळत गोविंद यांनी गुलाब लागवडीचा प्रयोग सुरू केला.
advertisement
1/7

बीड जिल्ह्यातील टालेवाडी या छोट्याशा गावातील गोविंद चव्हाण हे युवक आज तरुण शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण ठरत आहेत. बीएससी नर्सिंगचे शिक्षण घेत असतानाच त्यांनी शेतीकडे लक्ष केंद्रित केले आणि आधुनिक शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला. शिक्षण आणि शेती या दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळत गोविंद यांनी गुलाब लागवडीचा प्रयोग सुरू केला. सुरुवातीला त्यांनी केवळ अर्ध्या एकर क्षेत्रात गुलाब लागवड केली, मात्र पहिल्याच वर्षी त्यांना चांगले उत्पन्न मिळाल्याने त्यांनी या शेतीचा विस्तार करत एक एकर क्षेत्रात गुलाब उत्पादन सुरू केले.
advertisement
2/7
गोविंद चव्हाण यांची एकूण शेती दोन एकर क्षेत्रावर पसरलेली आहे. त्यापैकी एक एकर गुलाब लागवडीसाठी आणि दुसरे एक एकर पारंपरिक पिकांसाठी राखीव आहे. त्यांनी गुलाब शेतीमध्ये ठिबक सिंचन तंत्राचा अवलंब केला आहे, ज्यामुळे पाण्याची बचत होते आणि झाडांना योग्य प्रमाणात पोषण मिळते.
advertisement
3/7
तसेच सेंद्रिय खतांचा वापर करून त्यांनी उत्पादनाची गुणवत्ता टिकवून ठेवली आहे. गुलाब फुलांना बाजारात चांगली मागणी असल्याने त्यांना वर्षभर विक्रीसाठी स्थिर बाजारपेठ मिळते.
advertisement
4/7
गेल्या दोन वर्षांपासून गोविंद सातत्याने गुलाब शेतीतून भरघोस उत्पन्न घेत आहेत. स्थानिक बाजारपेठेबरोबरच आसपासच्या शहरांमधून देखील व्यापारी त्यांच्या गुलाबांची मागणी करतात. मंदिरे, हॉटेल, पूजाविधी, तसेच लग्नसमारंभ यांसाठी गुलाबांची मोठी खप आहे. या मागणीमुळे त्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य भाव मिळतो. परिणामी, त्यांना वर्षाकाठी सहा ते सात लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळतो, जो पारंपरिक पिकांच्या तुलनेत दुपटीने अधिक आहे.
advertisement
5/7
गोविंद चव्हाण यांनी शेतीमध्ये नियोजनबद्धता आणि बाजारपेठेचे ज्ञान या दोन गोष्टींवर विशेष भर दिला आहे. गुलाब लागवड करताना योग्य जातींची निवड, वेळेवर छाटणी, सिंचन आणि खत व्यवस्थापन या सर्व गोष्टींचा त्यांनी काटेकोर अभ्यास केला. त्यांच्या मेहनतीमुळे आणि दूरदृष्टीमुळे त्यांची गुलाब शेती आज परिसरात आदर्श मानली जाते.
advertisement
6/7
गोविंद चव्हाण यांचा हा उपक्रम ग्रामीण भागातील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. शिक्षण घेत असतानाच शेतीला व्यावसायिक स्वरूप देऊन त्यांनी यश मिळवले आहे.
advertisement
7/7
कमी क्षेत्रात अधिक नफा मिळवायचा असेल तर गुलाब शेतीसारखी फुले उत्पादक शेती फायदेशीर ठरू शकते, असे गोविंद यांचे म्हणणे आहे. त्यांची मेहनत, नियोजन आणि आधुनिक दृष्टिकोन यामुळे ते आज बीड जिल्ह्यातील यशस्वी तरुण शेतकऱ्यांपैकी एक ठरले आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कृषी/
Success Story : शिक्षण घेतांनी शेतीकडे लक्ष, गोविंदने केली गुलाब लागवड, वर्षाला 7 लाख कमाई