TRENDING:

शेतकऱ्यांना PM Kisan चा २१ वा हप्ता मिळवण्यासाठी या गोष्टी बंधनकारक

Last Updated:
PM-Kisan 21st Installment: देशभरातील शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या २१ व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
advertisement
1/5
शेतकऱ्यांना PM Kisan चा २१ वा हप्ता मिळवण्यासाठी या गोष्टी बंधनकारक
देशभरातील शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या २१ व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. दर चार महिन्यांनी मिळणाऱ्या २ हजार रुपयांच्या सहाय्यक रकमेचा हा हप्ता नेमका कधी जमा होणार, याबाबत शेतकऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता आणि चर्चा सुरू आहे.
advertisement
2/5
केंद्र सरकारकडून अद्याप या हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही, मात्र काही राज्यांतील नैसर्गिक आपत्ती लक्षात घेऊन केंद्राने काही ठिकाणी आगाऊ मदत जाहीर केली आहे. विशेषतः पंजाब, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये आलेल्या महापुरामुळे शेतमालाचे आणि शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने या तीन राज्यांतील सुमारे २७ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी २ हजार रुपयांचा हप्ता आधीच जमा केला आहे.
advertisement
3/5
या निर्णयानंतर महाराष्ट्रातील शेतकरी वर्गामध्येही केंद्र सरकारकडून तत्काळ मदतीची अपेक्षा निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात काही ठिकाणी झालेल्या पूरस्थिती आणि आगामी दिवाळी उत्सवाचा विचार करता, केंद्र सरकार राज्यातील शेतकऱ्यांसाठी लवकर मदत जाहीर करेल अशी अपेक्षा सर्वत्र व्यक्त केली जात आहे.
advertisement
4/5
<strong>हप्ता मिळवण्यासाठी आवश्यक अटी - </strong>  पीएम किसान योजनेअंतर्गत पुढील हप्ता मिळवण्यासाठी ई-केवायसी (e-KYC) आणि आधार लिंकिंग अनिवार्य करण्यात आले आहे.ज्या शेतकऱ्यांनी अजून ई-केवायसी पूर्ण केलेले नाही, त्यांच्या खात्यात पुढील हप्ता जमा होणार नाही. बँक खाते आधारशी लिंक नसल्यास पैसे खात्यात पोहोचणार नाहीत.यामुळे शेतकऱ्यांना लवकरात लवकर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
advertisement
5/5
<strong>ई-केवायसी कशी करावी? - </strong> pmkisan.gov.in वर जा. “e-KYC” पर्याय निवडा. आपला आधार क्रमांक आणि कॅप्चा टाका. आलेला ओटीपी टाकून सबमिट करा. ऑफलाइन पद्धत (CSC केंद्र किंवा बँक): बायोमेट्रिक फिंगरप्रिंटद्वारे ई-केवायसी पूर्ण करता येईल. त्यासाठी आधार कार्ड, पत्ता पुरावा (वीज/पाणी बिल) आणि बँक पासबुकची प्रत आवश्यक आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कृषी/
शेतकऱ्यांना PM Kisan चा २१ वा हप्ता मिळवण्यासाठी या गोष्टी बंधनकारक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल