Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल, 24 तास पावसाचे, या जिल्ह्याला पुन्हा अलर्ट!
- Reported by:Priti Nikam
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. ऑक्टोबरच्या सुरुवातीला पावसाने उघडीप दिली असली तरी एका जिल्ह्याला यलो अलर्ट कायम आहे.
advertisement
1/7

ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. आज 4 ऑक्टोबर रोजी विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे हवामान विभागाने 15 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. उर्वरित राज्यात तुरळक हलक्या सरींचा अंदाज आहे. पश्चिम महाराष्ट्रातील शनिवारचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
2/7
पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर परिसरात शुक्रवारी पावसाची उघडीप राहिली. यावेळी 31.2 अंश सेल्सिअस कमाल तापमान राहिले. आज पुणे जिल्ह्यासह घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी ढगाळ आकाशासह हलक्या पावसाची शक्‍यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
advertisement
3/7
गेल्या 24 तासात सातारा जिल्ह्यातील कमाल तापमान 28.7 अंश सेल्सिअस इतके राहीले. यावेळी 0.5 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आज संपूर्ण साताऱ्यासह सातारा घाटमाथ्यावर ढगाळ आकाशासह एक दोन वेळा गडगडाटी पावसाची शक्‍यता आहे.
advertisement
4/7
कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारी 1 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आज कोल्हापूर जिल्ह्यात कमाल तापमान 29.2 अंशावर राहिल. पुढील 24 तासात कोल्हापूरसह घाटमाथ्यावर ढगाळ आकाशासह मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
advertisement
5/7
सोलापूर जिल्ह्यात मागील 24 तासात पावसाची उघडीप राहिली. 3 ऑक्टोबर रोजी सोलापूरमध्ये 32.1 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. आज हवामान विभागाने सोलापूर जिल्ह्यासाठी विजांसह पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. त्यामुळे सोलापूरकरांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.
advertisement
6/7
सांगली जिल्ह्यात मागील 24 तासात 0.9 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यावेळी कमाल तापमान 30.3 अंश सेल्सिअस इतके राहिले. पुढील 24 तासात जिल्ह्यात अंशत: ढगाळ आकाशासह एक दोन वेळा गडगडाटासह पावसाची शक्यता आयएमडीने व्यक्त केली आहे.
advertisement
7/7
पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. आज शनिवारी विजांसह पावसाचा यलो अलर्ट असल्याने नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल. मात्र, रविवारपासून पुन्हा हवामानात मोठे बदल जाणवणार असून पुणे, सोलापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यांत पुढील काही दिवस पावसाची उघडीप राहील.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल, 24 तास पावसाचे, या जिल्ह्याला पुन्हा अलर्ट!