TRENDING:

Poultry Farming: कडकनाथ सोडा, गावरान कोंबडी देतेय सोन्याची अंडी, पुण्याचा शेतकरी मालामाल!

Last Updated:
Poultry Farming: सध्या काही शेतकरी शेतीपुरक व्यवसायातून चांगले उत्पन्न घेत आहेत. पुण्यातील एका शेतकरी गावरान कोंबडी पालनातून लाखोंची कमाई करतोय.
advertisement
1/7
कडकनाथ सोडा, गावरान कोंबडी देतेय सोन्याची अंडी, पुण्याचा शेतकरी मालामाल!
भारतात शेतीसोबत जोडधंदा म्हणून पशुपालन आणि कुक्कुटपालन पूर्वापार केलं जातंय. पुण्यातील एका युवा शेतकऱ्यानं देशी कुक्कुटपालनातून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. मावळ तालुक्यातील चांदखेडचे सचिन इंगवले हे शेतकरी असून गावरान कोंबडी पालनातून महिन्याला 1 लाख रुपयांची कमाई करत आहेत.
advertisement
2/7
सचिन इंगवले हे पारंपरिक भात शेती करत होते. गोठ्यातील गाई आजारी पडू नयेत म्हणून कोंबड्या ठेवण्याची पद्धत जुन्या काळापासून आहे. त्यामुळे त्यांनी गाईंसोबत 2-3 गावरान कोंबड्या पाळल्या होत्या. परंतु, या कोंबड्यांमधून गाईंपेक्षा जास्त नफा मिळत आहे, हे त्यांच्या लक्षात आलं. तेव्हा त्यांनी पूर्णवेळ गावरान कुक्कुटपालन व्यवसायाकडे वळायचं ठरवलं.
advertisement
3/7
सचिन यांनी सुरूवात अवघ्या 6-7 कोंबड्यांपासून केली. कोरोना काळात लोक पुन्हा गावरान अंडी आणि कोंबडीचे मांस याकडे वळले. यामुळे बाजारात गावरान कोंबडीची मागणी झपाट्याने वाढली. हीच संधी पाहून इंगवले यांनी व्यवसाय वाढवला.
advertisement
4/7
कोंबड्यांचा व्यवसाय करताना सचिन यांचा भर नैसर्गिक संगोपनावर असतो. ते कोंबड्यांना मोकळ्या जागेत फिरू देतात. त्यांच्या आहारात भाजीपाला, शेतीतील टाकाऊ साहित्य, माशांचं वेस्टेज, उरलेलं अन्न, तसेच ओढ्यांमधून मिळणाऱ्या शंख-शिंपल्यांची पावडर यांचा समावेश करतात.
advertisement
5/7
कोंबड्यांना जे कॅल्शियम लागते ते शंख-शिंपल्यांच्या पावडरीतून मिळतं. माशांचं वेस्टेज आणि हॉटेलमधलं उरलेलं अन्न खाण्यामुळे त्यांचा पोषणमूल्यांचा समतोल राखला जातो आणि खर्चही कमी होतो, असं इंगवले सांगतात.
advertisement
6/7
गावरान कोंबडी टिकवण्यासाठी योग्य वेळी लसीकरण, औषधोपचार, स्वच्छता आणि आरोग्य व्यवस्थापन या गोष्टींचं ते काटेकोर पालन करतात. यामुळे आज त्यांच्या फार्मवर 2 हजार पेक्षा जास्त गावरान कोंबड्या आहेत. यातून त्यांची महिन्याकाठी 1 लाखांपर्यंत कमाई होतेय.
advertisement
7/7
गावरान कोंबडी पालन व्यवसायातून मिळालेल्या उत्पन्नातून सचिन इंगवले यांनी हिंजवडी भागात एक इमारत बांधली आहे. तसेच स्वतःची जमीनही खरेदी केली आहे. हे सर्व गावरान कुक्कुटपालन व्यवसायाच्या यशामुळे शक्य झालं आहे, असं सचिन सांगतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कृषी/
Poultry Farming: कडकनाथ सोडा, गावरान कोंबडी देतेय सोन्याची अंडी, पुण्याचा शेतकरी मालामाल!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल