Farmer Success Story : 4 वर्षांपासून शेतकरी करतोय फायद्याची शेती, 20 गुंठ्यात होतीय लाखात कमाई, असं काय केलं?
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
शेतकरी शिवसिंग सुंदर्डे यांनी 20 गुंठ्यांमध्ये कंटुले या रानभाजीची लागवड केली आहे. ते 4 वर्षांपासून कंटुलेची शेती करत आहेत.
advertisement
1/7

छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील नागोणीचीवाडी येथील शेतकरी शिवसिंग सुंदर्डे यांनी 20 गुंठ्यांमध्ये कंटुले या रानभाजीची लागवड केली आहे. ते 4 वर्षांपासून कंटुलेची शेती करत आहेत.
advertisement
2/7
कंटुले या रानभाजीच्या या शेतीतून आतापर्यंत 60 ते 70 हजार रुपयांचे उत्पन्न सुंदर्डे यांना मिळाले असून ऑक्टोबरपर्यंत 2 लाख रुपये उत्पन्न निघेल, असा अंदाज सुंदर्डे यांनी लोकल 18 सोबत बोलताना व्यक्त केला आहे.
advertisement
3/7
कंटुले ही आरोग्यासाठी महत्त्वाची मानली जाणारी रानभाजी आहे. या रानभाजीची लागवड 4 बाय 3 वर करण्यात आली आहे. एकूण 20 गुंठ्यांमध्ये 700 ते 800 झाडांची लागवड सुंदर्डे यांनी केली.
advertisement
4/7
या शेतीत 50 टक्के कंटुले रानभाजीचे नर काढून टाकावे लागतात. 10 टक्क्यांपर्यंत नर ठेवावे लागतात कारण कंटुल्याच्या 10 मादींच्या झाडांमागे 1 नर रानभाजीचा ठेवणे आवश्यक आहे, नर जास्त असल्यास उत्पन्नाला फटका बसतो.
advertisement
5/7
सर्वप्रथम नांगरट काढून शेतामध्ये रोटा करून, बेड करण्यात यावे. त्यानंतर सिंचन ठिबक अंथरावे, तसेच प्लास्टिकचा वापर करून मल्चिंग करावी.
advertisement
6/7
तसेच शेणखत टाकावे, कृषी विभागाने सुचविलेल्या औषधांची फवारणी आणि खताचा वापर करणे, कंटुले या भाजीवर कोणताही रोग येत नाही मात्र धुई येते त्यासाठी कीटकनाशकाचा वापर करणे गरजेचे आहे, असे देखील सुंदर्डे यांनी सांगितले आहे.
advertisement
7/7
कंटुलेची शेती भरपूर उत्पन्न देणारी असून मात्र त्यासाठी मेहनत आणि काळजी देखील घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. या पिकाचा साधारणपणे जून ते ऑक्टोबरपर्यंतचा कालावधी असतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कृषी/
Farmer Success Story : 4 वर्षांपासून शेतकरी करतोय फायद्याची शेती, 20 गुंठ्यात होतीय लाखात कमाई, असं काय केलं?