Beed Rain: बीडमध्ये मुंबईसारखा पाऊस, जिकडे तिकडे पाणीच पाणी, शेतीचं झालं तळं, 7 भयावह PHOTOS
- Reported by:Prashant Pawar
- Published by:Mohan Najan
Last Updated:
सलग झालेल्या पावसामुळे या शेतात पाणी साचून राहिल्याने पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
advertisement
1/7

बीड जिल्ह्यात पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील शेतकरी फातिम शेख यांच्या दोन एकर शेतात सोयाबीनची लागवड करण्यात आली होती. मात्र, सलग झालेल्या पावसामुळे या शेतात पाणी साचून राहिल्याने पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
advertisement
2/7
पाणी मुरून गेल्यानंतरही सोयाबीन मातीमध्येच दडपून गेले असून पिके पूर्णपणे नष्ट झाल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. सध्या पावसामुळे माजलगाव परिसरातील शेतकरी चिंतेत आहेत.
advertisement
3/7
पिकांच्या मुळाशी पाणी साचल्याने उत्पादन घेणे अशक्य होणार असल्याचे चित्र दिसत आहे. शेतकऱ्यांच्या मेहनतीवर अक्षरशः पाणी फिरल्याने शेतकरी हळूहळू आपली व्यथा व्यक्त करत आहेत.
advertisement
4/7
फातिम शेख यांच्यासारख्या अनेक शेतकऱ्यांना या पावसाने आर्थिक फटका बसला आहे. बीड जिल्ह्यातील केवळ माजलगावच नव्हे तर इतर भागांतही अतिवृष्टीचा फटका बसला आहे.
advertisement
5/7
सलग पावसामुळे शेतात पाणी अडून राहिले असून सोयाबीन, मूग, उडीद आणि कपाशी यांसारख्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतात उभे असलेले पीक आता पाण्यात गाडले गेले आहे.
advertisement
6/7
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, लागवडीसाठी घेतलेले कर्ज, बियाणे आणि मजुरीसाठी केलेला खर्च आता वाया गेला आहे. काही शेतकऱ्यांनी शेतीसाठी खासगी सावकारांकडून पैसे घेतले असल्याने त्यांची अडचण अधिकच वाढली आहे. परिस्थिती अशी आहे की, उत्पादन न मिळाल्यास पुढील हंगामाची तयारी करणेही कठीण होणार आहे.
advertisement
7/7
याबाबत शेतकरी प्रशासनाकडे मदतीची अपेक्षा बाळगत आहेत. पिकांची पाहणी करून तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य ती नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. पावसामुळे झालेले हे अतोनात नुकसान लवकरच भरून निघणे अशक्य असल्याचेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कृषी/
Beed Rain: बीडमध्ये मुंबईसारखा पाऊस, जिकडे तिकडे पाणीच पाणी, शेतीचं झालं तळं, 7 भयावह PHOTOS