TRENDING:

'धुरंधर' ब्लॉकबस्टर, पण रणवीर सिंग आला गोत्यात, 1000 कोटींची फिल्म देणाऱ्या अभिनेत्यावर FIR, प्रकरण काय?

Last Updated:
Ranveer Singh: रणवीर सिंगच्या धुरंधरने बॉक्स ऑफिसवर आग लावली आहे. मात्र, 1000 कोटींची फिल्म देणाऱ्या अभिनेत्यावर पोलीस कारवाईची टांगती तलवार आहे.
advertisement
1/7
रणवीर सिंग आला गोत्यात, 1000 कोटींची फिल्म देणाऱ्या अभिनेत्यावर FIR, प्रकरण काय?
बॉलीवूडचा 'मोस्ट एनर्जेटिक मॅन' रणवीर सिंग आपल्या सळसळत्या उत्साहासाठी ओळखला जातो, पण कधीकधी हाच उत्साह त्याच्या अंगलट येतो. गोव्यातील 'इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया' (IFFI) मध्ये रणवीरने केलेल्या एका कृत्यामुळे आता त्याच्यावर पोलीस कारवाईची टांगती तलवार आहे.
advertisement
2/7
दक्षिण कर्नाटकच्या पवित्र दैव परंपरेची थट्टा केल्याचा आरोप रणवीरवर ठेवण्यात आला असून, बेंगळुरूच्या हाय ग्राउंड्स पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध FIR दाखल करण्यात आला आहे.
advertisement
3/7
ही घटना २८ नोव्हेंबर २०२५ रोजी 'इफ्फी'च्या सांगता समारंभात घडली. मंचावर रणवीर सिंगसोबत 'कांतारा' फेम अभिनेता ऋषभ शेट्टी देखील उपस्थित होता. तक्रारदार प्रशांत मिथल यांच्या मते, रणवीरने मंचावर अत्यंत विचित्र पद्धतीने पंजुर्ली आणि गुलिगा दैवाच्या दैवी हावभावांची नक्कल केली. 'कांतारा' चित्रपटामुळे ही परंपरा जगभरात पोहोचली आहे, पण रणवीरने या पवित्र परंपरेचा अवमान केल्याचा दावा केला जात आहे.
advertisement
4/7
अॅडव्होकेट प्रशांत मिथल यांनी कोर्टात दाखल केलेल्या तक्रारीत रणवीरवर गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांनुसार, रणवीरने पवित्र 'चावुंडी दैवा'चा उल्लेख चक्क "फिमेल घोस्ट" असा केला. यावेळी 'कांतारा: चॅप्टर १' मधील चावुंडी दैवाचा एक भावनिक सीन रणवीरने करून दाखवला.
advertisement
5/7
विशेष म्हणजे, ऋषभ शेट्टीने त्याला असं न करण्याची विनंती केली होती, तरीही रणवीरने ते ऐकलं नाही. रणवीर एक प्रसिद्ध व्यक्ती असूनही त्याने आंतरराष्ट्रीय मंचावर हे कृत्य केलं, ज्यामुळे जगभरातील भाविकांच्या श्रद्धा दुखावल्या गेल्या.
advertisement
6/7
प्रशांत मिथल यांनी २ डिसेंबर रोजी हा व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिला आणि त्यानंतर त्यांनी कायदेशीर लढाई सुरू केली. बेंगळुरूच्या कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार, हाय ग्राउंड्स पोलिसांनी रणवीर सिंग विरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम १९६, २९९ आणि ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हे कायदे धार्मिक भावना दुखावणं आणि द्वेष पसरवण्याशी संबंधित आहेत.
advertisement
7/7
'दैव कोला' किंवा 'भूत कोला' ही दक्षिण कर्नाटकातील केवळ एक परंपरा नसून ती तिथल्या लोकांची अस्मिता आहे. कलाकारांनी अभिनयाच्या ओघात कोणत्याही धर्माच्या किंवा संस्कृतीच्या श्रद्धा पायदळी तुडवू नयेत, असा सूर सध्या सोशल मीडियावर उमटत आहे. आता या कायदेशीर कचाट्यातून रणवीर स्वतःला कसं सोडवतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'धुरंधर' ब्लॉकबस्टर, पण रणवीर सिंग आला गोत्यात, 1000 कोटींची फिल्म देणाऱ्या अभिनेत्यावर FIR, प्रकरण काय?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल