TRENDING:

IND vs NZ : आता संजूची गरज नाही, पर्याय मिळाला... टीम इंडिया बदलणार T20 वर्ल्ड कपची टॉप ऑर्डर!

Last Updated:
न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या टी-20 सामन्यामध्ये टीम इंडियाला पराभवाचा धक्का बसला, पण असं असलं तरी भारतीय टीमला टी-20 वर्ल्ड कपमध्ये संजू सॅमसनचा पर्यायी खेळाडू सापडला आहे.
advertisement
1/6
आता संजूची गरज नाही, पर्याय मिळाला... टीम इंडिया बदलणार वर्ल्ड कपची टॉप ऑर्डर
न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा धक्का बसला आहे. न्यूझीलंडने दिलेलं 216 रनचं आव्हान पार करताना टीम इंडियाची बॅटिंग गडगडली आहे, त्यामुळे टी-20 वर्ल्ड कपच्या तोंडावर भारताचं टेन्शन वाढलं आहे.
advertisement
2/6
टीम इंडियाचा ओपनर अभिषेक शर्मा या सामन्यात पहिल्याच बॉलला शून्य रनवर आऊट झाला. या सीरिजमध्ये अभिषेक दुसऱ्यांदा पहिल्या बॉलला शून्य रनवर माघारी परतला. तर संजू सॅमसन पुन्हा एकदा अपयशी ठरला.
advertisement
3/6
संजू सॅमसन 15 बॉलमध्ये 24 रन करून माघारी परतला. या सीरिजच्या एकाही सामन्यात संजूला मोठी खेळी करता आलेली नाही, त्यामुळे टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियावर त्यांची टॉप ऑर्डर बदलण्याची वेळ येऊ शकते.
advertisement
4/6
टीम इंडियाला सीरिज जिंकवण्यामध्ये इशान किशनने महत्त्वाची भूमिका बजावली, पण चौथ्या सामन्यात इशान दुखापतीमुळे खेळू शकला नाही. संजूला टीममधून बाहेर करायचं असेल, तर त्याच्याऐवजी इशान किशन हा अभिषेकसोबत ओपनिंग करेल.
advertisement
5/6
अभिषेक आणि इशान ओपनिंगला आले तर तिसऱ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव आणि चौथ्या क्रमांकावर रिंकू सिंग खेळू शकतो. न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या टी-20 सामन्यातही सूर्या तिसऱ्या आणि रिंकू चौथ्या क्रमांकावर खेळला.
advertisement
6/6
वर्ल्ड कपसाठी भारतीय टीम : अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), इशान किशन, तिलक वर्मा, रिंकू सिंग, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्सर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs NZ : आता संजूची गरज नाही, पर्याय मिळाला... टीम इंडिया बदलणार T20 वर्ल्ड कपची टॉप ऑर्डर!
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल