TRENDING:

IND vs NZ : शिवम दुबे एकटाच भिडला, तरी सामना हारला, टीम इंडियाला 5 चुका महागात पडल्या

Last Updated:
विशाखापट्टणमच्या मैदानावर रंगलेल्या सामन्यात न्यूझीलंडने टीम इंडियाचा 50 धावांनी पराभव केला आहे. या विजयासह न्यूझीलंडने टीम इंडियाचा विजयरथ रोखत पाच सामन्यांच्या मालिकेत 3-1 ने आघाडी घेतली आहे.
advertisement
1/8
शिवम दुबे एकटाच भिडला, तरी सामना हारला, टीम इंडियाला 5 चुका महागात पडल्या
विशाखापट्टणमच्या मैदानावर रंगलेल्या सामन्यात न्यूझीलंडने टीम इंडियाचा 50 धावांनी पराभव केला आहे. या विजयासह न्यूझीलंडने टीम इंडियाचा विजयरथ रोखत पाच सामन्यांच्या मालिकेत 3-1 ने आघाडी घेतली आहे.
advertisement
2/8
न्यूझीलंडने टीम इंडियासमोर 216 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडिया फक्त 165 धावांवर ऑल आऊट झाली होती. त्यामुळे टीम इंडियाचा 50 धावांनी पराभव झाला.
advertisement
3/8
टीम इंडियाकडून शिवम दुबे न्यूझीलंडला एकटाच भिडला होता. त्याने 23 बॉलमध्ये 65 धावांची खेळी केली होती. ही वादळी खेळी करून देखील त्याला सामना पराभूत होण्यापासून वाचवता आला नाही.या सामन्यात टीम इंडियाला पाच चुका महागात पडल्या.
advertisement
4/8
पहिली चुक म्हणजे 200 पार धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अभिषेक शर्माने बेजबाबदारपणे खेळणे. अभिषेक शर्मा सवयीप्रमाणे पहिल्या बॉलपासून प्रहार करायला गेला आणि शुन्यावर आऊट होऊन बसला.
advertisement
5/8
अभिषेक बाद झाल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव मैदानात आला होता. मात्र तो देखील अवघ्या 8 धावांवर आऊट झाला होता.
advertisement
6/8
अभिषेक आणि सूर्यकुमार यादव बाद झाल्यानंतर संजू सॅमसनकडे आज स्वत:ला सिद्ध करायची संधी होती. मात्र ही संधी देखील त्याने गमावली आणि तो अवघ्या 24 धावांवर बाद झाला. त्यामुळे टीम इंडियाचा डाव गडगडला होता.
advertisement
7/8
संजू बाद झाल्यानंतर रिंकूने फटकेबाजी केली पण तो 39 वर बाद झाला. त्यानंतर हार्दिक पांड्याने मैदानात टीकून खेळणे आवश्यक होते.मात्र तो देखील 2 धावांवर बाद झाला.
advertisement
8/8
टीम इंडियाकडून हर्षित राणाने सर्वाधिक धावा दिल्या. हर्षित राणाने 4 ओव्हरमध्ये 54 धावा देऊन एकही विकेट काढली नाही.त्यामुळे टीम इंडियाला या चुका महागात पडल्या आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs NZ : शिवम दुबे एकटाच भिडला, तरी सामना हारला, टीम इंडियाला 5 चुका महागात पडल्या
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल