मकर संक्रांत होताच 3 राशींचे भाग्य उजाळलं! आज 15 जानेवारीपासून घरात सुख शांतीसह बक्कळ पैसा येणार
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Astrology News : ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने 15 जानेवारी 2026 हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. मकर संक्रांतीनंतर ग्रहस्थितीत होणारे बदल अनेक राशींसाठी नवे योग घेऊन येत आहेत.
advertisement
1/6

ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने 15 जानेवारी 2026 हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. मकर संक्रांतीनंतर ग्रहस्थितीत होणारे बदल अनेक राशींसाठी नवे योग घेऊन येत आहेत. ज्योतिषी सांगतात की या दिवशी शुक्र आणि शनी यांच्यात विशेष असा ‘लाभ दृष्टी योग’ निर्माण होत आहे. हा योग काही निवडक राशींसाठी भाग्यवर्धक ठरण्याची दाट शक्यता असून, संधी, स्थैर्य आणि प्रगतीचे नवे मार्ग खुला होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
advertisement
2/6
ज्योतिषशास्त्रात लाभ दृष्टी योगाला अत्यंत शुभ मानले जाते. दोन ग्रहांमध्ये 60 अंशांचे अंतर निर्माण झाले की हा योग तयार होतो. या योगाचे वैशिष्ट्य म्हणजे संबंधित ग्रह एकमेकांच्या शक्तींना पूरक ठरतात. त्यांच्यात संघर्ष न होता सहकार्याची भावना तयार होते आणि त्यामुळे सकारात्मक परिणाम अधिक प्रभावीपणे दिसून येतात. शुक्र हा सुख, ऐश्वर्य, प्रेम, कला आणि आर्थिक समृद्धीचा कारक ग्रह मानला जातो, तर शनी शिस्त, मेहनत, संयम आणि दीर्घकालीन यशाचे प्रतीक आहे. या दोन्ही ग्रहांची लाभ दृष्टी एकत्र आल्याने परिश्रमांना योग्य फळ मिळण्याची शक्यता वाढते.
advertisement
3/6
पंचांगानुसार 15 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजून 46 मिनिटांनी शुक्र आणि शनी 60 अंशांच्या अंतरावर येतील आणि हा लाभ दृष्टी योग प्रभावी होईल. हा योग अचानक भाग्य देणारा नसून, संधी उपलब्ध करून देणारा मानला जातो. त्या संधींचा लाभ घेण्यासाठी योग्य निर्णय, मेहनत आणि संयम आवश्यक असतो. तरीही, तीन राशींसाठी हा काळ सुवर्णसंधी ठरू शकतो, असे ज्योतिषांचे मत आहे.
advertisement
4/6
वृषभ - राशीच्या लोकांसाठी हा योग इच्छा पूर्ण होण्याचे संकेत देत आहे. गेल्या काही काळापासून रखडलेल्या योजना, छंद किंवा कामे पुन्हा एकदा गती घेऊ शकतात. आर्थिक अडचणी हळूहळू कमी होण्याची शक्यता असून उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी स्थैर्य वाढेल आणि तुमच्या मेहनतीचे फळ स्पष्टपणे दिसू लागेल. नातेसंबंधांमध्ये विश्वास वाढेल. घर, वाहन किंवा जीवनशैली सुधारण्याशी संबंधित स्वप्ने या काळात साकार होऊ शकतात. संयमाने आणि विचारपूर्वक घेतलेले निर्णय भविष्यात दीर्घकालीन फायदे देतील.
advertisement
5/6
मकर - राशीसाठी शुक्र-शनी लाभ दृष्टी योग विशेष अनुकूल मानला जात आहे. करिअरमध्ये जबाबदाऱ्या वाढतील, मात्र त्याबरोबरच मान-सन्मान आणि आर्थिक लाभही मिळू शकतो. गुंतवणूक, बचत किंवा दीर्घकालीन आर्थिक नियोजनासाठी हा काळ योग्य आहे. अनेक दिवसांपासून मनात असलेली ध्येये आता पूर्ण होण्याच्या मार्गावर येतील. आत्मविश्वास वाढेल आणि समाजात तुमची प्रतिमा अधिक भक्कम होईल. वरिष्ठ अधिकारी आणि अनुभवी व्यक्तींकडून मार्गदर्शन मिळण्याची शक्यता आहे. शिस्तबद्ध कामकाज आणि गांभीर्य तुम्हाला इतरांपेक्षा पुढे नेईल.
advertisement
6/6
कुंभ - राशीच्या लोकांसाठी हा योग स्वप्ने प्रत्यक्षात आणण्याचा महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. नव्या संधी दारावर येऊन ठेपतील. मेहनत आणि संयमाचे फळ मिळेल. आर्थिक आवक वाढण्याची चिन्हे असून, प्रयत्नांना यश मिळू शकते. मित्र, सहकारी आणि सामाजिक संपर्क यांच्यामुळे लाभ होईल. भविष्याबाबत असलेली अनिश्चितता हळूहळू कमी होईल. नवीन प्रकल्प, व्यवसाय किंवा कल्पनांवर काम सुरू करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. आत्मविश्वासाने उचललेले प्रत्येक पाऊल तुम्हाला योग्य दिशेने पुढे घेऊन जाणारे ठरेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
मकर संक्रांत होताच 3 राशींचे भाग्य उजाळलं! आज 15 जानेवारीपासून घरात सुख शांतीसह बक्कळ पैसा येणार