Aajache Rashibhavishya: स्वप्नपूर्तीचा दिवस! फक्त गोडबोल्या मित्रांपासून सावध राहा, मेष ते मीन आजचं राशीभविष्य
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
Horoscope Today: मंगळवार, 15 जुलैचा दिवस काही राशींसाठी खास असणार आहे. तर काहींसाठी नवी आव्हाने घेऊन येईल. तुमचं आजचं राशीभविष्य जाणून घेऊ.
advertisement
1/13

मेषः आज तुमच्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस. कार्यक्षेत्रात तुम्ही केलेल्या कष्टांची फळे मिळतील. यश दृष्टिक्षेपात येईल. आप्तस्वकीयात मानसन्मान वाढेल. शुभ अंक 1, शुभ रंग आकाशी
advertisement
2/13
वृषभः मोठ्या लोकांमध्ये असलेले तुमचे संबंध तुमच्या व्यवसायवृद्धीच्या कामी येतील. आज तुम्ही फक्त आपल्या ध्येयाला प्राधान्य देणे गरजेचे आहे. वाद टाळा. शुभ अंक 3, शुभ रंग जांभळा
advertisement
3/13
मिथुनः ज्येष्ठ मंडळींना देवधर्माची ओढ लागेल. गृहिणी यथाशक्ती दानधर्म करतील. उच्चशिक्षित मंडळींना विदेशगमनाचे वेध लागतील. दैव अनुकूल राहील. शुभ अंक 4, शुभ रंग सोनेरी
advertisement
4/13
कर्क : नोकरीच्या ठिकाणी आज वरिष्ठांचे समाधान होणे कठीण. गोडबोल्या मंडळींनी दिलेली आश्वासने मनावर घेऊ नका. गैरवर्तनाने प्रतिष्ठा धोक्यात येऊ शकेल. शुभ अंक 6, शुभ रंग चंदेरी
advertisement
5/13
सिंह: आत्मविश्वास वाढेल. मोठे व्यावसायिक करार यशस्वी होतील. धंद्यात भागीदारांबरोबर एकमत राहील. आज वैवाहिक जोडीदाराशी चांगले सूर जुळतील. शुभ अंक 2, शुभ रंग क्रीम
advertisement
6/13
कन्याः आज सर्वात आधी काढू शकतील. तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला वेळीच घेतलेला बरा. शुभ अंक 1, शुभ रंग पिस्ता
advertisement
7/13
तूळ : उच्चशिक्षित मंडळींच्या महत्त्वाकांक्षा वाढतील. स्वतःच्या व्यक्तिमत्त्व विकासाकडे लक्ष द्याल. काही जणांचा गूढ शास्त्राच्या अभ्यासाकडे कल राहील. शुभ अंक 8, शुभ रंग पांढरा
advertisement
8/13
वृश्चिकः पारिवारिक सदस्यांमध्ये सामंजस्याची भावना राहील. मुलांची अभ्यासातील गोडी वाढेल. आज गृहसौख्याचा दिवस. आईला दिलेला शब्द जरूर पाळा. शुभ अंक 4, शुभ रंग निळा
advertisement
9/13
धनू : राशीच्या तृतीय स्थानी भ्रमण करणारा चंद्र तुमच्या पराक्रमात वृद्धी करणार आहे. आज तुम्ही चर्चेपेक्षा कृतीला प्राधान्य द्याल. भावंडांशी सलोखा वाढेल. शुभ अंक 6, शुभ रंग मरून
advertisement
10/13
मकर : अत्यंत आत्मविश्वासाने घराबाहेर पडाल. आर्थिक बाजू भक्कम असल्याने मनोबल उत्तम राहील. व्यवसायात काही पेचप्रसंगांना धैर्याने तोंड द्याल. शुभ अंक 5, शुभ रंग केशरी
advertisement
11/13
कुंभ : आज तुम्ही एखादा विवाह जुळवण्यात यशस्वी मध्यस्थी कराल. महत्त्वाच्या चर्चेत आपले मत ठामपणे मांडाल. आज घाईगर्दीत घेतलेले निर्णय चुकतील. शुभ अंक 9, शुभ रंग भगवा
advertisement
12/13
मीनः राशीच्या व्ययस्थानातून चंद्रभ्रमण सुरू असताना जमाखर्चाची गणिते चुकतील. असलेला पैसा जपून वापरा. दूरच्या प्रवासात किमती वस्तू जपा. शुभ अंक 7, शुभ रंग मोरपंखी
advertisement
13/13
टीप - आजचे राशीभविष्य तुमच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून येणाऱ्या राशीवर आधारित आहे. हे सर्वसामान्य राशीभविष्य आहे. अचूक आणि वैयक्तिक राशीभविष्यासाठी जवळच्या ज्योतिषांचा सल्ला घेणे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Aajache Rashibhavishya: स्वप्नपूर्तीचा दिवस! फक्त गोडबोल्या मित्रांपासून सावध राहा, मेष ते मीन आजचं राशीभविष्य