Aajache Rashibhavishya: आजचा दिवस अनुकूल, पण साधी चूक नको! 5 राशींचं भाग्य चमकणार, 2 जुलैचं राशीभविष्य
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
Horoscope Today: आपल्या जन्मनावावरून आफली रास समजते. याच राशावरून आजचं राशीभविष्य पाहता येतं. मेष ते मीन राशीचं आजचं राशीभविष्य जाणून घेऊ.
advertisement
1/13

मेश राशी - आर्थिक स्थितीतील बदल नक्कीच आज होणार आहेत. आजचा दिवस तुमच्या आयुष्यातला सर्वात सुंदर दिवस असेल असे काहीतरी करा. आजचा दिवस अनुकूल आहे. कामाच्या ठिकाणी त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्या. आपण आपल्या मालकीच्या वस्तूंबाबत निष्काळजी असाल तर त्या गहाळ अथवा चोरी होऊ शकतात. आज तुमचा शुभ अंक 1 आणि रंग नारंगी असणार आहे.
advertisement
2/13
वृषभ राशी - तुमची जमीन आज चांगल्या भावात विकली जाऊ शकते यामुळे तुम्हाला नफा होईल. प्रियजनांशी बोलताना वादग्रस्त विषय टाळा. प्रेमाचा आनंद घेता येईल. करिअरविषयक संधी अधिक विस्तारण्यासाठी तुमची व्यावसायिक ताकद वापरा. तुम्ही असलेल्या क्षेत्रात तुम्हाला अमर्याद फायदा मिळण्याची शक्यता आहे. आज तुमचा शुभ अंक 9 आणि रंग लाल हा असणार आहे.
advertisement
3/13
मिथुन राशी - दीर्घकालीन दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून गुंतवणूक करणे गरजेचे आहे. तुमच्या बॉसचा मूड चांगला असल्यामुळे कामाच्या ठिकाणी आज चांगल्या गोष्टी घडतील. आपल्या राशी पासून चंद्र तिसरा स्थानी आहे. आज सकाळी कार्यात यशस्वी व्हाल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल मनात नकारात्मक विचार येतील. आज तुमचा शुभ अंक 7 आणि रंग पांढरा असणार आहे.
advertisement
4/13
कर्क राशी - तुमच्या आजाराबद्दल चर्चा करणे टाळा. तुमच्या दुखण्यावर तुम्ही जितकी जास्त चर्चा कराल तेवढी तुमची व्याधी वाढत जाणार. पैशाची किंमत तुम्ही चांगल्या प्रकारे जाणतात म्हणून आजच्या दिवशी तुमच्या द्वारे वाचवलेले धन तुमच्या खूप कामी येऊ शकते आणि तुम्ही कुठल्या मोठ्या अडचणींमधून निघू शकतात. शारीरिक व मानसिक आरोग्यात सुधारणा होईल. आज तुमचा शुभ अंक 1 आणि रंग नारंगी असणार आहे.
advertisement
5/13
सिंह राशी - जे लोक दुधाच्या व्यवसायाने जोडलेले आहे त्यांना आज आर्थिक लाभ होण्याची प्रबळ शक्यता आहे. आजचा दिवस अनुकूल आहे. कामाच्या ठिकाणी त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्या. या राशीतील वृद्ध जातक आजच्या दिवशी आपल्या जुन्या मित्रांशी रिकाम्या वेळात भेटायला जाऊ शकतात. मित्र-मैत्रिणींकडून आज अडचण येण्याची शक्यता असल्याने सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. आज तुमचा शुभ अंक 9 आणि रंग लाल आहे.
advertisement
6/13
कन्या राशी - शारीरिक आजारातून बरे होण्याचे शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. तुमच्या दुराग्रही स्वभावामुळे तुमच्या पालकांची शांती तुम्ही भंग कराल. प्रेम प्रकरणात तुमच्याबद्दल गैरसमज होईल. तुमच्या जोडीदाराचे प्रेम हे तुमच्यासाठी भावपूर्ण असेल, हे तुम्हाला आज कळेल. प्रकृतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. आज तुमचा शुभ अंक 7 आणि रंग पांढरा असणार आहे.
advertisement
7/13
तूळ राशी - तुमची संध्याकाळ काहीशा मिश्र भावनांमुळे तणावाची ठरू शकते. आज तुम्हाला धन संबंधित काही समस्या असण्याची शक्यता आहे, परंतु तुम्ही तुमच्या कौशल्याने हानीलाही नफ्यामध्ये बदलू शकतात. तुम्ही आणि तुमच्या जोडीदारामध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. आज तुमचा शुभ अंक 1 आणि रंग नारंगी असणार आहे.
advertisement
8/13
वृश्चिक राशी - कार्यालयातून लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करा आणि ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्याच करा. व्यावसायिक लोकांना आज व्यवसायात मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. आज हाती घेतलेले कामे हे योग्य रीत्या मार्गी लागतील. जवळच्या मित्रांचे आणि जोडीदारांचे आक्षेपार्ह कृत्य तुमचे आयुष्य खडतर करू शकते. आज तुमचा दिवस एकंदरीत चांगला असणार आहे. आजचा तुमचा शुभ अंक 2 आणि रंग पांढरा आहे.
advertisement
9/13
धनु राशी - दीर्घकाळ प्रलंबित असणारी थकबाकी आणि येणे अंतिमत: प्राप्त होईल. आज तुमच्या जोडीदाराकडून आनंदाची बातमी तुम्हाला मिळू शकते. ज्याने तुमचा पुढचा दिवस अतिशय आनंदाने जाणार आहे. तुम्ही तुमच्या संकल्पना चांगल्या तऱ्हेने मांडल्यात आणि तुमच्या कामात उत्साह आणि शेवटपर्यंत चिकाटी दाखवलीत - तर तुम्ही फायद्यात राहाल. आज तुमचा शुभ अंक 8 आणि रंग काळा असणार आहे.
advertisement
10/13
मकर राशी - चार भिंतीबाहेरील उपक्रम तुमच्यासाठी लाभदायक ठरतील. आज तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकेल. भाऊ-बहिणीचा सल्ला घेऊ शकतो. व्यापारात नवीन ग्राहकांशी वाटाघाटी करण्यासाठी उत्तम दिन आहे. या राशीतील अविवाहित मंडळींना आज आनंदाची बातमी मिळणार आहे. आजचा दिवस उत्तम असणार आहे. आज तुमचा शुभ आणि 8 आणि रंग काळा असणार आहे.
advertisement
11/13
कुंभ राशी - मित्रांचा आधार लाभेल आणि ते तुम्हाला आनंदी ठेवतील. धनची आवश्यकता कधीही पडू शकते, म्हणून आज जितके शक्य असेल आपल्या पैशाची बचत करण्याचा विचार करा. पैशांची गुंतवणूक करत असला तर आज जमिनीत पैसे गुंतवण्यासाठी शुभ दिवस आहे. नवीन उपक्रम, उद्योग हा आकर्षक आणि योग्य परतावा मिळण्याबाबत आशादायी असेल. या राशीतील विद्यार्थी-विद्यार्थिनी आज आपल्या किंमती वेळेचा दुरुपयोग करू शकतात. आज तुमचा शुभ अंक 6 आणि रंग गुलाबी असणार आहे.
advertisement
12/13
मीन राशी - संध्याकाळी जरा क्षणभर विश्रांती घ्या. तुमच्या वरिष्ठांचा सल्ला आज तुम्हाला कामाच्या क्षेत्रात धन लाभ करवून देऊ शकते. आज तुमच्या कलात्मक क्षमतेमुळे अनेक लोकांची कौतुकाची थाप मिळेल आणि अनपेक्षित बक्षीसही मिळेल. राहिलेले महत्त्वाची कामे आज मार्गी लागतील. नवीन कामे हातात घेतली तर त्या गोष्टीचा लाभ हा नक्कीच आपल्याला होणार आहे. आज तुमचा शुभ अंक 4 आणि रंग करडा असणार आहे.
advertisement
13/13
टीप - आजचे राशीभविष्य तुमच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून येणाऱ्या राशीवर आधारित आहे. हे सर्वसामान्य राशीभविष्य आहे. अचूक आणि वैयक्तिक राशीभविष्यासाठी जवळच्या ज्योतिषांचा सल्ला घेणे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Aajache Rashibhavishya: आजचा दिवस अनुकूल, पण साधी चूक नको! 5 राशींचं भाग्य चमकणार, 2 जुलैचं राशीभविष्य