Aajache Rashibhavishya: पैसा अन् वेळ जपा, रविवारी ‘या’ राशींना धोका, तुमच्या नशिबात काय? आजचं राशीभविष्य
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
- Published by:Mohan Najan
Last Updated:
आज तुमचा दिवस कसा असणार आहे? तुमच्या नावाच्या पहिल्या अक्षरानुसार तुमची राशी काय सांगत आहे? हे आपण ज्योतिषी अमोघ पाडळीकर यांच्या राशी भविष्यातून जाणून घेणार आहोत. 12 राशींमधील तुमच्या राशीत कुठला योग दर्शवत आहे हे आपण पुढे बघूया.
advertisement
1/13

मेष राशी - तुमच्यातील मूल जागे होईल आणि तुम्ही एकदम खेळीमेळीच्या मूडमध्ये जाल. आज कुणी विपरीत लिंगीच्या मदतीने तुम्हाला व्यवसायात किंवा नोकरीमध्ये आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक व्यावसायिक प्रकल्प सुरु करण्यास शुभ दिवस. चांगले यश मिळण्यासाठी कुटुंबातील इतर सदस्यांची मदत घ्या. आजचा तुमचा शुभ अंक 3 असणार आहे.
advertisement
2/13
वृषभ राशी - जर प्रवास करत असाल तर आपल्या महत्त्वाच्या वस्तूंची काळजी घ्या. गैरसमजात वाईट काळ गेल्यानंतर आजच्या दिवशी संध्याकाळी तुमच्या जोडीदाराकडून प्रेमाचा वर्षाव होईल. आज आपल्या कुटुंबासोबत तुम्ही फिरायला जाण्याचा आनंद घेऊ शकतात. चांगले दिसावे यासाठी प्रयत्न करायला खूप भरपूर मोकळा वेळ मिळेल. आज तुमचा शुभ अंक 2 असणार आहे.
advertisement
3/13
मिथुन राशी - वाहन चालविताना काळजी घ्या. तुमचे धन कुठे खर्च होत आहे यावर तुम्हाला नजर ठेवण्याची आवश्यकता आहे. विवाहाचा परमानंद काय असतो, याची जाणीव आज तुम्हाला होईल. एकांतात वेळ घालवणे उत्तम आहे. आज संपूर्ण कुटुंबासाठी आनंददायी बातमी घेऊन येईल. आज तुमचा शुभ अंक 9 असणार आहे.
advertisement
4/13
कर्क राशी - तुमच्या तणावावर तुम्ही मात करू शकाल. घराच्या दृष्टीने केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. बऱ्याच जुन्या आठवणी ताज्या होतील आणि तुम्ही वेळेत मागे परत याल. खाजगी नातेसंबंध संवेदनशील आणि कमजोर असतात. आज तुमचा शुभ अंक 4 असणार.
advertisement
5/13
सिंह राशी - तुम्हाला ज्या पद्धतीने जे वाटते त्यावर नियंत्रण ठेवा. आर्थिक जीवनात आज आनंद राहील. यासोबतच तुम्ही आज कर्जापासून मुक्त होऊ शकतात. या राशीतील काही व्यावसायिक आज आपल्या व्यवसायाला नवीन दिशा देण्याच्या बाबतीत विचार करू शकतात. आज कार्य-क्षेत्रात अचानक तुमच्या कामात तपास होऊ शकतो. आज तुम्ही महत्त्वाच्या विषयांवर लक्ष द्या. आज तुमचा शुभ अंक 7 असणार आहे.
advertisement
6/13
कन्या राशी - कार्यालयातून लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करा आणि ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्याच करा. अनपेक्षितपणे गोड बातमी मिळाल्याने संपूर्ण कुटुंबासाठी आनंदाचा दिवस ठरेल. एखाद्या मौल्यवान वस्तूप्रमाणे आपले प्रेम ताजे असू द्या. गेले बरेच दिवस तुम्हाला शापित असल्यासारखं वाटत असेल, तर आज तुम्हाला आशीर्वाद मिळाल्यासारखे वाटेल. तुमचा शुभ अंक आज 5 आहे.
advertisement
7/13
तुळ राशी - जे लोक आतापर्यंत पैशाचा विचार न करता खर्च करत होते त्यांना आज पैशाची अधिक आवश्यकता पडू शकते आणि आज तुम्हाला समजेल की, पैशाची आपल्या जीवनात काय किंमत असते. कोणताही व्यवहार करताना तुमचे हित सांभाळा. जर तुम्ही कुठल्या खेळात प्रभुत्व ठेवतात तर, आजच्या दिवशी तुम्ही खेळ खेळला पाहिजे. प्रिय व्यक्ती तुमच्याकडून वचन मागेल - जे वचन तुम्ही पूर्ण करू शकणार नाही ते देऊ नका. आज तुमचा शुभ अंक 3 असणार आहे.
advertisement
8/13
वृश्चिक राशी - तुमची देण्याची वृत्ती म्हणजे अप्रत्यक्ष मदत करण्याची वृत्ती होय. त्यामुळे शंका, निरुत्साह, अश्रद्धा, मत्सर, हेवा, गर्व यापासून तुम्ही मुक्त व्हाल. पैशाची कमतरता आज घरात कलहाचे कारण बनू शकते. आज आपल्या प्रेमी सोबत वेळ घालवू शकाल आणि त्यांच्या समोर आपल्या गोष्टींना व्यक्त करू शकाल. आज तुमचा शुभ अंक 9 असणार आहे.
advertisement
9/13
धनु राशी - या राशीतील जे लोक परदेशात व्यापार करतात त्यांना आज चांगला धन लाभ होऊ शकतो. तुमच्या ओळखीच्या व्यक्तीला तुम्हाला योग्य वाटेल तो निर्णय घेण्यासाठी जबरदस्ती केलीत. आजच्या दिवशी स्वतःसाठी वेळ काढणे खूप कठीण आहे. तुम्ही ज्या गोष्टी करीत नाही त्या गोष्टी करण्यासाठी इतरांवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करू नका. आज तुमचा शुभ अंक 6 असणार आहे.
advertisement
10/13
मकर राशी - आपले मत मांडण्यास कचरू नका. तुमचा आत्मविश्वास ढळू देऊ नका, अन्यथा त्यामुळे आपल्या प्रगतीमध्ये अनेक अडचणी निर्माण होतील. स्वतःला व्यक्त होऊ द्या आणि हसतमुखाने अडचणींचा सामना करा. आज अनुभवी आणि नावीन्यपूर्ण कल्पना असलेल्या लोकांच्या सल्ल्यानुसार पैसे गुंतवा. आज यशाचे हेच समीकरण उपयोगी ठरेल. आज तुमचा शुभ अंक 6 असणार आहे.
advertisement
11/13
कुंभ राशी - अवघडलेपण, असुविधा तुम्हाला मानसिक त्रास देऊ शकतात, पण मित्रांच्या भरपूर मदतीमुळे तुमच्या अडचणी दूर होतील. व्यवसायात तुमचा निष्काळजीपणा आज तुम्हाला आर्थिक नुकसान देऊ शकतो. आपला रिकामा वेळ घालवण्याचा विचार करू शकतात. आज तुम्ही कुठल्या समस्येत पडू शकतात आणि तुम्हाला समजू शकते की, चांगल्या मित्रांचे जीवनात असणे खूप गरजेचे आहे. आज तुमचा शुभ अंक 9 आहे.
advertisement
12/13
मीन राशी - तुमचे आरोग्य आणि ऊर्जा बचतीची सवय तुम्हाला दीर्घकाळ प्रवासाच्या योजनेसाठी फायदेशीर ठरेल. अतिशय व्यस्त असूनही तुम्ही आरोग्य चांगले राखल्यामुळे थकवा येणार नाही. मालमत्ताविषयक कामे होतील आणि उत्तमपैकी नफा होईल. दुखापत होण्याची शक्यता आहे. डोळे सगळं सांगतात, आणि तुम्ही तुमच्या जोडीदाराशी आज डोळ्यात डोळे घालून संवाद साधणार आहात. आज तुमचा शुभ अंक 1 आहे.
advertisement
13/13
टिप - आजचे राशी भविष्य हे फक्त आणि फक्त नक्षत्रांवर आधारित बनवलेले आहे. हे राशिभविष्य तुमच्या नावाच्या पहिल्या अक्षरवर्ती आखल्या गेले आहे. तरी अचूक आणि अधिक माहिती ही आपल्याला हवी असल्यास जाणकार ज्योतिषांचा सल्ला घेणे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Aajache Rashibhavishya: पैसा अन् वेळ जपा, रविवारी ‘या’ राशींना धोका, तुमच्या नशिबात काय? आजचं राशीभविष्य