Aajache Rashibhavishya: गोडबोल्या मंडळींकडून सावधान, महत्त्वाचे निर्णय घेतानी ही घ्या काळजी, मेष ते मीन राशींसाठी कसा असेल दिवस?
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
Aajache Rashibhavishya: 20 जुलैचा दिवस काही राशींसाठी खास असणार आहे. तर काहींसाठी नवी आव्हाने घेऊन येईल.
advertisement
1/13

मेषः आज कार्यक्षेत्रात तुमचे वक्तृत्व कामी येईल. नोकरीत वरिष्ठ तुमच्या अडचणी समजून घेतील. आज शेजारी जरा तिरकस नजरेने बघतील. दुर्लक्ष करा.
advertisement
2/13
वृषभः प्रत्येक गोष्टीकडे आज तुम्ही सकारात्मकतेने पाहाल. सहकारी तुमच्या प्रभावात असतील. नोकरीच्या ठिकाणी आज अधिकाऱ्यांची शाबासकी मिळवाल.
advertisement
3/13
मिथुनः कौटुंबिक गरजा वाढणार आहेत. काही खर्च भिडस्तपणापायी करावेच लागणार आहेत. गृहिणींना रीतिरिवाज सांभाळावे लागतील. मौल्यवान वस्तू जपा.
advertisement
4/13
कर्क : आज घर खरेदी किंवा वाहन खरेदीच्या कामासाठी कर्ज मंजुरी होऊ शकेल. आज दुपारनंतर लाभातील चंद्रभ्रमण काही अनपेक्षित लाभ देईल.
advertisement
5/13
सिंह: ध्येय साध्य करण्यासाठी अथक प्रयत्नांशिवाय कोणताही शॉर्टकट नाही. आज तुम्ही आपल्या कर्तव्यास प्राधान्य द्याल. अधिकारांचा गैरवापर नको.
advertisement
6/13
कन्याः आज तुम्हाला आध्यात्मिक विषयात गोडी वाटेल. उच्चशिक्षित मंडळींना विदेशगमनाचे वेध लागतील. आज आजी-आजोबा नातवंडांचे हट्ट पुरवतील.
advertisement
7/13
तूळः राशीच्या अष्टमातून चंद्रभ्रमण होत असताना कोणतेही धाडस टाळणे हिताचे. जे काही चाललंय ते बरं चाललंय समजा. जोडीदाराच्या मताने घ्या.
advertisement
8/13
वृश्चिकः गोडबोल्या मंडळींकडून आलेल्या प्रलोभनांना बळी पडू नका. जनांचे ऐकून मनाचे करा. वैवाहिक जीवनात जोडीदाराकडे मन मोकळे कराल.
advertisement
9/13
धनू : आज दिवस कष्टांचा. सहज काही मिळेल या भ्रमात राहू नका. आज तुमचे मनोबल ही कमीच असेल. महत्त्वाचे निर्णय घेण्यास उशीर करू नका.
advertisement
10/13
मकर: कला-क्रिडा क्षेत्रात असाल तर उत्तम संधी चालून येतील. कार्यक्षेत्रातील सुखद घटना तुमचा आत्मविश्वास वाढवतील. गृहिणी पार्लरसाठी वेळ देतील.
advertisement
11/13
कुंभ : आज काही घरगुती समस्यांवर लक्ष देणे तुम्हाला गरजेचे वाटेल. गृहिणींनी वेळात वेळ काढून आज मुलांच्या अभ्यासात डोकावणे हिताचे राहील.
advertisement
12/13
मीनः सामाजिक कार्यकर्त्यांचा समाजातील मान वाढेल. आज तुम्ही आपले अधिकार वापरून इतरांची कामे कराल. घरगुती समस्यांकडे तुमचे दुर्लक्ष होईल.
advertisement
13/13
टीप - आजचे राशीभविष्य तुमच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून येणाऱ्या राशीवर आधारित आहे. हे सर्वसामान्य राशीभविष्य आहे. अचूक आणि वैयक्तिक राशीभविष्यासाठी जवळच्या ज्योतिषांचा सल्ला घेणे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Aajache Rashibhavishya: गोडबोल्या मंडळींकडून सावधान, महत्त्वाचे निर्णय घेतानी ही घ्या काळजी, मेष ते मीन राशींसाठी कसा असेल दिवस?