Sankashti Horoscope: शुक्रवारी संकष्टीचा शुभ संयोग! ग्रहांची स्थिती 3 राशींच्या लोकांना शुभफळदायी
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Sankashti Horoscope: पंचांगानुसार संकष्टी चतुर्थीला गणेश पूजा करण्याची परंपरा आहे. संकष्टी चतुर्थी महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला साजरी केली जाते. या दिवशी लाडक्या गणरायासाठी भाविक मनोभावे उपवास करून पूजा करतात.
advertisement
1/5

ज्योतिष्यांच्या मते, यावेळच्या संकष्टी चतुर्थीला (10 ऑक्टोबर) ग्रहांचा एक अद्भुत संयोग तयार होत आहे. या दिवशी शनी मीन राशीत, गुरू आणि चंद्र मिथुन राशीत असतील, तर शुक्र आणि सूर्य कन्या राशीत एकत्र असतील. संकष्टीचा चंद्रोदय रात्री 8.53 वाजल्यापासून होणार आहे.
advertisement
2/5
याव्यतिरिक्त, या दिवशी कृतिका नक्षत्रात गणेश पूजन होणार आहे. तसेच संकष्टी गुरुवारी असल्यामुळे व्रत करणाऱ्यांना श्री गणेश आणि लक्ष्मी-नारायण या दोघांचाही आशीर्वाद प्राप्त होईल. ज्योतिष्यांच्या मते, संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने ग्रहांच्या या बदलत्या स्थितीमुळे अनेक राशींसाठी चांगला काळ सुरू होईल.
advertisement
3/5
मेष - मेष राशीच्या लोकांसाठी ही संकष्टी चतुर्थी संबंधांमध्ये बळकटी घेऊन येत आहे. दांपत्य जीवनात आपुलकी वाढेल. ज्यांच्या मनात काही कारणास्तव दुरावा होता, त्यांच्या नात्यात गोडवा परत येईल. आर्थिक बाबींमध्ये देखील सुधारणा दिसून येईल. कामात व्यस्त असलेले लोकही कुटुंबाला वेळ देतील. अविवाहित लोकांसाठी देखील शुभ बातमी मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
4/5
कर्क - कर्क राशीच्या लोकांसाठी ही संकष्टी चतुर्थी अत्यंत शुभ राहील. जर आधी काही मतभेद चालू असतील तर ते या दिवशी पूर्णपणे संपुष्टात येऊ शकतात. ज्यांना आपल्या जीवनात स्थिरता हवी आहे, त्यांना सकारात्मक परिणाम मिळतील. एखादे जुने स्वप्न पूर्ण होऊ शकते. आर्थिक लाभाचा योग देखील तयार होत आहे.
advertisement
5/5
मीन - मीन राशीच्या लोकांसाठी संकष्टी चतुर्थी नवीन सुरुवातीचे संकेत आहे. नातेसंबंधांमध्ये भावनिक जोड वाढेल. गैरसमज दूर होतील. ज्यांच्या विवाहामध्ये अडचणी येत होत्या, त्यांच्यासाठी देखील ग्रह शुभ संकेत देत आहेत. कार्यस्थळी सन्मान मिळेल. कुटुंबाचे सहकार्य कायम राहील. घरात एखाद्या शुभ कार्यक्रमाची शक्यता देखील आहे.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Sankashti Horoscope: शुक्रवारी संकष्टीचा शुभ संयोग! ग्रहांची स्थिती 3 राशींच्या लोकांना शुभफळदायी