TRENDING:

Budh Margi 2025: उरलेत दोनच दिवस! बुध मार्गी झाला की या राशींची चिंता मिटणार, खिशात डबल पैसा

Last Updated:
Budh Gochar Astro: ग्रहांची स्थिती राशीचक्रावर सरळ परिणाम दाखवते. ग्रहांचे राशी परिवर्तन ठराविक काळानंतर होत असते. दोनच दिवसात ग्रहांचा राजकुमार मानला जाणारा बुध ग्रह रास बदलतोय. ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला विशेष स्थान आहे. बुध ग्रह दर 21 ते 30 दिवसांनी राशी परिवर्तन करतो.
advertisement
1/5
उरलेत दोनच दिवस! बुध मार्गी झाला की या राशींची चिंता मिटणार, खिशात डबल पैसा
पंचांगानुसार, बुध सध्या तूळ राशीत असून तो वक्री आहे. दोन दिवसांनी बुध वक्री स्थितीतून सरळ मार्गी होईल. ज्योतिषांच्या मते, 29 नोव्हेंबर रोजी रात्री 11:07 वाजता बुध सरळ मार्गी भ्रमण करू लागेल.
advertisement
2/5
बुध सरळ मार्गी जाण्याचा काही राशींच्या जीवनावर सकारात्मक परिणाम दाखवेल. काही राशींना त्रासाचे प्रसंगही येऊ शकतात. पुढे फेब्रुवारी 2026 मध्ये बुध पुन्हा वक्री होईल. सध्या 29 नोव्हेंबर रोजी बुधाची सरळ चाल कोणत्या राशींना फायदा देईल, त्याविषयी जाणून घेऊया.
advertisement
3/5
मिथुन - बुधाच्या सरळ चालीमुळे मिथुन राशीच्या करिअर आणि संवाद कौशल्यात नवीन ऊर्जा येईल. बराच काळ रखडलेले कोणतेही काम आता वेगाने पुढे जाईल. तुम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सहकार्य मिळेल. हा काळ व्यावसायिक व्यवहारांसाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ लाभदायी ठरेल अभ्यासात गती घ्याल.
advertisement
4/5
मकर - बुध सरळ मार्गी जात असल्यानं मकर राशीच्या राशीच्या लोकांना फायदा होईल. या लोकांच्या जीवनात लक्षणीय सकारात्मक बदल दिसून येतील. आर्थिक प्रगती दमदार असेल. गुंतवणूक, बचत किंवा मालमत्तेशी संबंधित निर्णय तुमच्या बाजूने होतील. जुने कर्ज किंवा अडकलेले पैसे वसूल होण्याची शक्यता आहे. घरात आनंददायी वातावरण राहील. खरेदीच्या चांगल्या संधी निर्माण होऊ शकतात.
advertisement
5/5
कुंभ - कुंभ राशीच्या लोकांसाठी मोठ्या योजना आखण्याचा हा काळ आहे. जर तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवू इच्छित असाल किंवा नवीन प्रकल्पावर काम सुरू करू इच्छित असाल, तर बुधाच्या सरळा मार्गी गतीचा प्रभाव तुम्हाला यशाकडे घेऊन जाईल. नातेवाईकांशी संबंध सुधारतील. चांगले लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Budh Margi 2025: उरलेत दोनच दिवस! बुध मार्गी झाला की या राशींची चिंता मिटणार, खिशात डबल पैसा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल