TRENDING:

Astrology: गजलक्ष्मी राजयोग! अचानक मोठा धनलाभ, या 3 राशींचा इनकम डबल; गुरू-शुक्राकडून भाग्योदय

Last Updated:
Astrology: ग्रह-ताऱ्यांचा मानवी जीवनावर काय परिणाम होतो, याबद्दल ज्योतिषशास्त्र भाष्य करतं. प्रत्येक ग्रह ठरावीक कालावधीनंतर आपल्या चालीत बदल करतो. त्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या व्यक्तींवर होतो. काही राशींवर त्याचा चांगला परिणाम होतो, तर काही राशींवर वाईट परिणाम होतो. ज्योतिषशास्त्रात गुरू आणि शुक्र हे शुभ ग्रह मानले जातात.
advertisement
1/6
गजलक्ष्मी राजयोग! अचानक धनलाभ, या 3 राशींचा इनकम डबल; गुरू-शुक्राकडून लाभ
या दोन शुभ ग्रहांची मिथुन राशीत युती झाल्यामुळे गजलक्ष्मी राजयोग या अत्यंत शुभ मानल्या जाणाऱ्या योगाची निर्मिती होत आहे. त्यामुळे तीन राशींच्या व्यक्तींना चांगली फळं मिळणार आहेत. त्या तीन राशी कोणत्या, हे जाणून घेऊ या. 
advertisement
2/6
बृहस्पती अर्थात गुरू हा ज्योतिषशास्त्रात शुभ ग्रह मानला गेला आहे. त्याचा आकार खूप मोठा आहे. गुरू ग्रहाला एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी एक वर्ष लागतं. म्हणजेच 12 वर्षांत गुरू ग्रह 12 राशींमध्ये फिरतो. सध्या गुरू ग्रह शुक्राच्या वृषभ राशीत आहे. तिथून तो 14 मे 2025 रोजी मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. शुक्र ग्रहदेखील त्याच्या पाठोपाठ मिथुन राशीत जाणार आहे.
advertisement
3/6
दोन महिन्यांनी म्हणजेच 26 जुलै 2025 रोजी सकाळी 9 वाजता शुक्र ग्रह मिथुन राशीत येईल. तो 21 ऑगस्ट 2025पर्यंत मिथुन राशीत राहील. या दोन्ही ग्रहांच्या युतीमुळे मिथुन राशीत या कालावधीत गजलक्ष्मी राजयोग तयार होईल. मिथुन राशीत 12 वर्षांनी हा अत्यंत शुभ असा गजलक्ष्मी राजयोग तयार होत आहे. त्यामुळे अनेक राशींना धनलाभ होणार आहे. त्या राशींबद्दल जाणून घेऊ या.
advertisement
4/6
मिथुन : गजलक्ष्मी राजयोग तयार झाल्यामुळे मिथुन राशीच्या व्यक्तींच्या जीवनात उत्पन्नाचे अनेक नवे स्रोत तयार होतील. शुक्र ग्रहाच्या कृपेमुळे या राशीच्या व्यक्तींचे प्रेमसंबंध उत्तम राहतील. आर्थिक स्थितीदेखील उत्तम राहील. वेगवेगळ्या कारणांसाठी घेतलेलं कर्ज फेडण्यात यश येईल. स्पर्धा परीक्षांची तयारी करत असलेल्या तरुणांना चांगली बातमी मिळू शकेल. अपत्याच्या बाबतीत असलेल्या चिंता दूर होतील.
advertisement
5/6
तूळ : गजलक्ष्मी राजयोग तयार झाल्यामुळे तूळ राशीच्या व्यक्तींना सर्वच क्षेत्रांमध्ये लाभ होण्याची शक्यता तयार होत आहे. पार्टनरशी चांगले प्रेमसंबंध राहतील. आयुष्याचा आनंद घ्याल. कामाच्या ठिकाणी प्रगतीचे अनेक योग तयार होत आहेत. मेहनत आणि जिद्द पाहून तुमच्याकडे एखादी मोठी जबाबदारी सोपवली जाऊ शकते. जुन्या गुंतवणुकीतून अचानक मोठा धनलाभ होऊ शकतो. कामासाठी अनेक प्रवास घडतील.
advertisement
6/6
सिंह : गुरू-शुक्र युती सिंह राशीच्या व्यक्तींसाठी अनुकूल ठरेल. आरोग्य उत्तम राहील. बिझनेसच्या प्रगतीसाठी आखलेल्या योजना यशस्वी होतील. प्रमोशन होईल आणि पगारवाढीचीही शक्यता आहे. अडकलेली कामंही पुढच्या वर्षात पूर्ण होऊ शकतील.(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Astrology: गजलक्ष्मी राजयोग! अचानक मोठा धनलाभ, या 3 राशींचा इनकम डबल; गुरू-शुक्राकडून भाग्योदय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल