Weekly Horoscope: सगळीकडून गुड न्यूज! फेब्रुवारीचा दुसरा आठवडा या राशींना लकी; संपूर्ण साप्ताहिक राशीभविष्य
- Published by:Ramesh Patil
- trending desk
- Written by:Chirag Daruwalla
Last Updated:
Saptahik Rashibhavishy In Marathi: फेब्रुवारी महिन्याच्या दुसरा आठवडा कसा असेल, कोणाला कशातून होईल लाभ? कोणाला कोणत्या समस्या देतील त्रास, कोणत्या गोष्टींची घ्यावी लागेल काळजी. ज्योतिषी चिराग दारूवाला यांनी सांगितलेलं 10 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी 2025 या आठवड्यासाठीचं राशीभविष्य
advertisement
1/12

मेष (Aries) : या आठवड्यात नशीब उच्च पातळीवर असेल. आठवड्याच्या सुरुवातीला करिअर किंवा व्यवसायासंबंधी दूरच्या किंवा जवळच्या प्रवासाची शक्यता आहे. परदेशात करिअर किंवा शिक्षणासाठी प्रयत्न करत आहेत, त्यांना चांगली बातमी मिळू शकते. हा काळ व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी शुभ ठरेल. त्यांना व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. पूर्वी कोणत्याही योजनेत किंवा व्यवसायात गुंतवलेले पैसे हे मोठ्या फायद्याचं कारण ठरेल. जोखमीची गुंतवणूक करू नये. अशा गुंतवणुकीचा विचार करत असल्यास एकदा हितचिंतकांचा सल्ला घ्यावा. आठवड्याच्या उत्तरार्धात स्पर्धा, परीक्षांची तयारी करणाऱ्या व्यक्तींना काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. मुलांच्या यशामुळे तुमचा आदर वाढेल आणि घरात आनंदाचं वातावरण राहील. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. परस्परांवरचा विश्वास वाढेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. जोडीदार आणि कुटुंबासह आनंदाचे क्षण व्यतीत करण्याच्या अनेक संधी मिळतील. आरोग्य सर्वसाधारण राहील.Lucky Color : BlackLucky Number : 6
advertisement
2/12
वृषभ (Taurus) : बऱ्याच काळापासून उपजीविकेच्या शोधात असलेल्यांसाठी आठवड्याची सुरुवात शुभ ठरेल. या काळात करिअर आणि व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. ध्येयाप्रति झपाटून काम करणाऱ्यांसाठी हा काळ शुभ ठरेल. उत्कृष्ट कामासाठी बॉसकडून प्रशंसा आणि मोठी जबाबदारी मिळू शकते. राजकारणाशी संबंधित व्यक्तींच्या इच्छा पूर्ण होतील. समाजात त्यांचा सन्मान आणि प्रभाव वाढेल. आठवड्याच्या उत्तरार्धात काही कौटुंबिक समस्यांमुळे अस्वस्थ होऊ शकता. परंतु बुद्धीच्या आणि संयमाच्या जोरावर तुम्ही त्यावर उपाय शोधू शकाल. या कामात घरातल्या ज्येष्ठ सदस्याचं पूर्ण सहकार्य आणि मदत मिळेल. घर आणि काम यामधला समतोल राखताना काही अडचणी येऊ शकतात. प्रेमसंबंध सर्वसाधारण राहतील. वैवाहिक जीवन आनंददायी राहील आणि जोडीदाराशी चांगला समन्वय साधता येईल. आठवड्याच्या उत्तरार्धात हंगामी आजारांपासून सावध राहा.Lucky Color : PinkLucky Number : 5
advertisement
3/12
मिथुन (Gemini) : या आठवड्यात नशीब दार ठोठावेल. आठवड्याच्या सुरुवातीलाच रोजगाराच्या संधी मिळू शकतात. या काळात कोणतं पाऊल उचलावं आणि कोणता निर्णय घ्यावा याबाबत संभ्रम वाटू शकतो. अशा परिस्थितीत, हितचिंतक किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यास चांगलं ठरेल. अन्य संस्थांकडून मोठ्या संधी मिळू शकतात. परंतु त्या स्वीकारण्यापूर्वी कामाचं स्वरूप, वेतन आणि इतर बाबींचा बारकाईने विचार करणं योग्य ठरेल. अन्यथा, नंतर त्रासाला सामोरं जावं लागू शकतं. काही काळापासून व्यवसायात मंदी जाणवत असेल, तर हा आठवडा दिलासा देणारा ठरेल. व्यवसायात अपेक्षित लाभ होईल आणि वाढीसाठी नवीन संधी उपलब्ध होतील. आठवड्याच्या मध्यात आरोग्याकडे थोडं लक्ष देण्याची गरज आहे. कारण या काळात हंगामी आजार होण्याची शक्यता आहे किंवा एखादा जुना आजार डोकं वर काढू शकतो. या काळात मुलांचं शिक्षण, विवाह यांसारख्या गोष्टींबाबत चिंता वाटू शकेल. प्रेमसंबंधांमध्ये जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका. अन्यथा नात्यात दुरावा येऊ शकतो. वैवाहिक जीवनात तुम्हाला जोडीदाराचं पूर्ण सहकार्य आणि पाठबळ मिळेल.Lucky Color : BlueLucky Number : 7
advertisement
4/12
कर्क (Cancer) : हा आठवडा संमिश्र फळ देणारा ठरेल. या आठवड्यात आळस आणि अहंकार दूर ठेवावा लागेल. अन्यथा काम बिघडू शकतं. त्यात सहकाऱ्यांनाही मदत करता येणार नाही. आठवड्याच्या सुरुवातीला एखाद्या प्रिय व्यक्तीसोबत झालेला वाद चिंतेचं मोठं कारण ठरू शकतो. अशा परिस्थितीत, अहंकार सोडून गैरसमज दूर करणं हिताचं ठरेल. कुटुंब किंवा पूर्वजांच्या मालमत्तेशी संबंधित वाद मिटवताना वाद घालण्याऐवजी संवादाचा आधार घ्या. आठवड्याच्या उत्तरार्धात एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने सरकारी कामं मार्गी लागतील. आर्थिक दृष्टिकोनातून हा काळ शुभ ठरेल. व्यवसायातले अडथळे दूर होतील आणि लाभ मिळेल. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. तसंच तुमच्या प्रिय व्यक्तीसह आनंदात वेळ घालवण्याची संधी मिळेल. आठवड्याच्या उत्तरार्धात जोडीदाराकडून तुम्हाला मोठं सरप्राइझ गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे.Lucky Color : WhiteLucky Number : 8
advertisement
5/12
सिंह (Leo) : हा आठवडा थोडासा चढ-उतारांचा ठरू शकतो. या आठवड्यात रागाच्या भरात किंवा भावनांच्या आहारी जाऊन कोणताही निर्णय घेणं टाळा. आठवड्याच्या सुरुवातीला कोणत्याही योजनेत किंवा व्यवसायात पैसे गुंतवताना विशेष काळजी घ्या. ती जबाबदारी इतर कोणाच्या हाती सोपवणं टाळा. अल्पकालीन फायद्यासाठी दीर्घकालीन नुकसान करून घेणं टाळा. अन्यथा मोठा आर्थिक तोटा होऊ शकतो. या काळात जमिनी किंवा इमारतींशी संबंधित वाद चिंतेचं कारण ठरू शकतात. कुटुंबीयांकडून अपेक्षित पाठिंबा न मिळाल्याने मन उदास राहू शकतं. काम टाळण्याची सवय अडचणी वाढवू शकते. आठवड्याच्या उत्तरार्धात वाहन चालवताना विशेष काळजी घ्या. कारण जखम होण्याची शक्यता आहे. अशा काळात तुमची प्रिय व्यक्ती, जोडीदार तुमच्या दुःखात आणि समस्या सोडवण्यासाठी मदतीचा हात देतील. प्रेमसंबंध टिकवायचे असतील आणि त्यात सुसंवाद रहावा असं वाटत असेल, तर जोडीदाराच्या अडचणी आणि भावना यांकडे दुर्लक्ष करू नका.Lucky Color : RedLucky Number : 2
advertisement
6/12
कन्या (Virgo) : या आठवड्यात नशीब साथ देईल. पूर्वी घेतलेल्या एखाद्या मोठ्या निर्णयाचा किंवा केलेल्या कामाचा फायदा आणि सन्मान आठवड्याच्या सुरुवातीला मिळू शकतो. आत्मविश्वास आणि धैर्य वाढल्याने बऱ्याच काळापासून अडकलेली कामं पूर्ण करू शकाल. शक्तिशाली सरकारकडून लाभ मिळू शकतो. आठवड्याच्या उत्तरार्धात मन धार्मिक आणि सामाजिक कार्यांमध्ये गुंतेल. एखाद्या संस्थेशी किंवा विशेष व्यक्तीशी जोडलं जाण्याची संधी मिळेल. त्यामुळे समाजात सन्मान वाढेल. घरात शुभ कार्याचं नियोजन होईल. तुम्ही कोणाला प्रपोज करण्याचा विचार करत असाल, तर त्यात यश मिळेल. यात एखादी मैत्रीण विशेष मदत करू शकते. तसंच, आधीपासून असलेल्या प्रेमसंबंधांमध्ये प्रेम आणि सामंजस्य वाढेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. जोडीदारासह वेळ आनंदाने व्यतीत करण्यासाठी दूरच्या किंवा जवळच्या प्रवासाला जाऊ शकता. आरोग्य सर्वसाधारण राहील.Lucky Color : YellowLucky Number : 4
advertisement
7/12
तूळ (Libra) : या आठवड्यात वेळ आणि ऊर्जेचं योग्य व्यवस्थापन केलं, तर अपेक्षेपेक्षा अधिक शुभ परिणाम मिळतील. सध्या नशिबाची कृपा असल्यामुळे घरात सर्व कुटुंबीयांचा आणि कामाच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठ सहकाऱ्यांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. नवीन प्लॅन्सवर काम करण्याची संधी मिळेल. व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. पूर्वीपासून प्रलंबित असलेल्या प्रकरणांमध्ये अपेक्षित प्रगती झाल्याने मन आनंदी राहील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना पुढे जाण्याच्या उत्तम संधी मिळू शकतात. यात एखादी मैत्रीण विशेष मदत करू शकते. आठवड्याच्या उत्तरार्धात एखादा कुटुंबीय मोठं सरप्राइज देऊ शकतो. घरात शुभ कार्य पूर्ण होऊ शकते. एखादी आवडती वस्तू खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही ती घेऊ शकता किंवा ती तुम्हाला भेट म्हणून मिळू शकते. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील आणि प्रिय व्यक्तीशी जवळीक वाढेल.Lucky Color : GreyLucky Number : 1
advertisement
8/12
वृश्चिक (Scorpio) : या आठवड्यात चिंता करणं थांबवून विचार करण्यास सुरुवात करा. आठवड्याच्या सुरुवातीला काही समस्या चिंता वाढवू शकतात; मात्र जवळच्या मित्रांची मदत दिलासादायक ठरेल. या काळात मैत्रिणीच्या मदतीने जीवनातल्या महत्त्वाच्या समस्येवर उपाय काढू शकाल. जमीन किंवा इमारतीशी संबंधित कोणताही कौटुंबिक वाद असेल, तर तो न्यायालयाच्या बाहेरच मिटवणं चांगलं ठरेल. अन्यथा दीर्घ काळ कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागू शकता. कोणासह भागीदारीत व्यवसाय करत असलात, तर तो पूर्णपणे भागीदाराच्या हाती देण्याची चूक करू नका. आर्थिक व्यवहार स्पष्ट करूनच पुढे जाणं योग्य ठरेल. या आठवड्यात प्रेमसंबंधात त्रयस्थ व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे समस्या निर्माण होऊ शकतात. नात्यात दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींपासून सावध राहा. जोडीदाराशी एखाद्या गोष्टीवरून मतभेद होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या बाबतीत विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. आरोग्याच्या समस्येकडे दुर्लक्ष केल्यास हॉस्पिटलपर्यंत जावं लागू शकतं.Lucky Color : GreenLucky Number : 3
advertisement
9/12
धनू (Sagittarius) : या आठवड्यात यशाचे योग आहेत. हा काळ मौजमजा सोडून, समोर येणाऱ्या मोठ्या संधींचा पूर्ण लाभ घेण्याचा आहे. कामाच्या ठिकाणी मोठी जबाबदारी मिळाली, तर ती सर्वोत्तम रीतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. वेळ तुमच्या बाजूने आहे. त्यामुळे वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांचंही सहकार्य मिळेल. लोक तुमचं बोलणं ऐकतील आणि तुमच्या कौशल्याची आणि मेहनतीची प्रशंसाही करतील. व्यवसायाशी संबंधित पूर्वी घेतलेले निर्णय नफ्याचं कारण ठरतील. करिअर आणि व्यवसायासाठी केलेले प्रवास फायद्याचे ठरतील. सत्ता आणि सरकारी क्षेत्राशी संबंधित व्यक्तींच्या मदतीने मोठे लाभ मिळू शकतात. एखाद्या मोठ्या आणि फायदेशीर योजनेत सहभागी होण्याची संधी मिळू शकते. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. प्रेमसंबंधात विश्वास आणि जवळीक वाढेल. कुटुंबीय तुमच्या प्रेमसंबंधांना स्वीकारून विवाहासाठी संमती देऊ शकतात. जोडीदाराशी संबंधित एखादी शुभ बातमी संपूर्ण कुटुंबाच्या आनंदाचं कारण बनेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या व्यक्तींना चांगली बातमी मिळू शकते. आरोग्य सर्वसाधारण राहील.Lucky Color : Sky BlueLucky Number : 9
advertisement
10/12
मकर (Capricorn) : हा आठवडा मध्यम फलदायी ठरेल. आठवड्याच्या सुरुवातीला काम वेळेवर पूर्ण न झाल्यामुळे मन थोडं अस्वस्थ राहील. कामातले अडथळे आणि नातेसंबंधांतली कटुता हे चिंतेचं मोठं कारण ठरू शकतं. या काळात कौटुंबिक समस्यांपासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. राजकारणाशी संबंधित व्यक्तींनी कोणत्याही गोष्टीवर प्रतिक्रिया देताना अतिशय विचारपूर्वक वागावं. अन्यथा विनाकारण अडचणींचा सामना करावा लागू शकतो. विरोधक तुमच्या वक्तव्याचा विपर्यास करून त्याचा गैरफायदा घेऊ शकतात. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठ यांच्यात सहकार्य नसल्याने समस्या निर्माण होऊ शकतात. विरोधक सक्रिय राहतील. त्यामुळे तुम्हाला अधिक सावध राहावं लागेल. या काळात सट्टा, शेअर्स आदींपासून दूर राहा. प्रेमसंबंधांबाबत पुढे जाण्याचा विचार करत असलात, तर व्यक्त होणं टाळा. अन्यथा अपमानित होण्याची वेळ येऊ शकते.Lucky Color : BrownLucky Number : 11
advertisement
11/12
कुंभ (Aquarius) : या आठवड्यात काही वेळा आनंदाची, तर काही वेळा दुःखाची स्थिती असेल. पद किंवा महत्त्वाची जबाबदारी मिळवण्यासाठी प्रतीक्षा करत असाल, तर आठवड्याच्या सुरुवातीला ही इच्छा पूर्ण होऊ शकते. यासोबतच काही समस्याही येतील. विरोधक गोंधळात टाकण्याचा प्रयत्न करतील आणि तुमच्या मार्गात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. या आठवड्यात करिअर आणि व्यवसायात प्रगतीच्या संधी मिळतील; पण तुमची तब्येत येणाऱ्या संधींमध्ये अडथळा बनेल. अशा स्थितीत दिनचर्या आणि आरोग्याची विशेष काळजी घ्या. अन्यथा हॉस्पिटलमध्ये जावं लागू शकतं. हंगामी आजारांविषयी सतर्क राहा. आठवड्याचा उत्तरार्ध पूर्वार्धापेक्षा थोडा आरामदायक असेल. या काळात एका मैत्रिणीच्या मदतीने प्रेमसंबंधांमधले गैरसमज दूर होतील आणि प्रेमसंबंधांतला गोडवा परत येईल. अडचणीच्या वेळी जोडीदारासोबत राहिल्यामुळे समस्या सोडवणं सोपं होईल.Lucky Color : PurpleLucky Number : 15
advertisement
12/12
मीन (Pisces) : या आठवड्यात नशिबाचा योग आहे. आठवड्याच्या सुरुवातीला घरात काही धार्मिक किंवा शुभकार्य होऊ शकतं. बऱ्याच काळानंतर एखाद्या प्रिय व्यक्तीला भेटून मन आनंदित होईल. सत्तेशी किंवा सरकारशी संबंधित एखादी गोष्ट दीर्घ काळ अडकलेली असली, तर या आठवड्यात त्यात यश मिळवू शकाल. सरकारचा निर्णय तुम्हाला अनुकूल राहील. नोकरदार व्यक्तींच्या कामासाठी बॉस प्रशंसा करील आणि अतिरिक्त उत्पन्नाचे स्रोत निर्माण होतील. व्यवसायामध्ये अपेक्षित नफा मिळेल आणि तो पुढे नेण्याच्या संधी प्राप्त होतील. व्यवसायासाठी केलेले अनेक प्रवास सुखद आणि फायदेशीर ठरतील. स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना बहुप्रतीक्षित यश मिळू शकेल. गृहिणी या आठवड्यात बहुतेकसा वेळ धार्मिक कार्यांमध्ये व्यतीत करतील. प्रेमाच्या बाबतीत तुमची गाडी वेगाने ट्रॅकवर धावणार आहे. प्रेमसंबंध अधिक चांगले होतील आणि जोडीदारासह चांगला काळ घालवता येईल. विवाहित जीवन सुखी राहील. मुलांचं यश हे आनंदाचं मुख्य कारण असेल.Lucky Color : CreamLucky Number : 12
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Weekly Horoscope: सगळीकडून गुड न्यूज! फेब्रुवारीचा दुसरा आठवडा या राशींना लकी; संपूर्ण साप्ताहिक राशीभविष्य