TRENDING:

Numerology: डिसेंबरचा चौथा आठवडा मूलांक 1, 2, 3, 4 असलेल्यांसाठी कसा? इतक्या गोष्टींमध्ये नशिबाची साथ

Last Updated:
Weekly Numerology: दिनांक 22 डिसेंबरपासून चौथा आठवडा सुरू होत आहे. वर्ष संपण्याच्या शेवटच्या टप्प्यात असून शेवटी कोणासाठी नशिबाची साथ कशी मिळेल हे आपण अंकशास्त्राद्वारे समजून घेणार आहोत. मूलांक 1 ते 4 यांचे साप्ताहिक अंकशास्त्र जाणून घेणार आहे.
advertisement
1/6
डिसेंबरचा चौथा आठवडा मूलांक 1, 2, 3, 4 असलेल्यांसाठी कसा? इतक्या गोष्टींमध्ये लक
अंक 1 (ज्यांचा जन्म 1, 10, 19 किंवा 28 तारखेला झाला आहे)आर्थिक प्रगती ही एखाद्या प्रवासासारखी असते, लगेच सगळं मिळेल असं नाही. या आठवड्यात स्वतःसाठी नवी उद्दिष्टं ठरवा आणि त्यासाठी प्रयत्न करत राहा. हळूहळू तुमची आर्थिक स्थिती स्थिर होईल. प्रेमाच्या बाबतीत स्वतःशी प्रामाणिक राहणं खूप गरजेचं आहे. तुमच्या अपेक्षा आणि मूल्यांशी तडजोड करू नका. योग्य व्यक्ती योग्य वेळी आयुष्यात येईल, यावर विश्वास ठेवा. ज्यांच्या नात्यात अडचणी आहेत त्यांनी थोडा मागे हटून स्वतःकडे लक्ष द्यावं. यामुळे गोष्टी स्पष्ट दिसतील.
advertisement
2/6
मूलांक 1 साठी आठवडाभराची वेळ अनेक अर्थाने खास ठरू शकते. काहीतरी नवीन आणि आनंद देणारं साध्य होईल. आर्थिक स्थैर्य आणि मानसिक समाधान मिळाल्यामुळे जीवनात योग्य निर्णय घेता येतील. स्वतःच्या इच्छा अशा पद्धतीने ठरवा की तुम्ही तुमचं आयुष्य स्वतः सांभाळू शकाल.
advertisement
3/6
अंक 2 (ज्यांचा जन्म 2, 11, 20 किंवा 29 तारखेला झाला आहे)पैशांबाबत अडचणी असतील तर या आठवड्यात परिस्थिती सुधारू शकते. आर्थिक प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी ही वेळ चांगली आहे. पैसे मिळवणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच त्यांचं योग्य व्यवस्थापनही गरजेचं आहे. घाईघाईने निर्णय घेऊ नका. नात्यांमध्ये संवाद फार महत्त्वाचा आहे. नात्यात असाल तर मोकळेपणाने बोलणं जवळीक वाढवेल. सिंगल असाल तर तुम्हाला काय हवं आहे हे स्पष्ट ठेवलं तर योग्य व्यक्ती भेटू शकते. हा आठवडा आयुष्यात काहीतरी सकारात्मक घेऊन येईल. गुंतागुंतीच्या गोष्टी सोडवण्यासाठी संयम ठेवा. वैयक्तिक आणि कामाच्या आयुष्यात संवादाचं महत्त्व ओळखा. लवकरच तुमच्या प्रयत्नांचे चांगले परिणाम दिसून येतील.
advertisement
4/6
अंक 3 (ज्यांचा जन्म 3, 12, 21 किंवा 30 तारखेला झाला आहे)या आठवड्यात मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर करिअरमधली स्वप्नं पूर्ण होऊ शकतात. पैशांच्या बाबतीत एकूण परिस्थिती पाहून निर्णय घ्या. उत्पन्न, खर्च, कर्ज आणि बचत सगळ्याचा विचार करा. असं केल्याने योग्य आर्थिक निर्णय घेता येतील. प्रेमात थोडे चढ-उतार येऊ शकतात, पण एकमेकांवरचा विश्वास तुम्हाला सावरून घेईल. संयम ठेवून नातं जपा.
advertisement
5/6
मूलांक कुटुंबासाठीही हा आठवडा महत्त्वाचा आहे. आयुष्यात तुम्हाला नेमकं काय हवं आहे हे स्पष्ट होईल. मागील काही दिवस खूप धावपळ झाली असेल, आता छोट्या छोट्या गोष्टींत आनंद घ्या. लवकरच परिस्थिती सुधारेल आणि अभिमान वाटावा असं काहीतरी घडेल.
advertisement
6/6
अंक 4 (ज्यांचा जन्म 4, 13, 22 किंवा 31 तारखेला झाला आहे)स्वतःच्या ताकदी आणि कमतरता ओळखून पुढची पावलं टाका. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी बजेट तयार करणं फायदेशीर ठरेल. यामुळे खर्च आणि बचत योग्य पद्धतीने करता येईल. सगळे उत्पन्न आणि खर्च, कर्जासह नोंदवणं महत्त्वाचं आहे. जोडीदारासोबत शांतपणे बोलून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. यामुळे नातं सुधारेल. नेहमी भेटणं शक्य नसलं तरी समजूतदारपणा आणि भावना टिकवून ठेवा. हा आठवडा नवीन सुरुवातींसाठी चांगली संधी देणारा आहे. स्वतःत सुधारणा करण्यासाठी मिळणाऱ्या संधींचा योग्य वापर करा. छोट्या वादात वेळ घालवू नका, आयुष्यातल्या मोठ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Numerology: डिसेंबरचा चौथा आठवडा मूलांक 1, 2, 3, 4 असलेल्यांसाठी कसा? इतक्या गोष्टींमध्ये नशिबाची साथ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल