TRENDING:

ShaniDev: खूप दु:खात काढले दिवस, आणखी काही काळ! शनि महाराज या राशीची सगळ्यातून सुटका करणार

Last Updated:
ShaniDev Astrology: रास पाहून तज्ज्ञ ज्योतिषी काही लोकांना कोणतेही मोठे व्यवहार, गुंतवणूक, प्रोजेक्ट सुरू न करण्याचा सल्ला देतात. सध्या काहीच वेगळं करू नका, आहे तसंच चालू राहू दे फक्त देवाचं नामस्मरण, हनुमान चालिसा वाचा, असं सांगतात. असा सल्ला शक्यतो साडेसाती सुरू असल्यानंतर दिला जातो. त्यातही साडेसातीचा दुसरा टप्पा चालू असल्यास ज्योतिषी कोणता प्रभावी उपायसुद्धा सांगत नाहीत. आज आपण शनिच्या साडेसातीविषयी जाणून घेत आहोत. आता लवकरच एका राशीला साडेसातीतून मुक्तता मिळणार आहे.
advertisement
1/7
खूप दु:खात काढले दिवस, आणखी काही काळ! शनि महाराज या राशीची सगळ्यातून सुटका करणार
सध्या शनी मीन राशीत असल्यानं कुंभ राशीला शनीच्या साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू आहे. शनिदेव मेष राशीत प्रवेश करताच, कुंभेच्या लोकांची साडेसातीमधून मुक्तता होईल. 2027 मध्ये शनिची रास बदलेल. 3 जून 2027 रोजी शनी मेष राशीत प्रवेश करेल. या राशीत शनीचे भ्रमण सुरू होताच, कुंभ राशीचे भाग्य चमकेल. ज्योतिषशास्त्रानुसार, शनी मीन राशीतून निघताना कुंभेच्या लोकांना विशेष लाभ देईल.
advertisement
2/7
3 जून 2027 रोजी शनी मेष राशीत प्रवेश करेल. या राशीत शनीचे भ्रमण सुरू होताच, कुंभ राशीला शनीच्या साडेसतीपासून मुक्तता मिळेल. पण, 2027 मध्ये शनी 20 ऑक्टोबर रोजी वक्री चाल करून पुन्हा मीन राशीत परत येईल, ज्यामुळे कुंभ राशीला पुन्हा शनिच्या साडेसातीचा प्रभाव पडेल.
advertisement
3/7
तथापि, यावेळी साडेसातीसारखा तितकासा त्रास जाणवणार नाही. 23 फेब्रुवारी 2028 रोजी शनि मेष राशीत परत येईल. म्हणजेच 2028 मध्येच कुंभ राशीचे लोक शनीच्या साडेसतीतून पूर्णपणे मुक्त होतील.
advertisement
4/7
शनिची साडेसाती संपताच कुंभ राशीच्या लोकांचे नशीब चमकेल. त्यांच्या कारकिर्दीत स्थिरता आणि प्रगती होईल. बढतीची शक्यता वाढेल. नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. प्रलंबित कामे पूर्ण होतील.
advertisement
5/7
आर्थिक अडचणींमधून सुटका होईल, इनकम वाढल्यानं कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल.कोणाकडे तरी अडकलेले पैसे वसूल होतील. गुंतवणुकीतून चांगला नफा मिळेल.
advertisement
6/7
कुंभ राशीच्या लोकांचा आत्मविश्वास जबरदस्त वाढेल. तुमची निर्णय घेण्याची क्षमता चांगली होईल. तुम्हाला मानसिक आणि भावनिकदृष्ट्या छान वाटेल. नातेसंबंध गोड होतील. वैवाहिक जीवन अधिक आनंददायी होईल.
advertisement
7/7
शनिला प्रसन्न करण्यासाठी कुंभ राशीच्या लोकांनी काय करावे?"ॐ शं शनैश्चराय नमः" हा मंत्र जप करा. पिंपळ किंवा शमीच्या झाडाला पाणी अर्पण करा. गरजूंना काळे उडद, काळे तेल किंवा काळे कपडे दान करा. भगवान शिव आणि हनुमानाची पूजा करा.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
ShaniDev: खूप दु:खात काढले दिवस, आणखी काही काळ! शनि महाराज या राशीची सगळ्यातून सुटका करणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल