TRENDING:

Numerology: आयुष्याची लक्ष्मी..! या जन्मतारखांच्या महिलांचा पतीच्या प्रगतीला मोठा हातभार लागतो

Last Updated:
Numerology Marathi: कोणाचं नशीब कधी चमकेल याचा काही अंदाज सांगता येत नाही. पण आपण नेहमी ज्याच्या सहवासात असतो, त्या व्यक्तीच्या गोष्टींचा आपल्या प्रभाव राहतो. थोडक्यात सांगायचं तर आपला जोडीदार कसा आहे, याचा आपल्या प्रगतीशी संबंध प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष असतोच. एक कष्टाळू महिला पतीचे आणि कुटुंबाचे आयुष्य बदलू शकते. अंकशास्त्राचा विचार करायला गेल्यास काही मूलांकाच्या स्त्रिया पतीच्या प्रगतीसाठी अनुकूल मानल्या जातात. तशा गोष्टी त्यांच्या स्वभावामध्ये असतात.
advertisement
1/5
आयुष्याची लक्ष्मी..! या जन्मतारखांच्या महिलांचा पतीच्या प्रगतीला मोठा हातभार
खासकरून स्त्रियांच्या बाबतीत काही मूलांक असे आहेत, ज्यात नैसर्गिकरित्या सौंदर्य, आकर्षण आणि सौभाग्य यांचा संगम दिसून येतो. जाणून घेऊया, कोणत्या मूलांकाच्या स्त्रिया आपल्यासोबत कुटुंबाचे भाग्यही बदलू शकतात.
advertisement
2/5
मूलांक 1 (जन्म तारीख: 1, 10, 19 किंवा 28)ज्या स्त्रियांचा जन्म 1, 10, 19 किंवा 28 तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक 1 असतो. या अंकाचा स्वामी ग्रह सूर्य आहे, जो शक्ती, नेतृत्व आणि आत्मविश्वासाचं प्रतीक आहे. मूलांक 1 च्या स्त्रिया स्वभावाने स्वतंत्र आणि दृढ इच्छाशक्तीच्या असतात. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एक प्रकारची चमक असते, त्या इतरांना सहज आकर्षित करतात. त्या जिथेही जातात, तिथं त्यांच्या ऊर्जा आणि नेतृत्व क्षमतेने सर्वांवर प्रभाव टाकतात. असं म्हटलं जातं की, मूलांक 1 च्या स्त्रिया ज्या व्यक्तीच्या आयुष्यात येतात त्याच्या नशिबात प्रगतीचे दार उघडते.
advertisement
3/5
मूलांक 3 (जन्म तारीख: 3, 12, 21 किंवा 30)ज्यांचा जन्म 3, 12, 21 किंवा 30 तारखेला झाला असेल तर तुमचा मूलांक 3 आहे. या मूलांकाचा स्वामी ग्रह गुरू (बृहस्पति) आहे. हा ग्रह ज्ञान, सकारात्मकता आणि सौम्यतेचं प्रतिनिधित्व करतो.
advertisement
4/5
मूलांक 3 च्या स्त्रिया खूप आकर्षक आणि मनमिळाऊ स्वभावाच्या असतात. त्या मनाने दयाळू आणि संवेदनशील असतात, त्यांच्या हास्यामध्ये आपलेपणा आणि डोळ्यांमध्ये आत्मविश्वास दिसतो. या स्त्रिया आपल्या जीवनसाथीसाठी अत्यंत शुभ मानल्या जातात आणि त्या वैवाहिक जीवनात स्थिरता आणि सौभाग्य घेऊन येतात.
advertisement
5/5
मूलांक 6 (जन्म तारीख: 6, 15 किंवा 24)ज्यांचा जन्म महिन्याच्या 6, 15 किंवा 24 तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक 6 असतो. या अंकाचा स्वामी ग्रह शुक्र आहे, ज्याला सौंदर्य, प्रेम आणि कलेचं प्रतीक मानलं जातं. मूलांक 6 च्या स्त्रिया नैसर्गिकरित्या आकर्षक असतात. त्यांच्या त्वचेवर एक अनोखी चमक, डोळ्यांमध्ये एक सखोलता आणि हास्यामध्ये वेगळंच आकर्षण असतं. त्या फॅशन-सेन्समध्येही निपुण असतात आणि जिथंही जातात तिथं आपल्या उपस्थितीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतात. या स्त्रिया भाग्यवान मानल्या जातात. आयुष्यात त्यांची साथ मिळाल्यास प्रेम, समृद्धी आणि यशाच्या संधी वाढतात.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Numerology: आयुष्याची लक्ष्मी..! या जन्मतारखांच्या महिलांचा पतीच्या प्रगतीला मोठा हातभार लागतो
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल