Astrology: विजय आपलाच होता! पहाटे 4.27 वाजताच तारे फिरलेत; जल्लोष करण्याची संधी 5 राशींच्या वाट्याला
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Mangal Gochar 2026: ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या स्थितीला महत्त्व आहे. मंगळ ग्रह आज 16 जानेवारी, शुक्रवारी पहाटे 4 वाजून 27 मिनिटांनी मकर या आपल्या उच्च राशीत प्रवेश करून बसला आहे. मकर राशीत मंगळासोबत सूर्य आणि शुक्र देखील असल्याने आदित्य मंगल योग, त्रिग्रही योग आणि रुचक राजयोग तयार झालेत. मंगळ हा ऊर्जा, साहस आणि आत्मविश्वासाचा कारक मानला जातो. या बदलामुळे मेष ते मीन अशा सर्व राशींवर परिणाम होणार असला तरी, पाच राशींसाठी हा काळ विशेष फायदेशीर ठरणार आहे.
advertisement
1/5

मेष - मंगळ तुमच्या राशीच्या दहाव्या स्थानात असून तो तुमच्या राशीचा स्वामी देखील आहे. या काळात तुमच्यावर मोठ्या जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात किंवा तुम्हाला एखादे नेतृत्व पद मिळू शकते. वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात शिस्त किती महत्त्वाची आहे, हे तुम्हाला आता समजेल. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल, पण तुम्ही अधिक मिळवण्याच्या जिद्दीने पुढे जाल. घर किंवा वाहन खरेदीचे तुमचे स्वप्न या काळात पूर्ण होऊ शकते.
advertisement
2/5
सिंह - मंगळ तुमच्या राशीच्या सहाव्या स्थानात गेला आहे. यामुळे तुमच्या कष्टाचे पूर्ण फळ तुम्हाला मिळेल आणि पैशांच्या कमाईचे नवीन मार्ग सापडतील. जर तुमचा व्यवसाय मंदावला असेल, तर आता त्यात सकारात्मक बदल होतील. नोकरी करणाऱ्यांच्या कामाचे वरिष्ठांकडून कौतुक होईल, ज्यामुळे प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. कौटुंबिक आरोग्य सुधारेल आणि जोडीदारासोबत तुम्ही एखादी संपत्ती खरेदी करू शकता.
advertisement
3/5
धनु - मंगळ तुमच्या राशीच्या दुसऱ्या स्थानात गोचर करत आहे. आर्थिक विकासाच्या दृष्टीने हा काळ खूप महत्त्वाचा आहे. फायदेशीर गुंतवणूक करण्याची प्रेरणा तुम्हाला मिळेल, ज्याचा भविष्यात मोठा लाभ होईल. भावंडांशी आणि कुटुंबातील इतर सदस्यांशी तुमचे संबंध सुधारतील. विशेषतः परदेशी कंपन्यांशी संबंधित काम करणाऱ्यांना या काळात चांगली प्रगती पाहायला मिळेल. नात्यांमधील गैरसमज दूर होतील.
advertisement
4/5
मकर - मंगळ तुमच्याच राशीत पहिल्या स्थानात (लग्न) असून तिथे सूर्य आणि शुक्र देखील आहेत. व्यावसायिक आयुष्यात काम आणि प्रवास यांच्यात संतुलन राखणे तुम्हाला फायदेशीर ठरेल. आर्थिक लाभाच्या अनेक संधी मिळतील, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती भक्कम होईल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा काळ अत्यंत अनुकूल आहे. या काळात तुम्हाला समाजात अधिक समृद्धी आणि मानसन्मान मिळेल.
advertisement
5/5
मीन - मंगळ तुमच्या राशीच्या 11 व्या स्थानात प्रवेश करत आहे. यामुळे तुमच्या आयुष्यात दीर्घकालीन सकारात्मक बदल घडतील. व्यवसायात केलेल्या परिश्रमांचे उत्तम फळ आणि पुरस्कार मिळण्याची वेळ आली आहे. प्रवासातून धनलाभाचे योग आहेत. सामाजिक जीवनात तुमचा वावर वाढेल आणि मित्र-परिवारासोबत तुम्ही आनंदी वेळ घालवू शकाल. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन सुखाचे राहील.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Astrology: विजय आपलाच होता! पहाटे 4.27 वाजताच तारे फिरलेत; जल्लोष करण्याची संधी 5 राशींच्या वाट्याला