बिग बॉस फेम अभिनेत्रीला झटका, हातात हात धरून केला प्रचार, पण झाला नाही फायदा; उमेदवार पतीचा दारूण पराभव
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
अभिनेत्री आणि 'बिग बॉस' फेम तेजस्विनी लोणारी हिचे पती समाधान सरवणकर यांना या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे.
advertisement
1/8

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निकालांनी आज उभ्या महाराष्ट्राला हादरवून सोडले आहे. राज्यातील महापालिका निवडणुकीत यंदा हाय-व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला; पण सर्वात मोठा धक्का बसला आहे तो म्हणजे प्रभादेवी-दादर परिसरात.
advertisement
2/8
अभिनेत्री आणि 'बिग बॉस' फेम तेजस्विनी लोणारी हिचे पती समाधान सरवणकर यांना या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. ज्या प्रभादेवीत सरवणकर कुटुंबाचे वर्चस्व मानले जायचे, तिथेच ठाकरेंच्या शिवसेनेने भगवा फडकवून शिंदेसेनेला मोठा झटका दिला आहे.
advertisement
3/8
प्रभाग क्रमांक १९४ मध्ये ही लढत केवळ दोन उमेदवारांची नव्हती, तर ती दोन शिवसेनेच्या अस्तित्वाची लढाई होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर यांना मैदानात उतरवले होते, तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी सुनील शिंदे यांचे बंधू निशिकांत शिंदे यांच्यावर विश्वास टाकला होता.
advertisement
4/8
तब्बल २० वर्षांनंतर राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याचा मोठा फायदा या वॉर्डमध्ये झाला असून, मतदारांनी निशिकांत शिंदेंच्या पारड्यात आपले मत टाकले आहे.
advertisement
5/8
काही महिन्यांपूर्वीच समाधान सरवणकर आणि तेजस्विनी लोणारी यांचे लग्न झाले होते. लग्नानंतरची ही पहिलीच निवडणूक असल्याने तेजस्विनीने आपल्या पतीसाठी जिवाचे रान केले होते.
advertisement
6/8
स्वतः अभिनेत्री असल्याने तिने सोशल मीडियापासून ते प्रभागातील गल्लीबोळापर्यंत पदयात्रा काढून मोठा प्रचार केला होता. एक सेलिब्रिटी चेहरा सोबत असूनही दादर-प्रभादेवीतील मतदारांनी मात्र 'ठाकरे ब्रँड'लाच पसंती दिली आहे.
advertisement
7/8
मतदानानंतर काल अनेक संस्थांनी जाहीर केलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजप-शिंदे महायुतीला बहुमत मिळेल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता; मात्र समाधान सरवणकर यांचा पराभव हा शिंदे गटासाठी मोठा मानहानीकारक ठरला आहे.
advertisement
8/8
आता सर्वांचे लक्ष समाधान यांची बहीण प्रिया सरवणकर-गुरव यांच्या निकालाकडे लागले आहे. त्यांनाही शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवारी दिली असून, त्यांचा प्रभाग काय कौल देतो, यावर सरवणकर कुटुंबाचे राजकीय भविष्य अवलंबून आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
बिग बॉस फेम अभिनेत्रीला झटका, हातात हात धरून केला प्रचार, पण झाला नाही फायदा; उमेदवार पतीचा दारूण पराभव