TRENDING:

भारत सोडून लंडनमध्ये थाटलाय संसार, तरी 'विरुष्का'ला अलिबागची ओढ; खरेदी केली सी-साइड प्रॉपर्टी

Last Updated:
Virat Kohli - Anushka Sharma Alibaug Property : विराट आणि अनुष्का यांनी अलिबागमध्ये नवीन कोटी रुपयांची प्रॉपर्टी खरेदी केली आहे. त्यांनी मुलांसह भारत सोडून लंडनमध्ये संसार थाटला आहे पण त्यांची अलिबागची ओढ काही थांबायचं नाव घेत नाहीये.
advertisement
1/9
लंडनमध्ये संसार, तरी 'विरुष्का'ला अलिबागची ओढ; खरेदी केली  सी-साइड प्रॉपर्टी
बॉलिवूड सेलिब्रेटींचा ओढा हा मुंबईसोडून आता अलिबागच्या दिशेनं वळत आहे. अनेक बॉलिवूड कलाकारांनी अलिबागमध्ये प्रॉपर्टी घेतलेली आहे. अशातच आता आणखी एक पावर कपल अलिबागमध्ये गेलं आहे ते म्हणजे विराट आणि अनुष्का.
advertisement
2/9
विरुष्काने आपला संसार तर लंडनमध्ये थाटला आहे. पण त्यांना ओढ मात्र अलिबागची आहे. विराट  आणि अनुष्का यांनी मुंबईला लागून असलेल्या अलिबाग या किनारी शहरात आणखी एक मोठी जागा खरेदी केली आहे. 
advertisement
3/9
रायगड जिल्ह्यात येणाऱ्या अलिबागच्या जिराड गावात ही जमीन असल्याची माहिती समोर येत आहे. आवास बीचला लागूनचा विराट आणि अनुष्काने जागा खरेदी केली आहे. मागच्या चार वर्षात विराट अनुष्काने दुसरी मोठी खरेदी केली आहे. ज्या किंमतीला विरुष्काने जागा खरेदी केली आहे ती किंमत ऐकून तुम्ही शॉक व्हाल.
advertisement
4/9
 लाईव्ह मिंटच्या वृत्तानुसार, 13 जानेवारी रोजी प्लॉट नोंदणी झाली आहे. अलिबागच्या जिराड गावातील जमीन समीरा लँड अॅसेट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालक सोनाली अमित राजपूत यांच्याकडून खरेदी करण्यात आली होती. 
advertisement
5/9
गेल्या वर्षीच्या अखेरीस विराटने त्याचा मोठा भाऊ विकास कोहलीला जनरल पॉवर ऑफ अॅटर्नी (GPA) सोपवल्यानंतर हा करार अंतिम झाला. विराटकडे गुरुग्राममधील DLF फेज 1 मध्ये सुमारे 80 कोटी किमतीचे आलिशान घर आहे.
advertisement
6/9
अनुष्का आणि विराट यांचं अलिबागमध्ये हे दुसरं घर. 2022 मध्ये विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी रिअल इस्टेट डेव्हलपर समीरा हॅबिटॅट्सकडून सुमारे आठ एकर जमीन 19.24 कोटी रुपयांना दोन वेगवेगळ्या डीलद्वारे खरेदी केली.  या जमिनीवर त्यांनी आलिशानघर बांधले आहे. अनेकदा सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी ते अलिबागमध्ये येताना दिसले आहेत. विरुष्कासाठी एक नाही अलिबागमध्ये दोन सुट्ट्यांची ठिकाणं झाली आहेत. 
advertisement
7/9
विराट आणि अनुष्का यांनी खरेदी केलेली ही जागा 5.19 एकराची आहे. जिराड गावात असलेल्या या जागेची एकूण किंमत ₹37.86 कोटी असल्याची माहिती समोर आली आहे. अनुष्का आणि विराट यांनी केवळ 2.27 कोटी स्टॅम्प ड्युटी भरून ही जागा ताब्यात घेतली आहे. 
advertisement
8/9
 अनेक हाय-प्रोफाइल सेलिब्रिटींनी अलिबागमध्ये गुंतवणूक केली आहे. माजी भारतीय कर्णधार रोहित शर्माकडेही या भागात 4 एकर जमीन आहे.  दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग यांनी 2021 मध्ये मापगावमध्ये अंदाजे 22  कोटी रुपयांचा एक आलिशान बंगला खरेदी केला होता.
advertisement
9/9
अनुष्का आणि विराटने नवीन खरेदी केलेल्या जमिनीपासून हा भूखंड 10 किलोमीटर अंतरावर असल्याचे सांगण्यात येते. सुहानाने शाहरुख खान यांच्या पावलावर पाऊल ठेवून 2023 मध्ये थळ गावात तीन घरांसह 1.5 एकर जमीन 12.91  कोटी रुपयांना खरेदी केली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
भारत सोडून लंडनमध्ये थाटलाय संसार, तरी 'विरुष्का'ला अलिबागची ओढ; खरेदी केली सी-साइड प्रॉपर्टी
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल