Astrology: मिथुनसह या 4 राशींना बॅडलक! मंगळ-शनिच्या अभद्र युतीनं मोठी संकटे धडाधड कोसळणार
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Mangal Astrology: मंगळ ग्रह कन्या राशीत भ्रमण करणार आहे, तिथं राहू आधीच विराजमान आहे. शनि मीन राशीत वक्री अवस्थेत आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, कन्या राशीत मंगळ आणि मीन राशीत शनि यांच्यात दृष्टी संबंध असेल, ज्यामुळे समसप्तक योग तयार होत असून असा संयोग ३० वर्षांनंतर घडत आहे.
advertisement
1/5

मंगळ आणि मीन यांच्यातील दृष्टी संबंध ४ राशींसाठी संकटे आणि अडचणीचा ठरू शकतो. या राशींना पैशांशी संबंधित अडचणी अचानक येऊ शकतात, कुटुंबात काही प्रकारची उलथापालथ होईल. ३० वर्षांनंतर मंगळ आणि शनीच्या युतीमुळे कोणत्या राशींना समस्या येऊ शकतात ते जाणून घेऊया.
advertisement
2/5
मंगळ-शनीच्या समसप्तक योगामुळे वृषभ राशीच्या लोकांना फार विचारपूर्वक काम करावे. वृषभ राशीच्या लोकांनी या काळात कोणाशीही पैशाचे व्यवहार करू नयेत, अन्यथा पैसे परत मिळण्याची शक्यता नाही. या राशीच्या नोकरदार लोकांनी आपले काम नीट सांभाळून करावं, ऑफिसमध्ये कोणत्याही प्रकारच्या वादापासून दूर राहा. वृषभ राशीच्या लोकांना मंगळ आणि शनिमुळे प्रेम जीवनात अनेक समस्या येऊ शकतात.
advertisement
3/5
मंगळ-शनिच्या समसप्तक योगामुळे मिथुन राशीच्या लोकांना अनेक समस्या येऊ शकतात. मिथुन राशीच्या लोकांना कौटुंबिक जीवनात अडचणींचा सामना करावा लागू शकतो, ज्यामुळे मानसिक ताण येऊ शकतो. या काळात व्यावसायिकांनी कोणालाही उधारीवर वस्तू देणे टाळावे आणि कोणत्याही प्रकारच्या वादापासून दूर राहावे.
advertisement
4/5
मंगळ-शनी समसप्तक योगामुळे सिंह राशीच्या लोकांना चढ-उतारांचा सामना करावा लागू शकतो. सिंह राशीच्या लोकांनी या काळात आरोग्याची काळजी घ्यावी, कामाची जाणीव ठेवावी. या राशीच्या नोकरदार लोकांनी अधिकाऱ्यांशी बोलताना काळजी घ्यावी, अन्यथा त्रास होऊ शकतो. सिंह राशीच्या लोकांनी कोणालाही पैसे उधार देणे टाळावे, अन्यथा ते परत येण्याची शक्यता कमी नसेल.
advertisement
5/5
वृश्चिक - मंगळ-शनिच्या समसप्तक योगामुळे वृश्चिक राशीच्या लोकांना अनेक समस्या उद्भवू शकतात. या योगाच्या प्रभावामुळे वृश्चिक राशीच्या लोकांना व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता आहे, नोकरी करणाऱ्यांच्या नोकऱ्याही धोक्यात येऊ शकतात. यामुळे जवळच्या नातेवाईकांशी भांडणे होऊ शकतात आणि कुटुंबात अशांत वातावरण निर्माण होऊ शकते. या काळात बोलताना सावधगिरी बाळगली पाहिजे, शब्दांनी अनावधानानं प्रियजनांना दुखवू शकता. पैशाची व्यवस्था करा, कारण तुमच्या खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Astrology: मिथुनसह या 4 राशींना बॅडलक! मंगळ-शनिच्या अभद्र युतीनं मोठी संकटे धडाधड कोसळणार