TRENDING:

आईने रंगेहात पकडलं अन्... 3 महिन्यातच झाला होता हृता दुर्गुळेचा ब्रेकअप, स्वतः सांगितलं नक्की काय घडलं होतं?

Last Updated:
हृता दुर्गुळे आणि ललित प्रभाकर ‘आरपार’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. हृताने पहिल्या प्रेमाचा मजेशीर किस्सा ‘जस्ट नील थिंग्स’ मुलाखतीत सांगितला.
advertisement
1/6
आईने रंगेहात पकडलं अन्... 3 महिन्यातच झाला होता हृता दुर्गुळेचा ब्रेकअप
मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री हृता दुर्गुळे सध्या तिच्या ‘आरपार’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता ललित प्रभाकर आहे.
advertisement
2/6
या दोघांच्या केमिस्ट्रीने सध्या प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. याच प्रमोशनदरम्यान, हृताने तिच्या पहिल्या प्रेमाबद्दलचा एक खूपच मजेशीर किस्सा सांगितला आहे.
advertisement
3/6
हृता आणि ललितने नुकतंच ‘जस्ट नील थिंग्स’ या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवर मुलाखत दिली. यात हृताला तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक प्रश्न विचारण्यात आले. तिच्या पहिल्या प्रेमाबद्दल विचारल्यावर ती सुरुवातीला हसू लागली, पण नंतर तिने तो किस्सा स्पष्टपणे सांगितला.
advertisement
4/6
हृता म्हणाली, “मी आठवीत असताना एका मित्राने मला प्रपोज केलं होतं. ते खरं तर फोनवरचं नातं होतं. कारण, त्यावेळी माझ्याकडे स्वतःचा मोबाईल नव्हता. त्यामुळे मी गुपचूप आईच्या फोनवरून त्याच्याशी बोलायचे.”
advertisement
5/6
हृता पुढे म्हणाली, “एकदा आईनेच मला रंगेहात पकडलं.” त्यावेळी त्यांना प्रेमाची खरी समज नव्हती, केवळ आकर्षण वाटायचं, म्हणूनच त्याला प्रेम मानत होतो, असंही तिने स्पष्ट केलं.
advertisement
6/6
हृताने पुढे सांगितलं की, तिचं हे पहिलं प्रेम फार काळ टिकलं नाही. “अवघ्या दोन-तीन महिन्यांतच हे नातं संपलं. तो मुलगा माझ्या शाळेतला नव्हता. आम्ही एका म्युच्युअल फ्रेंडमुळे भेटलो होतो.”
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
आईने रंगेहात पकडलं अन्... 3 महिन्यातच झाला होता हृता दुर्गुळेचा ब्रेकअप, स्वतः सांगितलं नक्की काय घडलं होतं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल