TRENDING:

वर्षाच्या शेवटी वेळ आलीच! 19 डिसेंबरची मार्गशीर्ष अमावस्या या 3 राशींचा गोल्डन टाइम सुरू करणार

Last Updated:
Margashirsha Amavasya :  हिंदू पंचांगात अमावस्या तिथीला विशेष धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. प्रत्येक महिन्यात येणारी अमावस्या वेगवेगळ्या कारणांसाठी पूजनीय मानली जाते, मात्र मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्या अधिक पुण्यदायी समजली जाते.
advertisement
1/6
19 डिसेंबरची मार्गशीर्ष अमावस्या या 3 राशींचा गोल्डन टाइम सुरू करणार
हिंदू पंचांगात अमावस्या तिथीला विशेष धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. प्रत्येक महिन्यात येणारी अमावस्या वेगवेगळ्या कारणांसाठी पूजनीय मानली जाते, मात्र मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्या अधिक पुण्यदायी समजली जाते. या अमावस्येला पितृतर्पण, स्नान, दान आणि जप-तप केल्यास विशेष फळ प्राप्त होते, अशी धार्मिक मान्यता आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणेच यंदाही भाविकांमध्ये मार्गशीर्ष अमावस्या नेमकी कोणत्या दिवशी आहे, याबाबत चर्चा सुरू आहे. 2025 मध्ये ही अमावस्या 18 डिसेंबर की 19 डिसेंबरला येणार? याविषयी अनेकांना संभ्रम आहे.
advertisement
2/6
हिंदू पंचांगानुसार, मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्या तिथी शुक्रवार, 19 डिसेंबर 2025 रोजी पहाटे 4 वाजून 59 मिनिटांनी सुरू होईल. ही तिथी शनिवारी, 20 डिसेंबर रोजी सकाळी 7 वाजून 12 मिनिटांपर्यंत असेल. धार्मिक नियमांनुसार, अमावस्या व्रत, स्नान आणि दान त्या दिवशी केले जाते ज्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी अमावस्या तिथी अस्तित्वात असते. त्यामुळे 19 डिसेंबर 2025 हा मार्गशीर्ष अमावस्या साजरी करण्याचा मुख्य दिवस मानला जाणार आहे. या दिवशी अनेक भाविक नदीस्नान, दानधर्म, पितृपूजन आणि विशेष पूजा विधी करतात.
advertisement
3/6
मेष - राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ प्रगतीचा ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी नवीन संधी उपलब्ध होतील आणि नेतृत्वगुणांना वाव मिळेल. नोकरीत पदोन्नती किंवा व्यवसायात विस्ताराचे योग आहेत. आर्थिकदृष्ट्या अचानक लाभ होऊ शकतो. जुनी गुंतवणूक फायदेशीर ठरेल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील. कौटुंबिक पातळीवर समाधान आणि स्थैर्य अनुभवायला मिळेल.
advertisement
4/6
सिंह - राशीच्या लोकांसाठी मार्गशीर्ष अमावस्या सौख्यदायक ठरणार आहे. समाजात मान-सन्मान वाढेल आणि तुमचे मत अधिक महत्त्वाचे मानले जाईल. कार्यक्षेत्रात वरिष्ठ आणि सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल, त्यामुळे रखडलेली कामे मार्गी लागतील. अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता असून आर्थिक स्थिती सुधारेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि भविष्यासाठी आखलेल्या योजना यशस्वी ठरतील.
advertisement
5/6
तूळ - राशीसाठीही हा काळ अनुकूल मानला जात आहे. आर्थिक लाभाचे योग असून व्यवसायात नवीन संधी निर्माण होतील. निर्णयक्षमता वाढल्यामुळे महत्त्वाचे करार किंवा भागीदारी यशस्वी ठरू शकतात. कौटुंबिक नातेसंबंधात सुसंवाद राहील आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी हा काळ योग्य असल्याचे ज्योतिष तज्ज्ञ सांगतात.
advertisement
6/6
<strong>(सदर बातमी फक्त माहितीकरिता असून न्यूज 18 मराठी कुठलाही दावा करत नाही)</strong>
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
वर्षाच्या शेवटी वेळ आलीच! 19 डिसेंबरची मार्गशीर्ष अमावस्या या 3 राशींचा गोल्डन टाइम सुरू करणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल