Ganesh Names: श्रीगणेशावरून यापैकी बाळाचं छानसं नाव ठेवू शकता; बाप्पाची कृपा त्याच्यावर निरंतर राहील
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Baby Name List On Lord Ganesh: श्री गणेशाची पूजा घरोघरी केली जाते. श्री गणेश हे प्रथम पूजनीय देवता आहेत, त्यामुळे गणेशाच्या नावावरून मुलांची नावे ठेवण्याची प्रथा फार पूर्वीपासून आहे. कित्येक पालक आपल्या मुलाचे नाव गणेशावरून ठेवतात. श्री गणेशावरून बाळाचे नाव ठेवणे केवळ एक धार्मिक परंपरा नाही, तर यामागे अनेक आध्यात्मिक आणि सांस्कृतिक फायदे दडलेले आहेत, असे मानले जाते.
advertisement
1/8

गणपतीला विघ्नहर्ता असे म्हणतात. गणेशाच्या नावावरून बाळाचे नाव ठेवल्यास, त्याला जीवनात येणाऱ्या संकटांवर मात करण्याची शक्ती आणि धैर्य मिळते, अशी श्रद्धा आहे. गणपतीला बुद्धीची आणि ज्ञानाची देवता मानले जाते. गणेशाचे नाव धारण केल्यास, ते बाळ हुशार, दूरदृष्टी असलेले आणि ज्ञानी बनते.
advertisement
2/8
गणपती हा कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्यापूर्वी पूजला जातो. त्याच्या नावामुळे त्या व्यक्तीच्या जीवनात नेहमी शुभ घटना घडतात आणि सकारात्मकता राहते. म्हणूनच आज आपण श्रीगणेशावरून बाळाचे नाव ठेवण्यासाठी काही नावांची यादी जाणून घेऊ. यापैकी नाव आपण मुलासाठी ठेवू शकता.
advertisement
3/8
प्रदन्येष (Pradnesh) - बुद्धी आणि ज्ञानाचा देव, असा या नावाचा अर्थ होतो.अथर्व (Atharv): ऋग्वेदानंतरचा चौथा वेद, गणपतीला अथर्ववेदाचे प्रतीक मानले जाते.अद्वैत (Advait): अद्वितीय, ज्याच्यासारखे दुसरे कोणी नाही.
advertisement
4/8
अमोघ (Amogh): निष्फळ न होणारा, फलदायी.ईशान (Ishan): भगवान शिव आणि गणेशाचे नाव, समृद्धी देणारा.एकाक्षर (Ekakshar): 'ॐ' या एका अक्षराचे रूप, गणेशाला एकाक्षरी मानतात.
advertisement
5/8
गजानन (Gajanan): हत्तीसारखे मुख असलेला.गणेश (Ganesh): गणांचा ईश्वर, समुदायाचा स्वामी.गणराज (Ganaraj): गणांचा राजा.
advertisement
6/8
गणपती (Ganpati): गणपतीचे मूळ नाव, गणांचा स्वामी.गौरीसुत (Gaurisut): गौरीचा (पार्वतीचा) पुत्र.दंत (Dant): गणपतीचा दात, धैर्यशील.
advertisement
7/8
धूम्रवर्ण (Dhumravarn): धुरासारखा रंग असलेला, गणपतीचे रूप.विनायक (Vinayak): सर्वांचा नायक, जो अडचणी दूर करतो.सिद्ध (Siddh): सिद्धी प्राप्त करणारा, यशस्वी.
advertisement
8/8
हेरंब (Heramb): माता पार्वतीचा प्रिय पुत्र.प्रथमेश (Prathamesh): पहिला देव, जो सर्वात आधी पूजला जातो.वरद (Varad): वरदान देणारा.विघ्नेश (Vighnesh): विघ्ने (अडचणी) दूर करणारा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Ganesh Names: श्रीगणेशावरून यापैकी बाळाचं छानसं नाव ठेवू शकता; बाप्पाची कृपा त्याच्यावर निरंतर राहील