Money Mantra: बुधवारी या 6 राशींवर गणेश कृपा! आर्थिक लाभाचे योग, खुशखबर मिळणार
- Published by:Ramesh Patil
- trending desk
- Written by:Bhoomika Kalam
Last Updated:
Money Horoscope Marathi: आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं बुधवारच्या दिवसाचं (15 मे 2024) राशीभविष्य
advertisement
1/12

मेष (Aries) : बिझनेसमध्ये एखादं मोठं डील किंवा करार होण्याची शक्यता आहे. तुमचा आत्मविश्वास तुम्हाला एखादा खास निर्णय घेण्यास मदत करील. सरकारी नोकरीतल्या व्यक्तींना खास अधिकार मिळाल्याने कामाचा ताण वाढेल. बिझनेसशी निगडित प्रोग्राम आखला जाईल.उपाय : घरातल्या वडिलधाऱ्या मंडळींचा आशीर्वाद घेऊन घराबाहेर पडा.
advertisement
2/12
वृषभ (Taurus) : बिझनेसच्या कामात गोंधळ असेल; मात्र तुम्हाला समस्यांपासून सुटका करून घेण्याचा मार्गही सापडेल. बिझनेसशी संबंधित सरकारी कामं वेळेत पूर्ण करणं गरजेचं आहे. तुमच्या आर्थिक परिस्थितीला कोणताही धोका नाही. नोकरीत कामाच्या अधिकाराशी संबंधित काही समस्या असतील.उपाय : शिवलिंगावर जल अर्पण करा.
advertisement
3/12
मिथुन (Gemini) : बिझनेसशी संबंधित कामांमध्ये गुप्तता राखा. विपरीत परिस्थितीवर मात करण्यासाठी ही योग्य वेळ आहे. टॅक्सशी संबंधित कागदपत्रं पूर्ण करून ठेवणं गरजेचं आहे. ऑफिसमधल्या सहकाऱ्यांशी एखाद्या कामाच्या संदर्भात दुरावा/वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.उपाय : हनुमानाला शेंदूर अर्पण करा.
advertisement
4/12
कर्क (Cancer) : तुमच्या बिझनेस पार्टीजशी संपर्कात राहा. तुमच्या कामाशी संबंधित माहितीची देवाणघेवाण करा. तुम्ही निश्चितपणे काही तरी साध्य कराल. या काळात केलेले कष्ट नजीकच्या भविष्यात उत्तम फळ देतील.उपाय : श्री गणेशाला मोदकांचा नैवेद्य दाखवा.
advertisement
5/12
सिंह (Leo) : बिझनेसशी संबंधित सरकारी कामांमध्ये समस्या येतील. त्यामुळे तुमच्या फाइल्स आणि कागदपत्रं पूर्ण ठेवा. परदेशाशी निगडित बिझनेसमध्ये चांगलं यश मिळण्याची शक्यता आहे. रखडलेल्या कामांना गती मिळेल. सध्या नव्या योजनेची अंमलबजावणी करू नका.उपाय : श्री गणेशाला लाडूंचा नैवेद्य दाखवावा.
advertisement
6/12
कन्या (Virgo) : बिझनेसची रखडलेली सर्व कामं पूर्ण करण्यासाठी काळ अनुकूल आहे. कर्मचाऱ्यांशी सलोखा राखण्यात अडचणी येतील. नोकरदार व्यक्तींनी करिअरकडे अधिक लक्ष देणं गरजेचं आहे. अधिकाऱ्यांशी असलेले नातेसंबंध बिघडू देऊ नयेत.उपाय : गोमातेला हिरवा चारा खाऊ घाला.
advertisement
7/12
तूळ (Libra) : बिझनेसमध्ये एखाद्या विशिष्ट कामाचा अधिक अनुभव घेण्याची गरज आहे. तरुणांना स्पर्धा परीक्षांमध्ये यशप्राप्ती होईल. नोकरी मिळण्याचीही रास्त शक्यता आहे. सध्या ऑफिसमध्ये खुशामत करणाऱ्या व्यक्तींपासून सावध राहा.उपाय : भगवान श्रीकृष्णाची पूजा करा.
advertisement
8/12
वृश्चिक (Scorpio) : बिझनेसच्या कामांमध्ये सुधारणा होईल. एखाद्या विशिष्ट संघटनेत किंवा समितीत सहभागी झाल्यास फायद्याचं ठरेल. जोखमीच्या कामांपासून दूर राहा. विभागीय चौकशी होण्याची शक्यता आहे. ऑफिसमध्ये वादग्रस्त प्रकरणांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.उपाय : श्री हनुमानाची पूजा करा.
advertisement
9/12
धनू (Sagittarius) : प्रॉपर्टीशी निगडित बिझनेसमध्ये मोठी डील्स होण्याची शक्यता आहे. तरुणांच्या करिअरशी संबंधित समस्या सोडवल्या जातील. कार्यक्षमता वाढेल. नोकरीत एखाद्या कॉन्फरन्सचं बोलावणं येईल.उपाय : योगासनं-प्राणायाम करा.
advertisement
10/12
मकर (Capricorn) : आज बिझनेसच्या कामात खूप व्यग्र असाल. नव्या कामांमध्ये रस घ्याल आणि त्यात बऱ्यापैकी यशस्वीही व्हाल. गुंतवणूक करण्याचा प्लॅनही असेल. लीगल प्रकरणांमध्ये सावध राहा. सरकारी नोकरी करणाऱ्या व्यक्तींवर एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊ शकेल.उपाय : भगवान विष्णूची पूजा करा.
advertisement
11/12
कुंभ (Aquarius) : बिझनेसच्या विविध कामांमध्ये व्यग्र असाल. स्टाफमध्ये नव्या कामाच्या अनुषंगाने उत्साह असेल. तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. स्पर्धा परीक्षेत यशप्राप्ती होऊन नोकरी मिळण्याची शक्यता आहे.उपाय : शिवलिंगावर जल अर्पण करा.
advertisement
12/12
मीन (Pisces) : बिझनेसशी संबंधित नव्या प्लॅन्सची अंमलबजावणी फायद्याची ठरेल. संपर्कांच्या माध्यमातून खास माहितीही प्राप्त होऊ शकेल. कमिशन आणि कापडाशी निगडित बिझनेसमध्ये सध्या नफ्याची स्थिती राहील. ऑफिसमध्ये काही जुना वाद असेल.उपाय : घरातल्या वडिलधाऱ्या व्यक्तींचं प्रेम आणि आशीर्वाद यांमुळे तुमचा उत्साह जास्त राहील.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Money Mantra: बुधवारी या 6 राशींवर गणेश कृपा! आर्थिक लाभाचे योग, खुशखबर मिळणार