TRENDING:

Mulank 1 Personality: कितीही प्रयत्न करा, जमणारच नाही! या जन्मतारखांची जोडी सहजीवनात अपयशी ठरते

Last Updated:
Numerology Marathi : अंकशास्त्रानुसार ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या १, १०, १९ किंवा २८ तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक १ असतो. हा मूलांक थेट सूर्याशी संबंधित आहे, ज्याला नऊ ग्रहांमध्ये राजा म्हणून ओळखले जाते. मूलांकावरून आपल्याला व्यक्तीचे व्यक्तिमत्व, त्याची ताकद, स्वभाव, करिअर इत्यादी महत्त्वाची माहिती मिळते. मूलांक १ असणारे लोक त्यांच्या अद्भुत गुणांमुळे आणि वेगळ्या उर्जेमुळे इतरांपेक्षा वेगळे दिसतात. अंकशास्त्रज्ञ आणि ज्योतिषी अंशुल त्रिपाठी यांनी मूलांक १ बद्दल दिलेली सविस्तर माहिती जाणून घेऊ.
advertisement
1/7
कितीही प्रयत्न करा, जमणारच नाही! या जन्मतारखांची जोडी सहजीवनात अपयशी ठरते
सूर्याच्या प्रभावाखाली - अंक १ असलेल्या लोकांमध्ये सूर्याचे सर्व गुण दिसून येतात - तीक्ष्णता, आत्मविश्वास, नेतृत्व क्षमता. हे लोक जन्मापासूनच नेतृत्व गुण घेऊन येतात. लहानपणापासूनच ते मित्रांमध्ये नेते बनतात आणि शाळेत त्यांना मॉनिटर, कॅप्टन किंवा वक्ता म्हणून ओळखले जाते. सूर्य या मूलांकाच्या लोकांना चमकवतो त्यामुळे नेहमीच ते आघाडीवर राहणे पसंत करतात. हे लोक सर्जनशील, स्वावलंबी आणि सकारात्मक विचार करणारे असतात.
advertisement
2/7
जीवनात शिस्त आणि जबाबदारीची जाणीव - या लोकांना नेतृत्व करण्याची तीव्र इच्छा असते. त्यांच्या आत एक ऊर्जा असते, जी त्यांना पुढे जाण्यासाठी प्रेरित करते. बऱ्याचदा असे दिसून आले आहे की घरात मोठे भाऊ आणि बहिणी असूनही त्यांना घराचा कर्ता पुरुष मानले जाते.
advertisement
3/7
शिक्षण आणि करिअरमध्ये चमक - शिक्षण क्षेत्रात १ क्रमांक असलेल्या लोकांची कामगिरी सरासरीपेक्षा चांगली असते. विद्यार्थीदशेत या मूलांकाची मुले पुरस्कार जिंकतात, त्यांची हुशारी, बोलण्याचे कौशल्य आणि आत्मविश्वास त्यांना एक वेगळी ओळख देतो.
advertisement
4/7
हे लोक आयएएस, आयपीएस, प्रशासकीय सेवा, राजकारण, व्यवसाय नेतृत्व, मीडिया, प्रेरक भाषण, कंपनी प्रवर्तक, प्रवक्ता, संघटक, नेता, शास्त्रज्ञ, डॉक्टर, डिझायनर, संगीत, छायाचित्रण, कला, अध्यापन किंवा संशोधन या क्षेत्रात खूप चांगले काम करू शकतात - विशेषतः जेव्हा त्यांना नेतृत्व करण्याची संधी मिळते.
advertisement
5/7
सूर्यपुत्र आणि शनिपुत्र यांच्यातील मतभेद- ज्योतिषी अंशुल त्रिपाठी यांच्या मते शनि हा सूर्याचा पुत्र आहे, परंतु दोघांमध्ये वैचारिक फरक आहेत. त्यामुळे क्रमांक १ आणि क्रमांक ८ मधील परस्पर संघर्ष किंवा ऊर्जा असंतुलनात दिसून येतो. म्हणूनच, क्रमांक १ आणि क्रमांक ८ असलेल्या लोकांमध्ये अनेकदा विचारसरणीचा फरक असतो. मूलांक १ आणि ८ चं जमत नसल्यानं जोडीदार निवडताना या मूलांकाचा शक्यतो विचार करू नये.
advertisement
6/7
कोण मित्र आहेत आणि कोण विरोधी ग्रह आहेत - सूर्याचे मित्र ग्रह मंगळ (9), गुरू (3) आणि बुध (5) आहेत, तर राहू (4) आणि शनि (8) हे त्याचे शत्रू मानले जातात.
advertisement
7/7
आयुष्यातील प्रमुख आव्हाने - हे लोक तेजस्वी आणि स्वावलंबी असले तरी कधीकधी त्यांची चमक आणि ऊर्जा इतरांना अस्वस्थ करू शकते. त्यांच्या आजूबाजूचे लोक त्यांचा हेवा करू शकतात आणि त्यांच्या पाठीमागे त्यांच्यावर टीका देखील करू शकतात. त्यांना हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की प्रत्येकजणाला तुमचं चांगलं पाहावणार नाही.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Mulank 1 Personality: कितीही प्रयत्न करा, जमणारच नाही! या जन्मतारखांची जोडी सहजीवनात अपयशी ठरते
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल