Numerology: गडगंज असलं तरी उधळपट्टीतले नसतात; या तीन जन्मतारखा असलेले बजेट ठेवून करतात खर्च
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Numerology: पैसा कमावणे जितके महत्त्वाचे आहे, त्यापेक्षा जास्त कठीण काम त्याचे योग्य नियोजन करणे हे असते. फार कमी लोकांना ही गोष्ट लक्षात येत नाही. काही लोक खूप पैसा कमवूनही नियोजनाच्या अभावामुळे नेहमी आर्थिक चणचणीत असतात, तर काही लोक कमी उत्पन्नातही पैशांचा वापर इतक्या कौशल्याने करतात की त्यांच्याकडे कधीही पैसा कमी पडत नसतो.
advertisement
1/5

ज्योतिष शास्त्रानुसार, काही विशिष्ट मूलांक असलेले लोक पैसे मिळवण्यात आणि त्यात वाढ करण्यात अत्यंत माहीर असतात. मूलांक 5 असलेल्या लोकांकडे पैशांची कधीच कमतरता भासत नाही कारण हे लोक पैसा साठवण्यात निष्णात असतात. पैसा कुठे गुंतवावा आणि कुठे गुंतवू नये याची त्यांना उत्तम जाण असते.
advertisement
2/5
हे लोक नेहमीच नियोजनात्मक पद्धतीनं चालतात, ज्यामुळे कठीण प्रसंगातही त्यांच्याकडे पुरेशी पुंजी शिल्लक असते. ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14 किंवा 23 तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक 5 असतो. या मूलांकाचा स्वामी बुध ग्रह आहे.
advertisement
3/5
ज्योतिषशास्त्रात बुधाला बुद्धी आणि व्यापाराचा कारक मानले जाते. याच कारणामुळे हे लोक अशा कामात जास्त यशस्वी होतात जिथे बुद्धीचा वापर जास्त करावा लागतो. त्यांच्यासाठी व्यवसाय करणे खूप फायदेशीर ठरते. हे लोक शेअर बाजार, व्यापार आणि गुंतवणुकीतील बारकावे खूप लवकर समजून घेतात.
advertisement
4/5
मूलांक 8 असलेल्या व्यक्तींकडेही धनधान्याची कधीही कमतरता नसते. हे लोक विनाकारण पैसे खर्च करणे टाळतात. त्यांचे उत्पन्न कमी असो वा जास्त, त्यांना पैसे साठवून ठेवण्याची सवय असते. हे लोक आपल्या बजेटनुसारच व्यवहार करतात आणि प्रत्येक वेळी पैसे कसे वाचवता येतील याचा विचार करतात.
advertisement
5/5
8 मूलांकाचे लोक हळूहळू पण अत्यंत भक्कम आर्थिक साम्राज्य उभे करतात. अत्यंत कठीण काळातही त्यांच्याकडे पैशांची कधीच कमतरता नसते.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Numerology: गडगंज असलं तरी उधळपट्टीतले नसतात; या तीन जन्मतारखा असलेले बजेट ठेवून करतात खर्च