Weekly Rashi Bhavishya In Marathi: धनू, मकर, कुंभ, मीन साप्ताहिक राशीभविष्य; आठवड्यात सगळीकडून आनंदी-आनंद
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Weekly Rashi Bhavishya In Marathi: सोमवारी 17 फेब्रुवारी रोजी या महिन्याचा तिसरा आठवडा सुरू होत आहे. फेब्रुवारीच्या मध्यातील हा आठवडा काही राशीच्या लोकांना लाभदायी तर काही राशीच्या लोकांना अडचणीचा ठरू शकतो. 17 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी 2025 या आठवड्यात काही राजयोग, ग्रहांचे संयोग तयार होत आहेत. शुभ आणि अशुभ योग निर्माण होत आहेत. याचा धनू, मकर, कुंभ आणि मीन राशींवरील साप्ताहिक परिणाम पाहुया.
advertisement
1/8

धनू (Sagittarius) : आठवड्याच्या सुरुवातीला कामाच्या निमित्ताने अधिक धावपळ करावी लागू शकते. दूरच्या किंवा जवळच्या प्रवासाला जावं लागू शकतं. हे प्रवास करिअर, व्यवसाय आणि नातेसंबंधांच्या दृष्टीने अत्यंत शुभ ठरतील. एखाद्या प्रभावशाली व्यक्तीशी भेट होईल. त्या व्यक्तीच्या माध्यमातून भविष्यात फायदेशीर योजनांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळू शकते. आठवड्याच्या शेवटी बेरोजगार व्यक्तींना इच्छित नोकरी मिळू शकते.
advertisement
2/8
धनू - मेहनत आणि उत्कृष्ट कामामुळे नोकरदार व्यक्तींची प्रतिष्ठा वाढेल. कुटुंबातल्या महिलांकडून विशेष सहकार्य आणि पाठिंबा मिळेल. आठवड्याच्या मध्यात भावना नियंत्रित करण्याची गरज भासेल. या काळात कोणालाही असं कोणतंही वचन देऊ नका, जे पूर्ण करणं भविष्यात कठीण जाईल. आठवड्याच्या शेवटी अचानक एखादा जुना मित्र किंवा नातेवाईकाची भेट होईल. त्यांच्यासह जुन्या आठवणींना उजाळा देण्याची संधी मिळेल.Lucky Color : PinkLucky Number : 9
advertisement
3/8
मकर (Capricorn) : आठवड्याची सुरुवात सकारात्मक असेल आणि अपेक्षित परिणाम मिळतील. प्रवास सुखद ठरेल आणि नवीन नातेसंबंध अधिक दृढ होतील. नशिबाची साथ असल्याने करिअर आणि व्यवसायात यश मिळेलच, शिवाय कुटुंबात सतत आनंद आणि समृद्धी वाढताना दिसेल. तुम्ही दीर्घ काळापासून मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याचं नियोजन करत असलात, तर तुमची ही इच्छा पूर्ण होऊ शकते. आठवड्याच्या मध्यात मुलांकडून चांगली बातमी मिळेल. त्यामुळे तुमची मोठी चिंता दूर होईल आणि समाजात तुमचा सन्मानही वाढेल.
advertisement
4/8
मकर - न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणात दिलासा मिळू शकतो. विरोधक तुम्हाला तडजोडीचा प्रस्ताव देऊ शकतात. नोकरदार महिलांचं प्रमोशन होण्याची आणि सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होण्याची शक्यता आहे. जास्तीत जास्त वेळ सामाजिक सेवा किंवा धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यांमध्ये व्यतीत होईल. प्रेमसंबंधांमध्ये गोडवा राहील. प्रिय व्यक्तीवरचा विश्वास आणि जवळीक वाढेल. वैवाहिक जीवन सुखी राहील. आरोग्य सर्वसाधारण राहील.Lucky Color : BrownLucky Number : 12
advertisement
5/8
कुंभ (Aquarius) : आठवड्याची सुरुवात थोडी चढ-उताराची असेल. जीवनात कोणत्याही प्रकारचा शॉर्टकट घेणं टाळा. अन्यथा मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागू शकतं. कामात काही अडथळे आल्यामुळे थोडी निराशा जाणवू शकते; पण ही स्थिती फार काळ टिकणार नाही. उत्तम मित्र आणि हितचिंतकांच्या मदतीने तुम्ही सर्वांत कठीण परिस्थितीही पार करू शकाल. नोकरदार व्यक्तींनी आपले प्लॅन्स पूर्ण होण्यापूर्वी इतरांसमोर जास्त बोलणं टाळावं. अन्यथा विरोधक त्यात अडथळे निर्माण करू शकतात.
advertisement
6/8
कुंभ - व्यवसाय नेहमीच्या गतीने सुरू राहील आणि नफा मिळत राहील. वेग थोडा कमी असेल. प्रेमसंबंधांसाठी हा आठवडा अनुकूल ठरेल. प्रेमसंबंध सकारात्मक दिशेने पुढे जातील. जोडीदार केवळ तुमच्या मनातल्या गोष्टी समजून घेणार नाही, तर त्यानुसार वागतानाही दिसेल. वैवाहिक जीवन सुखी राहील. जोडीदार कठीण काळात तुमचा आधार बनेल.Lucky Color : PurpleLucky Number : 6
advertisement
7/8
मीन (Pisces) : आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला तुमची नियोजित कामं वेळेवर पूर्ण होत असल्याचं लक्षात येईल. विशेष म्हणजे, तुमच्या कुठल्याही इच्छेच्या पूर्ततेसाठी नातेवाईक पूर्ण सहकार्य आणि मदत करतील. लक्झरी लाइफस्टाइलशी संबंधित एखादी आवडती गोष्ट मिळाल्याने खूप आनंदी व्हाल. ऑफिसमध्ये वरिष्ठ तुमच्या कामाचं कौतुक करतील. त्यांच्या मदतीने तुम्ही मोठी उद्दिष्टं सहज साध्य करू शकाल. या काळात तुम्हाला बढती, प्रशंसा आणि बक्षीस मिळण्याची पूर्ण शक्यता आहे.
advertisement
8/8
मीन - व्यवसायाशी संबंधित काही फायदेशीर योजनांमध्ये गुंतवणुकीची संधी मिळेल. तुमच्या हुशारीने बाजारात अडकलेले पैसेही बाहेर काढण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढेल. आरोग्य सर्वसाधारण राहील. प्रेमसंबंध अनुरूप असतील. तुमचा जोडीदार तुमच्या भावनांचा आदर राखील आणि तुम्ही घेतलेल्या निर्णयांमध्ये ठामपणे तुमच्यासह उभा राहील. वैवाहिक जीवन आनंदी राहील.Lucky Color : BlackLucky Number : 15
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Weekly Rashi Bhavishya In Marathi: धनू, मकर, कुंभ, मीन साप्ताहिक राशीभविष्य; आठवड्यात सगळीकडून आनंदी-आनंद