TRENDING:

Shani Astro: सब्र का फल..! या राशीच्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना गुड न्यूज; स्वनक्षत्रातील शनिची जादू दिसेल

Last Updated:
Shani Astro: न्यायाचे देवता शनिदेव सर्वात क्रूर ग्रह मानले जातात, आपल्या कर्मानुसार ते योग्य फळ देतात. शनिकृपेनं रंकालाही राजा बनवण्यास वेळ लागत नाही. शनि प्रत्येक अडीच वर्षांनी राशी बदलतात आणि वर्षभरात ठराविक काळाने नक्षत्र बदलतात. शनी साधारणपणे प्रत्येक 30 वर्षांनी राशी आणि 27 वर्षांनी नक्षत्र बदलतात, ज्याचा प्रभाव 12 राशींवर वेगवेगळ्या प्रकारे पडतो.
advertisement
1/6
सब्र का फल..! या राशीच्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना गुड न्यूज; शनिची कृपा
सध्या शनि कुंभ राशीत आणि पूर्वा भाद्रपद नक्षत्रात आहेत. 28 एप्रिल रोजी सकाळी 7:52 वाजता न्यायाधीश शनि स्वतःच्या नक्षत्रात म्हणजेच उत्तरा भाद्रपदात प्रवेश करतील आणि मीन राशीत विराजमान होतील. याचा प्रभाव सर्व 12 राशींवर पडेल. त्यापैकी 3 राशींबद्दल जाणून घेऊया...
advertisement
2/6
तूळ - राशीसाठी शनि उत्तरा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करून सहाव्या घरात राहतील. यामुळे या राशीच्या लोकांना अनेक फायदे होतील. बऱ्याच काळापासून थांबलेली कामे पुन्हा सुरू होतील. कामात यश मिळेल आणि वरिष्ठांकडून कौतुक होईल. मोठी जबाबदारी सोपवली जाऊ शकते, ज्यामुळे कठोर परिश्रम करावे लागतील.
advertisement
3/6
तूळ - शनि या राशीसाठी चतुर्थ आणि पंचम भाव स्वामी असल्याने आनंदाचे योग येतील. जुने आजार दूर होतील. मालमत्ता किंवा इतर कौटुंबिक वाद मिटतील. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल. जीवनात आनंद आणि शांती नांदेल.
advertisement
4/6
वृषभ राशीसाठी शनि अकराव्या घरात राहतील. यामुळे या राशीच्या लोकांना सर्व क्षेत्रात प्रचंड यश आणि आर्थिक लाभ होतील. समाजात मान-सन्मान वाढेल. जीवनात आनंद आणि शांती राहील. संपर्क वाढतील ज्याचे चांगले परिणाम मिळतील. करिअरमध्ये प्रगती होईल.
advertisement
5/6
वृषभ - पदोन्नती आणि नेतृत्व क्षमतेत वाढ होईल. मोठी जबाबदारी सोपवली जाऊ शकते. कुटुंब आणि मित्रांशी संबंध अधिक मजबूत होतील. चांगली जीवनशैली आणि आहारामुळे आरोग्य चांगले राहील.
advertisement
6/6
कर्क राशीसाठी शनि उत्तरा भाद्रपदात प्रवेश करून नवव्या घरात राहतील. यामुळे या राशीच्या लोकांच्या जीवनातील समस्या दूर होतील. उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण होईल. संयमाने काम केल्यास सर्व क्षेत्रात यश मिळेल. पालकांचे पूर्ण सहकार्य मिळेल. कौटुंबिक किंवा वैवाहिक जीवनातील समस्या दूर होतील. आरोग्य चांगले राहील. जीवनात आनंद येईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Shani Astro: सब्र का फल..! या राशीच्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना गुड न्यूज; स्वनक्षत्रातील शनिची जादू दिसेल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल