Shani Gochar: आयुष्याला लागलेलं ग्रहण सुटणार! मेष राशीत शनी आल्यावर या राशींना आनंदी आनंदाचा काळ
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Shani Gochar Horoscope: आपल्या सर्वांना माहीतच असेल ज्योतिषशास्त्रात शनिच्या स्थितीला विशेष महत्त्व आहे. शनिची थोडीशी हाचलाच राशीचक्रावर मोठा परिणाम करते. सध्या शनिदेव मीन राशीत असून ज्यामुळे कुंभ, मीन आणि मेष या राशींच्या लोकांसाठी साडेसातीचा काळ सुरू आहे. तसेच सिंह आणि धनु राशीवर शनीची अडीचकी सुरू आहे. पण ही सगळी परिस्थिती लगेच पालटणार नाही, शनिदेव आपली रास बदलतील तेव्हा काही राशींना चांगले दिवस येतील.
advertisement
1/6

मराठी पंचांगानुसार शनिदेव सध्या मीन राशीत असून 3 जून 2027 रोजी ते मेष राशीत प्रवेश करतील. त्यावेळी विशेष म्हणजे तब्बल 30 वर्षांनंतर शनिदेव मेष राशीत येतील. ज्योतिषशास्त्रात मेष ही शनीची नीच रास मानली जाते, त्यामुळे हा बदल अनेक राशींच्या आयुष्यात मोठे फेरबदल घेऊन येईल.
advertisement
2/6
काही राशींसाठी हा बदल खूप मोठा दिलासा देणारा ठरणार आहे. शनिदेवाने मेष राशीत पाऊल ठेवताच कुंभ राशीची साडेसाती पूर्णपणे संपेल. गेल्या अनेक वर्षांपासून चालत आलेल्या आर्थिक आणि मानसिक त्रासातून या लोकांची सुटका होईल. तसेच सिंह आणि धनु राशीवरची शनीची अडीचकी सुद्धा संपेल आणि त्यांची रखडलेली कामं मार्गी लागतील.
advertisement
3/6
दुसरीकडे काही राशींवर शनीचा प्रभाव सुरू होईल. 3 जून 2027 पासून वृषभ राशीच्या लोकांची साडेसाती सुरू होईल, तर कन्या आणि मकर राशीवर शनीची अडीचकी सुरू होईल. या राशीच्या लोकांना कामात थोडी अधिक मेहनत घ्यावी लागेल आणि शिस्त पाळावी लागेल.
advertisement
4/6
2027 हे वर्ष कुंभ, सिंह आणि धनु राशीच्या लोकांसाठी भाग्योदयाचं ठरू शकतं. त्यांचे उत्पन्नाचे नवीन मार्ग निर्माण होतील आणि करिअरमध्ये मोठ्या संधी मिळतील. व्यापारात चांगला नफा मिळण्याचे योग आहेत आणि आर्थिक स्थिती चांगली होईल.
advertisement
5/6
शनीचा प्रभाव म्हणजे घाबरून जाण्याचं कारण नाही, तर तो नीट वागण्याचा आणि सांभाळून चालण्याचा संकेत असतो. मनाच्या शांततेसाठी दर शनिवारी शनीच्या मंदिरात जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. काळे तीळ किंवा काळी उडीद डाळ दान करणं शुभ मानलं जातं. तसेच हनुमान चालीसा वाचल्याने शनीचा त्रास कमी होतो.
advertisement
6/6
उपाय म्हणून शनिवारी सायंकाळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणाशीही वाईट वागू नका आणि प्रामाणिकपणे आपले काम करा, कारण शनिदेव कर्माप्रमाणे फळ देतात.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Shani Gochar: आयुष्याला लागलेलं ग्रहण सुटणार! मेष राशीत शनी आल्यावर या राशींना आनंदी आनंदाचा काळ