Shani Paya 2026: सोन्याच्या की लोखंडाच्या पावलानं; 2026 मध्ये शनि तुमच्या राशीवर कसा येणार?
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Shani Paya 2026 Horoscope: वर्ष 2026 कसं असेल, नवीन वर्षात आपलं नशीब कशी साथ देईल, याविषयी अनेकांच्या मनात प्रश्न असतात. नव्या वर्षात शनीचा प्रभाव कसा राहील, लोकांमध्ये त्याची आधीच उत्सुकता पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे नवीन वर्षात शनीचा पाया अनेक राशींसाठी वेगवेगळा असणार आहे. ज्योतिषशास्त्रात असं मानलं जातं की, शनीचा पाया हे सांगतो की येणारे वर्ष एखाद्या राशीसाठी किती संघर्षाचं असेल आणि कुठं दिलासा किंवा प्रगतीचे योग येतील.
advertisement
1/6

वर्ष 2026 मध्ये शनीचा लोह, सुवर्ण, ताम्र आणि रजत पाया वेगवेगळ्या राशींवर वेगवेगळा प्रभाव पाडणार आहे. वर्ष 2026 मध्ये शनिदेव मीन राशीतच राहणार आहेत, ज्यामुळे मेष, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांवर शनीची साडेसाती आणि सिंह व कुंभ राशीच्या लोकांवर अडीचकीचा प्रभाव राहील. वर्ष 2026 मध्ये कोणत्या राशींवर शनीचा कोणता पाया असेल, ते जाणून घेऊया.
advertisement
2/6
शनीचा पाया कसा ठरतो?ज्योतिषशास्त्रानुसार, शनिदेव जेव्हा एखाद्या राशीत गोचर करतात, तेव्हा त्या वेळी राशीपासून चंद्र 1, 6 किंवा 11 व्या भावात असेल तर सुवर्ण पाया असतो. जर चंद्र 2, 5 किंवा 9 व्या भावात असेल तर रजत पाया असतो. जर 3, 7 किंवा 10 व्या भावात असेल तर ताम्र पाया असतो. तसेच जर चंद्र 4, 8 किंवा 12 व्या भावात असेल तर लोह पाया असतो. 2026 मध्ये मेष ते मीन राशीपर्यंत कोणावर कोणता पाया असेल, ते पाहूया.
advertisement
3/6
शनी लोखंड पाया 2026 राशीभविष्य -शनीचा लोखंड पाया वर्ष 2026 मध्ये मेष, सिंह आणि धनु राशीवर असणार आहे. ज्योतिषशास्त्रात लोह पाया हा मेहनत, संघर्ष आणि जबाबदाऱ्यांशी संबधित मानला जातो. अशा परिस्थितीत या तीन राशींच्या लोकांवर वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात कामाचा दबाव वाढू शकतो, ज्यामुळे मोठी धावपळ करावी लागेल. नवीन वर्षात कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या, अन्यथा तुमचे निर्णय नुकसानाला कारणीभूत ठरू शकतात. यश आणि धनप्राप्तीसाठी कोणताही शॉर्टकट वापरू नका. चांगली गोष्ट म्हणजे या तीन राशींना मेहनतीचे फळ उशिरा का होईना, पण नक्की मिळेल.
advertisement
4/6
शनी सुवर्ण पाया 2026 राशीभविष्य -शनीचा सुवर्ण म्हणजेच सोन्याचा पाया वर्ष 2026 मध्ये वृषभ, तूळ आणि मीन राशीवर असणार आहे. या तीन राशींना वर्ष 2026 मध्ये विविध आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. नोकरी करणाऱ्यांनी ऑफिसमधील कोणत्याही राजकारणापासून दूर राहून आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावे. जर तुम्ही गुंतवणूक करत असाल, तर तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. वृषभ, तूळ आणि मीन राशीच्या लोकांनी स्वतःच्या आरोग्यासोबतच कुटुंबाच्या आरोग्याचीही काळजी घ्यावी आणि मानसिक तणाव टाळा. काही खबरदारी घेतल्यास हे वर्ष प्रगतीचे ठरू शकते.
advertisement
5/6
शनी ताम्र पाया 2026 राशीभविष्य -शनीचा ताम्र पाया वर्ष 2026 मध्ये मिथुन, कन्या आणि मकर राशीवर असणार आहे. शनिचा हा पाया खूप शुभ किंवा खूप अशुभ मानला जात नाही, त्यामुळे वर्ष 2026 या तीन राशींसाठी सर्वसाधारण असेल. काही चढ-उतारांमुळे थोडा त्रास होऊ शकतो. विद्यार्थ्यांसाठी ताम्र पाया चांगला राहील आणि ते अभ्यासात प्रगती करतील. शनीच्या कृपेने धनप्राप्तीचे अनेक मार्ग मिळतील आणि आर्थिक स्थिती चांगली राहील. लव्ह लाइफमध्ये सकारात्मक बदल होतील आणि तुमचे नाते छान होईल. रेंगाळलेली कामे या वर्षी पूर्ण होण्याचे योग आहेत.
advertisement
6/6
शनी रजत पाया 2026 राशीभविष्य -शनीचा रजत म्हणजेच चांदीचा पाया वर्ष 2026 मध्ये कर्क, वृश्चिक आणि कुंभ राशीच्या लोकांवर असणार आहे. हा पाया या राशींसाठी अत्यंत चांगला ठरेल. रजत पाया मानसिक संतुलन आणि हळूहळू भक्कम होणाऱ्या प्रगतीचे संकेत देतो. वर्ष 2026 मध्ये या राशींच्या नातेसंबंधात सुधारणा होईल आणि नातेवाईकांकडून फायदा होण्याचे योग आहेत. तुम्ही सामाजिक आणि धार्मिक कार्यात उत्साहाने सहभागी व्हाल. या दरम्यान एखाद्या प्रभावशाली व्यक्तीशी झालेली भेट भविष्यात फायदेशीर ठरेल. तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मजबूत असाल आणि आरोग्य चांगले राहील. नोकरी आणि व्यवसायासाठी 2026 वर्ष खूप फायदेशीर ठरणार आहे.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Shani Paya 2026: सोन्याच्या की लोखंडाच्या पावलानं; 2026 मध्ये शनि तुमच्या राशीवर कसा येणार?