Shravan 2025: श्रावण सुरू होण्याआधी मासिक शिवरात्रीला गजकेसरी योग! 4 राशींना अनपेक्षित भाग्याची साथ
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Shravan 2025: प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला मासिक शिवरात्री साजरी केली जाते. वर्षातून एकूण १२ मासिक शिवरात्री येतात. श्रावण सुरू होण्याआधी म्हणजे २३ जुलै रोजी मासिक शिवरात्री येत आहे.
advertisement
1/6

श्रावणाआधी आलेल्या या मासिक शिवरात्री दिवशी गुरू आणि चंद्र यांची मिथुन राशीत युती होणार आहे. गुरू आणि चंद्राची युती होते तेव्हा गजकेसरी राजयोग तयार होतो. ज्योतिषशास्त्रानुसार हा खूप शुभ योग मानला जातो.
advertisement
2/6
आषाढ महिन्याची शिवरात्री २३ जुलै रोजी आहे. कित्येक वर्षांनी या दिवशी गुरू आणि चंद्राचा युती मिथुन राशीत होणार आहे. गुरू आणि चंद्राची युती होते तेव्हा भाग्यशाली गजकेसरी राजयोग तयार होतो.
advertisement
3/6
वृषभ - आपला आत्मविश्वास वाढल्यानं करिअर-व्यवसायात लाभ होतील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल, कामाच्या ठिकाणी तुमचा आदरही वाढेल. महादेवाच्या कृपेनं तुम्हाला अडकलेले पैसे परत मिळू शकतील. नवीन नोकरी शोधणाऱ्या लोकांना चांगली ऑफर मिळू शकते.
advertisement
4/6
मिथुन - गजकेसरी राजयोगाचा परिणाम मिथुन राशीवर सकारात्मक राहणार आहे. कारण हा योग मिथुन राशीतच तयार होत आहे. करिअर व्यवसायात वाढ होईल. तुम्ही जमीन मालमत्ता इत्यादींमध्ये पैसा गुंतवू शकता, त्यामुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवन देखील आनंदी राहील.
advertisement
5/6
सिंह - या योगामुळे तुमचे उत्पन्न वाढू शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत देखील निर्माण होऊ शकतात. जुन्या गुंतवणुकीतून अचानक नफा मिळू शकतो. तसेच कुटुंबात चांगले वातावरण मानसिक शांती देईल. जोडीदारासोबत सुरू असलेला कलह संपेल. नात्यांमध्ये गोडवा वाढेल.
advertisement
6/6
तूळ - व्यावसायिकांसाठी हा काळ चांगला राहणार आहे. व्यवसायात नफा वाढू शकतो. तुमचं बोलणं आणि संवाद कौशल्य सुधारेल. घरी कोणतेही धार्मिक किंवा शुभ कार्य पूर्ण होऊ शकते. नवीन काम सुरू करण्यासाठी देखील वेळ चांगला मानला जातोय.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Shravan 2025: श्रावण सुरू होण्याआधी मासिक शिवरात्रीला गजकेसरी योग! 4 राशींना अनपेक्षित भाग्याची साथ