Solar Eclipse 2026: वर्षातील पहिल्या सूर्यग्रहणाला दुर्मीळ अन् खतरनाक योग; संकटात सापडणार या राशीचे लोक
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Solar Eclipse 2026: वैदिक ज्योतिष शास्त्राच्या गणनेनुसार, 2026 सालातील फेब्रुवारी महिना अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या महिन्याची सुरुवात मोठ्या घडामोडींनी होईल. 17 फेब्रुवारी 2026 रोजी वर्षातील पहिले सूर्यग्रहण लागणार आहे. भारतीय वेळेनुसार हे ग्रहण संध्याकाळी 05 वाजून 31 मिनिटांनी सुरू होईल. ज्योतिषीय दृष्टीने ही घटना विशेष आहे कारण ती कुंभ राशीत घडणार आहे, जिथे राहू ग्रह आधीच स्थित आहे.
advertisement
1/6

ज्योतिष जाणकारांच्या मते, हे ग्रहण काही राशींसाठी सुखाचे दिवस घेऊन येईल, तर काहींसाठी ते संकटाचे संकेत ठरू शकते. खालील 3 राशींवर याचा विशेष नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे.
advertisement
2/6
कुंभ राशीतील सूर्य-राहू युती घातक? - जेव्हा सूर्य आणि राहू एकाच राशीत एकत्र येतात, तेव्हा ग्रहण योग निर्माण होतो. शास्त्रानुसार हा योग शुभ मानला जात नाही. या काळात सूर्य राहूच्या प्रभावाखाली येतो, ज्यामुळे निर्णय घेताना संभ्रम निर्माण होणे, मानसिक अस्वस्थता आणि आरोग्याच्या तक्रारी उद्भवू शकतात. या ग्रहणाच्या वेळी कुंभ राशीत सूर्य, चंद्र आणि शुक्र एकत्र असतील, ज्यामुळे भावनिक आणि आर्थिक स्तरावर उलथापालथ होऊ शकते.
advertisement
3/6
कर्क राशी: कर्क राशीच्या लोकांसाठी हे ग्रहण अष्टम स्थानात लागत आहे. ज्योतिष शास्त्रात हे स्थान अचानक येणाऱ्या संकटांचे मानले जाते. हृदयविकार असलेल्या व्यक्तींनी अधिक सावध राहावे. जुने आजार पुन्हा उद्भवू शकतात. नोकरीच्या ठिकाणी वादात पडू नका आणि विनाकारण होणारा खर्च टाळा. जोडीदारासोबत मतभेद होण्याची शक्यता असल्याने बोलताना संयम राखा.
advertisement
4/6
कन्या राशी: कन्या राशीच्या लोकांसाठी सूर्य-राहूची ही युती प्रतिकूल परिस्थिती निर्माण करू शकते. ग्रहणाच्या प्रभावामुळे तुमची कामे पूर्ण होताना अचानक अडथळे येऊ शकतात. तुमचे शत्रू प्रबळ होतील, ज्यामुळे समाजात मानहानी होण्याची भीती आहे. मालमत्ता किंवा शासकीय कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला नक्की घ्या. घाईघाईत घेतलेला कोणताही आर्थिक निर्णय भविष्यात नुकसानकारक ठरू शकतो.
advertisement
5/6
मीन राशी: मीन राशीच्या लोकांसाठी हे ग्रहण बाराव्या स्थानात होत आहे. हे स्थान व्यय आणि नुकसानाशी संबंधित आहे. यामुळे तुमचे खर्च वाढतील आणि तुमची बचत कमी होईल. शनीची साडेसाती सुरू असल्याने, सूर्य-राहूचा हा योग प्रेमसंबंधांमध्ये दुरावा निर्माण करू शकतो. विनाकारण प्रवास करणे टाळा आणि आपल्या खास गोष्टी कोणाशीही बोलू नका. आरोग्याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते.
advertisement
6/6
ग्रहण काळात ॐ नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करणे अत्यंत लाभदायक ठरते. ग्रहण संपल्यानंतर काळे तीळ, घोंगडी किंवा धान्याचे दान करावे. या काळात क्रोध करणे टाळावे आणि कोणतीही नवीन गुंतवणूक किंवा मोठे काम सुरू करू नये.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Solar Eclipse 2026: वर्षातील पहिल्या सूर्यग्रहणाला दुर्मीळ अन् खतरनाक योग; संकटात सापडणार या राशीचे लोक