Today Rashibhvishya: संकष्टी चतुर्थीला आज चंद्राचं मिथुन राशीत भ्रमण, असं आहे दैनिक राशीभविष्य
- Published by:Ramesh Patil
- Written by:Rutuparna Mujumdar
Last Updated:
Today Rashibhvishya: आज दिनांक 30 नोव्हेंबर 2023 गुरूवार. कार्तिक कृष्ण तृतीय/ चतुर्थी. संकष्टी चतुर्थी. चंद्रोदय रात्री 08.35 वाजता. चंद्र आज मिथुन राशीत भ्रमण करेल. श्री गणेशाला वंदन करून पाहुया आजचे 12 राशींचे राशीभविष्य.
advertisement
1/12

मेष - शुभ दिवस. घरामध्ये जास्तीची जबाबदारी पार पाडाल. मानसिक ताण होईल. चंद्र संतती चिंता, आर्थिक लाभ देईल. घरात जास्त वेळ घालवाल. कुटंब आणि सामाजिकदृष्ट्या मध्यम दिवस.
advertisement
2/12
वृषभ - आज दिवस शांततेने व्यतीत करण्याचा आहे. दशमात शनि वक्री, व्यय स्थानात ग्रह आर्थिक नुकसानीचे योग आणतील. प्रकृती जपा. धनस्थानातील चंद्र आरोग्य, ऊर्जा आणि मनशांती कमी करेल. दिवस मध्यम.
advertisement
3/12
मिथुन - शुक्र आता तुळेत असून वृश्चिक राशीत त्रिग्रही योग आहे. राशीत चंद्र आहे. लाभ होईल. प्रवास योग येतील. भावंडाना व्यावसायिक यश देईल. कोणालाही कठोर बोलणे टाळा. घराकडे लक्ष द्या. एकूण व्यवसाय आणि आर्थिकदृष्ट्या उत्तम दिवस.
advertisement
4/12
कर्क - व्यय स्थानातील चंद्र क्लेशकारक आहे. आर्थिक स्थितीवर परिणाम करेल. प्रवास होतील. कौटुंबिक जीवन उत्तम आहे. गुरूचे पाठबळ व्यावसायिकदृष्ट्या लाभ देईल. प्रकृती जपून काम करा. दिवस उत्तम आहे.
advertisement
5/12
सिंह - चंद्र लाभ स्थानात आणि भाग्यात गुरू म्हणजे घरात काही विशेष कामासाठी खर्च, व्यवसायात यशस्वी होणे असा संकेत आहे. भाग्य स्थान जागृत आहे. कार्य ठरतील. खर्चाचे प्रमाण वाढले तरी काळजी नको. दिवस मध्यम...
advertisement
6/12
कन्या - नोकरी आणि शैक्षणिक क्षेत्रात नवीन संधी मिळतील. वैवाहिक सुख मिळेल. दशम चंद्र आरोग्य आणि आर्थिकदृष्ट्या मध्यम. प्रवास होतील. घरामध्ये सुधारणा होईल. शुभ दिवस.
advertisement
7/12
तूळ - शुक्र घरामध्ये नवनवीन घटना घडवून आणेल. आर्थिक खर्च भरपूर होईल. कार्य क्षेत्रात नवीन संधी मिळतील. जबाबदारी येईल. संततीकडे लक्ष द्या. वैवाहिक जीवन शुभ राहील. काही कारणाने दूर जाण्याचे योग आहेत. प्रवासात जपून रहा. दिवस चांगला.
advertisement
8/12
वृश्चिक - वृश्चिक व्यक्ती घरात गोंधळाच्या स्थितीचा सामना करतील. प्रयत्न पूर्वक शांत रहा. प्रवास योग येतील. व्यावसायिक जीवनात वादळ येऊ शकते. अष्टम चंद्र गृहसौख्य, नोकरी, आर्थिक लाभ यासाठी मध्यम फळ देईल.
advertisement
9/12
धनू - चंद्र सप्तम स्थानात उत्तम आहे. गृहसौख्य बेताचे मिळेल. गुरू महाराज संकटातून मार्ग काढतील. दिवसभर नोकरीमध्ये जास्तीचे काम देईल. जवळपासचे प्रवास योग येतील. प्रकृती ठीक राहील. दिवस मध्यम.
advertisement
10/12
मकर - षष्ठस्थानात चंद्र असल्यामुळे कौटुंबिक जीवनात बदल येईल. शैक्षणिक अर्हता प्राप्त कराल. संततीबाबत सुयोग निर्माण करेल. व्यावसायिक ताण निर्माण होतील. एकूण धावपळीत दिवस घालवाल.
advertisement
11/12
कुंभ - बुद्धिवादी कुंभ रास, आज पंचम चंद्र योगामुळे सामाजिक तणाव राहण्याचे योग आहे. प्रकृती मध्यम राहील. नातेवाईक भेट होईल. लिखाणामध्ये यश मिळेल. आर्थिक लाभ होतील. व्यवसाय-नोकरीसाठी मध्यम दिवस.
advertisement
12/12
मीन - राशी स्वामी गुरु द्वितीय आणि चतुर्थ चंद्र आहे. प्रवास योग, बंधुभेट संभवते. शुक्राच्या उपस्थितीमुळे सामाजिक जीवनात अनेक गोष्टींमुळे लाभ असा हा काळ आहे. वैवाहीक जीवनात यश मिळेल. प्रवास होतील. अध्यात्मिक अनुभव येतील. दिवस शुभ.शुभ भवतू!!
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Today Rashibhvishya: संकष्टी चतुर्थीला आज चंद्राचं मिथुन राशीत भ्रमण, असं आहे दैनिक राशीभविष्य