TRENDING:

Astrology: त्रास खूप काळ सोसला! आता या राशींचे दिवस पालटणार; वक्री ग्रहांची मिळणार साथ

Last Updated:
Horoscope In Marathi : हे राशीभविष्य प्रत्येक राशीसाठी अंदाज व्यक्त करते. वृषभ लोकांना प्रेमात स्थिरता आणि निष्ठा अपेक्षित आहे. मेष व्यक्तींमध्ये उत्कटतेची आणि रोमान्सची भावना जास्त दिसू शकते. कर्क राशीच्या लोकांना तीव्र भावनिक नातेसंबंध अपेक्षित असतील. मिथुन व्यक्तींना स्पष्ट संवादाची आवश्यकता भासेल. सिंह व्यक्तींना उत्कट सरप्रायझेसची अपेक्षा असेल, तर कन्येच्या लोकांनी विश्वासार्हता आणि विश्वासावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. तूळ राशीच्या व्यक्ती समतोल शोधतील, तर वृश्चिक परिवर्तनाच्या घटनांचा अंदाज लावू शकतील. धनू व्यक्ती साहसाची कदर करतील. मकर व्यक्ती निष्ठेवर भर देतील. मीन व्यक्ती अध्यात्मिक खोलीचा शोध घेतील तर कुंभ व्यक्ती नावीन्याला महत्त्व देतील शोधतील. (20 सप्टेंबर 2024)
advertisement
1/12
त्रास खूप काळ सोसला! आता या राशींचे दिवस पालटणार; वक्री ग्रहांची मिळणार साथ
मेष (Aries) -मेष व्यक्तींच्या प्रेम आणि रोमान्समध्ये आज वाढ झालेली दिसेल. प्रस्थापित नाती आणखी दृढ होतील, तर एकट्या व्यक्ती नवी आकर्षक नाती तयार करतील. मित्रमंडळींसोबत प्रामाणिक राहणं आणि तुमच्या अंतर्मनाचा आवाज ऐकणं यावर सध्या तुम्ही भर द्या. प्रामाणिकपणा व एकनिष्ठता यातूनच मजबूत नातेसंबंध तयार होतात. तुमच्या आर्थिक प्रगतीसाठी तुम्हाला काही अनपेक्षित संधी लाभू शकतात. तुमचं बहिर्मुख व्यक्तिमत्व तुम्हाला कामात यश मिळवण्यासाठी मदत करू शकेल. स्वतःची काळजी घेतली तर तुम्हाला आज छान वाटू शकतं.LUCKY Sign - A Red Coral StoneLUCKY Color – SilverLUCKY Number - 21
advertisement
2/12
वृषभ (Taurus) -ओरॅकलच्या भविष्यानुसार, वृषभ व्यक्तींचं रोमँटिक जीवन आज स्थिर आणि अवलंबून असेल. ज्या नात्यांमध्ये सुसंवाद असेल आणि सखोल जवळीक असेल ती आज फुलतील. तुम्ही तुमच्या मैत्रीची कदर केली पाहिजे आणि सचोटी व आत्मविश्वासाला उच्च मूल्य दिलं पाहिजे. मजबूत पाया रचून चिरंतन टिकणारी नाती जोपासली जातील. आर्थिक बाबतीत तुमच्याकडे स्थिर आणि विस्तारित बजेट असू शकतं. करिअरच्या बाबतीत पाय जमिनीवर ठेवून दीर्घकालीन उद्दिष्टांवर लक्ष द्यावे. आजचा दिवस विश्रांती घेण्यात घालवा. संतुलित जीवनशैली अंगिकारल्यानं त्याचा तुम्हाला फायदा होईल.LUCKY Sign – A Crystal JarLUCKY Color – MaroonLUCKY Number - 55
advertisement
3/12
मिथुन (Gemini) -नात्यांमध्ये स्पष्ट संवाद आणि करुणा गरजेची असते, असं भविष्य सांगतं. तुमच्या भावनांबाबत तुम्ही प्रामाणिक राहिलं पाहिजे. आज जोडीदारासोबत विश्वासाची भावना जपणं तुमच्यासाठी गरजेचं आहे. विश्वासार्ह आणि मैत्री जोपासणारे मित्र बनण्यासाठी तुम्ही अधिक प्रयत्न केले पाहिजेत. काही आर्थिक चढउतार पाहायला मिळू शकतात. व्यावसायिक प्रगतीसाठी अनुकूल राहणं आणि संधी स्वीकारणं महत्त्वाचं आहे. विचारांमध्ये स्पष्टता आणण्यासाठी तुम्ही आज सजगपणे गोष्टी केल्या पाहिजेत. लिखाण आणि एकाग्रता साधून सर्वसाधारण आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करा.LUCKY Sign – A Platinum BandLUCKY Color – MagentaLUCKY Number - 36 
advertisement
4/12
कर्क (Cancer) -आज तुमचे नातेसंबंध भावनिकदृष्ट्या समृद्ध आणि घनिष्ठ राहू शकतात. भागीदारी निर्माण करणं तुमच्यासाठी अत्यावश्यक आहे. हे संबंध दृढ करण्यासाठी, आधी आत्मविश्वास आणि निष्ठा अंगी बाणवली पाहिजे. भांडवलाबाबत निर्णय घेण्याची वेळ येते तेव्हा विवेकबुद्धी वापरून हुशारीनं निर्णय घ्यावेत. अंगी असलेल्या नैसर्गिक क्षमतेचा वापर करून तुम्ही कामात यशस्वी होऊ शकता. स्वतःची काळजी आणि मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित केल्यानं तुम्हाला फायदा होऊ शकतो. थोडी विश्रांती घ्या आणि परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी विधायक धोरणांचा वापर करा.LUCKY Sign – A SandstoneLUCKY Color – Honey BrownLUCKY Number - 16
advertisement
5/12
सिंह (Leo) -ओरॅकलच्या भविष्यवाणीनुसार, आज तुमचं रोमँटिक जीवन रोमांचक असू शकतं. काही रोमँटिक सरप्रायझेस आणि दृढ नाती आज तयार होतील. विश्वासार्ह आणि प्रेरणादायी मित्र होण्यावर आज लक्ष केंद्रित केलं पाहिजे. दीर्घकाळ टिकणारी नाती मजबूत नातेसंबंधांच्या विकासामुळे तयार होतील. आर्थिक वाढ होऊ शकते. अंगभूत नेतृत्वक्षमता तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये यशस्वी होण्यास मदत करू शकते. आत्मविश्वासाला प्राधान्य देऊन आणि सर्जनशील प्रयत्नांमध्ये भाग घेतल्यानं तुम्हाला आरोग्य चांगलं ठेवता येईल.LUCKY Sign – A Solo PerformanceLUCKY Color – VioletLUCKY Number - 27
advertisement
6/12
कन्या (Virgo) -तुमच्या रोमँटिक आयुष्यात सातत्य आणि वास्तविकता गरजेची आहे. भावनिकदृष्ट्या जमिनीवर असणं आणि स्पष्ट संवाद साधणं महत्त्वाचं आहे. तुम्ही विश्वासाला महत्त्व देता. चांगले नातेसंबंध जोडणं आणि संवादाची माध्यमं खुली ठेवणं यावर लक्ष दिलं पाहिजे. आर्थिक स्थिरता आणि प्रगतीच्या संधी तुम्हाला मिळतील. कामाच्या बाबतीत बारीक-सारीक गोष्टींकडे लक्ष देणं व मेहनत या जोरावर यश साधलं जाईल. शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेणं आज जरूरीचं आहे. संतुलन आणि शांतता साध्य होईल अशा गोष्टी आज करा.LUCKY Sign – A Silver CoinLUCKY Color – BlueLUCKY Number - 84
advertisement
7/12
तूळ (Libra) -आज तुमचं रोमँटिक जीवन संतुलित आणि सुसंवादी राहील. नाती स्वास्थ्यपूर्ण ठेवण्यासाठी संवाद आणि तडजोड ही गुरूकिल्ली आहे. मैत्रीबाबत तूळ लोकांनी निष्पक्षता आणि प्रामाणिकपणा याला महत्त्व दिलं पाहिजे. तुमच्या अंतर्मनाचा आवाज ऐकला तर खरी नाती जोडता येतील. आर्थिक बाबतीत सकारात्मक वाढ आणि स्थिरता दिसून येईल. व्यावसायिक जीवनात टीमवर्क आणि परस्पर सहकार्य यावर महत्त्व देण्याची गरज आहे. शांतता मिळवून देणाऱ्या गोष्टींवर भर दिला तर आरोग्याच्या दृष्टिकोनातून बरं वाटेल.LUCKY Sign – Diamond RingLUCKY Color – Coral PinkLUCKY Number - 18
advertisement
8/12
वृश्चिक (Scorpio) -तुमच्या रोमँटिक जीवनात आज उत्साही आणि बदलत्या अनुभवांची भर पडेल. भावनिक मोकळेपणामुळे प्रगती साध्य होईल. तुमच्या मैत्रीमध्ये विश्वास निर्माण करणं हे तुमच्यासाठी प्राधान्य असलं पाहिजे. विश्वासार्ह आणि एकनिष्ठ राहून तुमचे संबंध दृढ होतील. वृश्चिक व्यक्तींच्या आयुष्यात काही बदल घडू शकतात आणि आर्थिकदृष्ट्या समृद्धीही मिळू शकते. बदल स्वीकारणं आणि लवचिक असणं तुम्हाला तुमच्या कामात यशस्वी होण्यास मदत करेल. वृश्चिक राशीच्या लोकांनी आज मानसिक पुनर्वसन आणि चिंतनशील विचारांना प्राधान्य दिलं पाहिजे. आत्म-शोधाला चालना देणाऱ्या गोष्टींमध्ये भाग घेतल्यानं तुमच्या आरोग्याला फायदा होईल.LUCKY Sign – A Handwritten NoteLUCKY Color – PeachLUCKY Number - 41 
advertisement
9/12
धनू (Sagittarius) -आज तुम्ही रोमांचकारी आणि उत्कट रोमँटिक प्रवास अनुभवाल. तुम्ही उत्स्फूर्ततेचा स्वीकार केल्यास नाती अधिक घट्ट होतील. तुम्ही मित्रांसोबत प्रामाणिक संभाषण करण्यावर भर द्याल. तुम्ही तुमच्या अंतर्मनाचा आवाज ऐकला, तर खरी मैत्री निर्माण करणं सोपं होईल. सकारात्मक वाढ आणि अनपेक्षित आर्थिक संधी आज तुम्ही अनुभवू शकता. जीवनाकडे पाहण्याचा तुमचा सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये भरभराट होण्यास मदत करू शकतो. धनु राशीच्या व्यक्तींनी आज आपली शक्ती योग्य व्यायामाकरता खर्च करावी. योगासनं किंवा बाहेर जाऊन केलेला व्यायाम या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरेल.LUCKY Sign – Stained Glass WindowLUCKY Color – Aquamarine BlueLUCKY Number - 22
advertisement
10/12
मकर (Capricorn) -आज तुमचं रोमँटिक जीवन स्थिर आणि समर्पित असेल. नात्यांमध्ये मजबूत पाया तयार करणं आणि संपर्क वाढवणं आवश्यक आहे. तुमच्या मैत्रीमध्ये तुम्ही विश्वास आणि विश्वासार्हतेला खूप महत्त्व देता. तुमचे संवाद आज मोकळेपणा आणि प्रामाणिकपणा यामुळे अधिक उत्तम होऊ शकतात. आर्थिक सुरक्षितता आणि विस्ताराचा आनंद तुम्ही घ्याल. करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी तुम्ही कठोर परिश्रम आणि शिस्तीवर भर द्याल. आज स्वतःची काळजी घ्या आणि भावनिक सामंजस्यासाठी प्रयत्न करा. शांतता आणि विश्रांतीला प्रोत्साहन देणाऱ्या गोष्टी आज प्राधान्यानं करा.LUCKY Sign – A Peepal TreeLUCKY Color – Neon GreenLUCKY Number - 17 
advertisement
11/12
कुंभ (Aquarius) -आज तुमच्या रोमँटिक जीवनात अनपेक्षित आणि वेगळ्या घडामोडी घडतील. तुमच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वामुळे नातेसंबंध सुधारतील. मोकळ्या मनाची तुम्ही कदर केली पाहिजे आणि नात्यांवर विश्वास ठेवला पाहिजे. खरेपणानं राहणं आणि स्वीकारणं यामुळे नाती घट्ट होतील. आर्थिक बाबतीत अनपेक्षित बदल व संधी मिळतील. तुमच्या वेगळ्या विचारांमुळे करिअरमध्ये यश मिळेल. आज तुम्ही तुमच्या मानसिक आरोग्याला प्राधान्य द्याल. मनाला गुंतवून ठेवणाऱ्या आणि अभिव्यक्तीला प्रोत्साहन देणाऱ्या गोष्टी तुमचं आरोग्य सुधारतील.LUCKY Sign – An Iron BoardLUCKY Color - YellowLUCKY Number - 16
advertisement
12/12
मीन (Pisces) -तुमच्या प्रेममय जीवनात आज भावनिक संबंध आणि अध्यात्मिक खोली वाढेल. करुणा आणि सहानुभूती स्वतःमध्ये जोपासा. मैत्रीमध्ये विश्वास आणि आतल्या आवाजावर भर द्या. प्रोत्साहित करणं आणि समजूतदारपणा यामुळे तुमचे नातेसंबंध सुधारतील. नीट लक्ष देऊन काम केलं तर आर्थिक स्थैर्य आणि प्रगती साधता येईल. करिअरमध्ये तुमच्यातील उद्योगकौशल्य जोपासा. विश्रांती देणाऱ्या व मनाची शांतता मिळवून देणाऱ्या गोष्टी तुमचं आरोग्य सुधारण्यासाठी फायदेशीर ठरतील.LUCKY Sign – An Antique ArticleLUCKY Color – CreamLUCKY Number - 29
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Astrology: त्रास खूप काळ सोसला! आता या राशींचे दिवस पालटणार; वक्री ग्रहांची मिळणार साथ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल