Astrology: त्रास खूप काळ सोसला! आता उजळणार या राशींचे नशीब; लाभ स्थानातील मंगळ-शनी खुश करणार
- Published by:Ramesh Patil
- trending desk
- Written by:Pooja chandra
Last Updated:
Horoscope In Marathi : आजच्या ओरॅकल रीडिंगनुसार असं दिसतं, की सध्याच्या परिस्थितीत मेहनतीचं फळ मिळेल. तुम्ही तुमच्या ध्येयपूर्तीसाठी खूप समर्पित प्रयत्न केलेले आहेत आणि आता त्याचं फळ मिळवण्याची वेळ आली आहे. नवीन नातेसंबंध तयार होण्याची शक्यता आहे. हे रोमँटिक किंवा मैत्रिपूर्ण नातं कनेक्शन तुमच्या जीवनात आनंद आणि आशावाद आणेल. या नवीन नातेसंबंधांचं स्वागत खुल्या मनाने करणं गरजेचं आहे. भूतकाळातल्या गोष्टी विसरून नकारात्मक भावना किंवा अनुभव सोडून देण्याची गरज आहे. असं केल्यास तुम्हाला स्पष्टतेने नवीन उद्देशाच्या जाणिवेनं पुढे जाता येईल. (27 सप्टेंबर 2024)
advertisement
1/12

मेष (Aries) -आज तुम्हाला तुमच्या लव्ह लाइफमध्ये आनंद आणि सलोखा दिसेल. तुमचं नातं सकारात्मक वाटेवरून वाटचाल करत असल्याचं हे लक्षण आहे. तुम्ही आणि तुमच्या जोडीदारानं आनंद देणार्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. तुम्ही तुमच्या कारकीर्दीच्या चांगल्या टप्प्यात किंवा आर्थिक विकासाच्या टप्प्यात प्रवेश करत आहात. तुमच्याकडे यश मिळवण्याची क्षमता आहे, त्यासाठी योग्य आधार मिळवून कामावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. चांगल्या आरोग्यासाठी तुमच्याकडे लवचिकता आणि सामर्थ्य असणं आवश्यक आहे. तुम्हाला आव्हानं किंवा अडथळ्यांचा सामना करावा लागेल. या सर्व परिस्थितीवर मात करताना तुम्ही खंबीर राहून मार्गक्रमण केलं पाहिजे.LUCKY Sign - A Peacock FeatherLUCKY Color - IndigoLUCKY Number - 24
advertisement
2/12
वृषभ (Taurus) -तुम्ही नवीन नातेसंबंध जोपासण्याचा किंवा सध्याचं नातं मजबूत करण्याचा प्रयत्न कराल. यातून वाढ, प्रजनन आणि पोषण ऊर्जा दिसते. यातून असं सूचित होतं, की प्रियजनांसोबतचे तुमचे भावनिक बंध अधिक दृढ होण्याची शक्यता आहे. याशिवाय, संपत्ती आणि सुबत्तादेखील यातून सूचित होते. तुम्ही तुमच्या करिअरमध्ये आर्थिक यश अनुभवत आहात. ही ऊर्जा तुम्हाला तुमच्या खर्च करण्याच्या सवयींवर लक्ष ठेवण्यास आणि योग्य गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित करते. तुम्हाला तुमच्या जीवनात संतुलन शोधण्याची गरज भासू शकते. म्हणजेच तुम्हाला शारीरिक आणि मानसिक आरोग्याला पूरक अशी दिनचर्या स्वीकारावी लागेल. प्रवास फायदेशीर ठरेल. तुमचं नेटवर्क विस्तारण्याची संधी मिळेल.LUCKY Sign - A Rudraksha BeadLUCKY Color - PinkLUCKY Number - 2
advertisement
3/12
मिथुन (Gemini) -ओरॅकल सूचित करतं, की आज तुमच्या नातेसंबंधांत संवाद महत्त्वाचा आहे. तुम्ही खरं बोलण्याची आणि स्वतःशी व इतरांशी प्रामाणिक राहण्याची गरज आहे. आपल्या जोडीदारासह अर्थपूर्ण कनेक्शन तयार होण्याची शक्यता आहे. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला नवीन संधी आणि कल्पनांचा अनुभव मिळेल. ही ऊर्जा तुम्हाला तुमच्या खर्च करण्याच्या सवयींवर लक्ष ठेवण्यास आणि योग्य गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित करते. एखाद्या नवीन ठिकाणी भेट देणं किंवा फक्त आपल्या आजूबाजूचा परिसर एक्सप्लोअर करणं, ही चांगली कल्पना ठरू शकते. तुम्ही खाण्याच्या चांगल्या सवयी लावल्या पाहिजेत. जेणेकरून तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याला आधार मिळेल. आज जास्त रहदारी असलेल्या ठिकाणी प्रवास टाळण्याचा सल्ला तुम्हाला दिला जात आहे. त्याचं पालन केलं पाहिजे.LUCKY Sign - A MilestoneLUCKY Color - BrownLUCKY Number - 14
advertisement
4/12
कर्क (Cancer) -ओरॅकल सूचित करतं, की तुम्ही तुमच्या आयुष्यात प्रेम आणि नातेसंबंधांशी संबंधित प्रवास सुरू करत आहात. याचा अर्थ नवीन नातेसंबंध किंवा सध्याच्या नातेसंबंधांना वेगळं वळणं मिळण्याची शक्यता आहे. यातून घडामोडी आणि प्रगती दिसते. ओरॅकल तुम्हाला धीर धरण्यास, वाढ आणि बदलाच्या नैसर्गिक चक्रांवर विश्वास ठेवण्यासदेखील प्रोत्साहित करत आहे. हे भागीदारी आणि भेटवस्तू देण्यास सूचित करतं. तुमच्या सभोवतालचे मदतपूर्ण संबंध तुमच्या कल्याणासाठी फायदेशीर असू शकतात. योग्य दृष्टिकोन मिळविण्यासाठी नवीन व्यक्तींना भेटण्याची आणि नवीन अनुभवांशी कनेक्ट होण्याची संधी मिळेल.LUCKY Sign - A New WalletLUCKY Color - SilverLUCKY Number - 1
advertisement
5/12
सिंह (Leo) -तुमच्या राशीत यश आणि कर्तृत्व निदर्शनास येत आहे. यातून असं लक्षात येतं, की तुमच्या नातेसंबंधांची भरभराट होत आहे. तुम्ही तुमच्या जोडीदाराशी स्पष्टपणे आणि प्रामाणिकपणे संवाद साधू शकाल. वाढ आणि भरभराट होण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये अनपेक्षित संधी मिळतील. प्रयत्नांसोबत तुम्हाला धीर आणि चिकाटी या दोन गुणांची गरज आहे. ओरॅकल सूचित करतं, की आज केलेला प्रवास तुमच्यासाठी कामाशी संबंधित लीड्स आणू शकतो आणि त्यातून फायदा मिळवण्याची संधी देऊ शकतो. निरोगी राहण्यासाठी सातत्य पाहिजे. सुरक्षित वाटेल.LUCKY Sign - A Lucky CharmLUCKY Color - BlueLUCKY Number - 5
advertisement
6/12
कन्या (Virgo) -तुमच्या राशीसाठीचं आजचं ओरॅकल भागीदारी आणि समतोलाबद्दल माहिती देत आहे. यातून सूचित होतं, की तुम्हाला तुमच्या नातेसंबंधांमध्ये सुसंवाद आणि कनेक्शन दिसेल. वादात मध्यस्थी करण्यासाठी बोलावलं जाईल. आज प्रवास आणि घडामोडी घडण्याची शक्यता आहे. तुमच्या जुन्या गुंतवणुकीतून फायदा मिळू शकतो. तुम्हाला प्रवास करून किंवा नवीन संधी शोधून फायदा मिळवता येऊ शकतो. आयुष्यात संतुलन राखण्यासाठी तुम्हाला आत्मचिंतन आणि आत्मनिरीक्षण यावर लक्ष केंद्रित करावं लागेल. आध्यात्मिक साधना करून किंवा आध्यात्मिक साधक व गुरूंशी संपर्क साधल्यास तुम्हाला फायदा होऊ शकतो.LUCKY Sign - A Fancy LampshadeLUCKY Color - PeachLUCKY Number - 15
advertisement
7/12
तूळ (Libra) -प्रेम आणि कनेक्शनसाठी मन खुलं कराल. तुम्ही आज क्षमा, करुणा आणि आत्मप्रेमावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. तुम्ही अशा आध्यात्मिक अभ्यासाकडे आकर्षित होऊ शकता जे तुम्हाला हे गुण विकसित करण्यास मदत करतात. तुम्ही कृतज्ञता आणि विश्वास यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. तुम्हाला आर्थिक सुरक्षितता आणि तुमच्या करिअरमध्ये नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी उपचार व मार्गदर्शनाच्या शोधात असाल. याबाबत तुम्हाला आध्यात्मिक मार्गदर्शकांकडून साह्य मिळेल. त्यातून तुम्हाला अधिक सशक्त वाटेल आणि सकारात्मक बदल करण्याची प्रेरणा मिळेल. तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पाऊल ठेवून जोखीम स्वीकारली पाहिजे, जेणेकरून तुम्हाला प्रगतीची संधी मिळेल. जगाबद्दलचं कुतुहल आणि साहस तुम्हाला पुढे नेईल.LUCKY Sign - A Piece of Abstract ArtLUCKY Color - LilacLUCKY Number - 4
advertisement
8/12
वृश्चिक (Scorpio) -ओरॅकल सूचित करतं, की तुम्ही घनिष्ठ आणि आश्वासक मैत्री निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. निष्ठा आणि विश्वासाच्या मदतीने तुम्ही इतरांशी घनिष्ठ आणि अर्थपूर्ण संबंध तयार करू शकाल. तुम्हाला नवीन मार्गदर्शकाची आणि तुमचं करिअर पुढे नेण्यासाठी शिक्षणाची गरज आहे. यश मिळवण्यासाठी तुम्ही इतरांकडून नवीन गोष्टी शिकण्यास इच्छुक असलं पाहिजे. मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यासाठी तुम्ही तुमचे विचार आणि भावनांकडे लक्ष द्या. आज तुम्हाला नवीन ठिकाणी प्रवास करण्याची किंवा नवीन अनुभव मिळवण्याची संधी शोधावी लागेल.LUCKY Sign - A Floral DesignLUCKY Color - CyanLUCKY Number - 13
advertisement
9/12
धनू (Sagittarius) -प्रियजनांसोबतचे तुमचे भावनिक बंध अधिक दृढ करण्यासाठी तुम्हाला मन मोकळं ठेवावं लागेल. त्यासाठी मनामध्ये असुरक्षिततेची भावना येऊ देऊ नका. तुम्ही नावीन्यपूर्ण आणि सर्जनशील कामाकडे आकर्षित होऊ शकता. ओरॅकल सूचित करते, की यशासाठी नवीन संधी शोधण्यासाठी तुम्हाला नावीन्यपूर्ण विचार करण्याची गरज आहे. तुम्ही तुमच्या अंतःप्रेरणेवर विश्वास ठेवला पाहिजे. यातून तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवण्यास आणि आत्मजागृतीची सखोल भावना विकसित करण्यास प्रोत्साहन मिळेल. तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून नवीन गोष्टींचा स्वीकार केला पाहिजे. वैयक्तिक वाढ आणि परिवर्तनाच्या संधीसाठी तुम्हाला प्रवास करावा लागण्याची शक्यता आहे.LUCKY Sign - A Teakwood TableLUCKY Color - Saffron OrangeLUCKY Number - 27
advertisement
10/12
मकर (Capricorn) -ओरॅकल सूचित करतं, की तुम्ही नवीन रोमँटिक पार्टनरशिपसाठी तयार असाल किंवा तुमच्या सध्याच्या नात्यात अधिक कमिटमेंट मिळेल. प्रेम मिळवण्यासाठी मोकळ्या मनानं जगलं पाहिजे. युनिव्हर्स तुमच्या आयुष्यात योग्य व्यक्ती आणेल. तुमच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करा आणि स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. तुमच्या क्षेत्रातील मार्गदर्शक किंवा जाणकारांकडून मार्गदर्शन घेतल्यास फायदा होऊ शकतो. तुम्हाला कदाचित आत्मशंका किंवा असुरक्षिततेचा सामना करावा लागेल. यातून बाहेर पडण्यासाठी स्वतःवर प्रेम करायला शिका आणि स्वतःतील अद्वितीय गुणांचा स्वीकार करा. प्रिय व्यक्ती किंवा आध्यात्मिक मार्गदर्शकांकडून पाठिंबा मिळाल्यास तुम्हाला फायदा होऊ शकतो. विश्रांती आणि रिफ्रेश होण्यासाठी केलेला प्रवास तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. स्वतःच्या शारीरिक, मानसिक, भावनिक आरोग्याला प्राधान्य द्या.LUCKY Sign - A Large Coffee MugLUCKY Color - CreamLUCKY Number - 35
advertisement
11/12
कुंभ (Aquarius) -तुमच्या प्रेमसंबंधांमध्ये विश्वास आणि सुरक्षिततेच्या भावनेचा अनुभव मिळेल. रिलेशनशिप आणि प्रेमाच्या शक्तीवर विश्वास ठेवा. असं केल्यास तुमचा स्वतःवर किती विश्वास आहे, हे निदर्शनास येईल. ओरॅकल असे सूचित करतं, की तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला यश मिळेल; पण काही वेळा तुम्हाला स्वतःबद्दल शंका वाटेल किंवा स्वतःवरचा विश्वास डळमळीत होईल. तुमच्या स्वतःच्या गरजांवर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. प्रवास तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो आणि त्यामुळे तुम्हाला नवचैतन्य मिळू शकतं. हे ओरॅकल तुम्हाला तुमच्या नित्यक्रमातून विश्रांती घेण्यास आणि स्वतःवर लक्ष केंद्रित करण्यास प्रोत्साहित करतं.LUCKY Sign - A Money PlantLUCKY Color - BrownLUCKY Number - 3
advertisement
12/12
मीन (Pisces) -तुमच्या आयुष्यात प्रेम आणि रोमान्स येण्याची शक्यता आहे. ओरॅकल सूचित करतं, की तुम्ही नवीन रिलेशनशिपकडे आकर्षित होत आहात किंवा सध्याची रिलेशनशिप मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत आहात. याबाबत युनिव्हर्स तुम्हाला मार्गदर्शन करत आहे. करिअरमध्ये तुम्हाला आव्हानांशी सामना करावा लागेल. त्यावर मात करण्यासाठी आणि यश मिळवण्यासाठी तुम्हाला पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. अडथळ्यांवर मात करण्यासाठी तुम्ही तुमच्यातील सामर्थाच्या वापर केला पाहिजे. तुम्हाला कदाचित एखाद्या कठीण परिस्थितीला तोंड द्यावं लागेल. त्यावर मात करण्यासाठी ताकद आणि लवचिकता तुमच्याकडे आहे. तुम्हाला काही धाडसी गोष्टींचा अनुभव घेण्यासाठी वेळ मिळेल. तुमच्यासाठी प्रवास फायदेशीर ठरू शकतो. त्यातून नवीन गोष्टी शिकण्याची आणि नवीन दृष्टिकोन मिळवण्याची संधी मिळेल.LUCKY Sign - A Creeping VineLUCKY Color - Dark GreyLUCKY Number - 50
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Astrology: त्रास खूप काळ सोसला! आता उजळणार या राशींचे नशीब; लाभ स्थानातील मंगळ-शनी खुश करणार