Weekly Horoscope: धनू, मकर, कुंभ, मीन राशींचे साप्ताहिक राशीफळ; कष्टाचे अखेर मनासारखे फळ, धनलाभ
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Weekly Horoscope Marathi: या आठवड्यात मकर राशीमध्ये अनेक शुभ राजयोगांची मालिका तयार होत आहे, ज्यामुळे ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून हा काळ अत्यंत शक्तिशाली मानला जात आहे. मकर राशीमध्ये शुक्रादित्य, बुधादित्य, लक्ष्मी नारायण आणि चतुर्ग्रही राजयोग आधीच अस्तित्वात आहेत. धनू, मकर, कुंभ, मीन राशींचे साप्ताहिक राशीफळ जाणून घेऊया.
advertisement
1/6

धनू - धनू राशीच्या लोकांसाठी जानेवारीचा हा आठवडा खूप फायदेशीर ठरणार आहे. या राशीचा स्वामी गुरु ग्रह सध्या बुध ग्रहाच्या राशीत विराजमान आहे. नोकरी आणि व्यवसायात कार्यरत असलेल्या लोकांना त्यांच्या कष्टाचे मनासारखे फळ मिळाल्याने मोठा आनंद मिळेल. मात्र, व्यापारी वर्गाला या आठवड्यात अधिक मेहनत करावी लागू शकते. व्यावसायिकांनी मालाची उधारी देणे टाळावे, अन्यथा नुकसान सोसावे लागेल.
advertisement
2/6
धनू - तुमची प्रदीर्घ काळ रखडलेली कामे आता वेगाने पूर्ण होतील आणि विविध वादांतून तुमची सुटका होईल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ शुभ असून त्यांना अभ्यासाबाबत चांगली बातमी मिळू शकते. अचानक झालेला धनलाभ तुमचा आनंद द्विगुणित करेल.
advertisement
3/6
मकर - मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चढ-उतारांचा राहील. या आठवड्यात तुमची आर्थिक स्थिती थोडी नाजूक राहू शकते; गरजेपेक्षा जास्त खर्च झाल्यामुळे कर्ज घेण्याची वेळ येऊ शकते. नोकरी किंवा व्यवसायात मन एकाग्र न झाल्यामुळे कामाचा वेग मंदावेल, ज्यामुळे काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. घरगुती कामांच्या वाढत्या व्यापामुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासावरून लक्ष विचलित होऊ शकते. वाढती थंडी आणि प्रदूषणामुळे आरोग्याच्या समस्या जाणवू शकतात, त्यामुळे काळजी घ्या. कोणत्याही प्रकारचे वादविवाद टाळा, अन्यथा कायदेशीर कचाट्यात किंवा कोर्ट-कचेरीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता आहे.
advertisement
4/6
कुंभ - कुंभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा नोकरीच्या ठिकाणी थोडा सावधगिरीने वागण्याचा आहे. तुमच्या राशीवर शनिच्या साडेसातीचा प्रभाव असल्याने मानसिक अस्वस्थता जाणवू शकते. ऑफिसमध्ये वरिष्ठांशी किंवा सहकाऱ्यांशी कोणत्याही प्रकारची वाद घालणे टाळा. मन चंचल राहिल्यामुळे काही काळ चिंता वाटू शकते, पण घाबरून जाण्याचे कारण नाही; फक्त नकारात्मक विचारांना स्वतःवर स्वार होऊ देऊ नका. या आठवड्यात आपल्या वाणीवर म्हणजेच बोलण्यावर संयम ठेवा. तुमच्या चुकीच्या शब्दामुळे नवीन वाद निर्माण होऊ शकतात, त्यामुळे जिथे गरज आहे तिथेच बोलणे हिताचे ठरेल.
advertisement
5/6
मीन राशीच्या लोकांसाठी जानेवारीचा हा आठवडा संमिश्र फळांचा असेल. तुमच्या राशीवर साडेसातीचा प्रभाव सुरू असल्याने काही कामांत अडथळे येऊ शकतात, मात्र काही रखडलेली महत्त्वाची कामे आता गती घेऊ लागल्यामुळे तुम्हाला दिलासा मिळेल. हवामानातील बदलांमुळे स्वतःच्या आणि कुटुंबाच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. तुमची ओढ धार्मिक कार्यांकडे वाढेल, ज्यामुळे मनाला शांती मिळेल. रागावर नियंत्रण ठेवा आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहा.
advertisement
6/6
मीन - या आठवड्यात वायफळ खर्च वाढल्यामुळे तुमची चिंता वाढू शकते, त्यामुळे खर्चावर वेळीच लगाम लावा. जोडीदारासोबतचे तुमचे संबंध चांगले राहतील, तरीही कामाच्या व्यापामुळे मनावर थोडा ताण राहण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Weekly Horoscope: धनू, मकर, कुंभ, मीन राशींचे साप्ताहिक राशीफळ; कष्टाचे अखेर मनासारखे फळ, धनलाभ