पेट्रोल-डिझेल गाड्या विकून टाका, घ्या 4 लाखांपर्यंतच्या EV कार; सरकारकडून 15 टक्के सूट अन् टोलमाफ!
- Published by:sachin Salve
Last Updated:
महायुती सरकारने प्रदुषणाला आळा घालण्यासाठी महाराष्ट्रात २०३० पर्यंत हे धोरण मंजूर केलं आहे. त्यामुळे कोणतंही इलेक्ट्रिक वाहनं खरेदी केलं तर राज्यात १५ टक्के मुळ किंमतीवर डिस्काउंट मिळणार आहे.
advertisement
1/9

महाराष्ट्रामध्ये नव्याने इलेक्ट्रीक वाहन धोरण, २०२५ मंजूर झालं आहे. महायुती सरकारने प्रदुषणाला आळा घालण्यासाठी महाराष्ट्रात २०३० पर्यंत हे धोरण मंजूर केलं आहे. त्यामुळे कोणतंही इलेक्ट्रिक वाहनं खरेदी केलं तर राज्यात १५ टक्के मुळ किंमतीवर डिस्काउंट मिळणार आहे. एवढंच नाहीतर राज्यातील प्रमुख महामार्गवर टोलही माफ असणार आहे. त्यामुळे काही स्वस्त अशा एसयूव्ही आहे, ज्या पेट्रोल आणि सीएनजी कारपेक्षाही स्वस्त आहे.
advertisement
2/9
MG Windsor EV: MG मोटर्सची सध्या मार्केटमध्ये धुमाकूळ घालणारी ही MG Windsor EV सगळ्यात दमदार अशी फॅमिली कार ठरली आहे. एमजी विंडसर ईव्हीची एक्स शोरूम किंमत 9.99 लाख रुपयांपासून सुरू होते. यात 38kWh एलएफपी बॅटरी पॅक आहे. फुल चार्ज केल्यावर ही कार 331 किलोमीटरची रेंज देते.
advertisement
3/9
ही कार 136hp पॉवर आणि 200Nm टॉर्क जनरेट करते. MG मोटर Windsor EV सह अनेक चार्जिंग ऑप्शन देखील ऑफर करतेय. यात 3.3 kW चे CCS2 कनेक्शन आहे, ज्याला बॅटरी चार्ज करण्यासाठी 13.8 तास लागतात. याव्यतिरिक्त, 7.4 kW आणि 50 kW चार्जिंग ऑप्शन देखील उपलब्ध आहेत, जे अनुक्रमे 6.5 तास आणि 55 मिनिटांत बॅटरी चार्ज करू शकतात. एमजी मोटर्सने या कारमध्ये लाईफ टाइम बॅटरी वॉरंटी दिली आहे.
advertisement
4/9
टाटा पंच ईव्हीची एक्स-शोरूम किंमत मॉडेलनुसार 9.99 लाख रुपयांपासून 14.29 लाख रुपयांपर्यंत आहे. या कारमध्ये दोन बॅटरी पॅक्स देण्यात आले आहेत. ते पॅक्स एकदा चार्ज केल्यानंतर मिळणारी रेंज अनुक्रमे 315 किलोमीटर्स आणि 421 किलोमीटर्स एवढी आहे. टाटा पंच ईव्ही ही दैनंदिन वापरासाठी एक उत्तम एसयूव्ही कार आहे. या कारमध्ये 10.25 इंच आकाराची इन्फोटेन्मेंट सिस्टीम, एअर प्युरिफायर, तसंच सनरूफ देण्यात आलं आहे. सेफ्टीसाठी या कारला 6 एअरबॅग्ज देण्यात आल्या आहेत.
advertisement
5/9
फ्रेंच कार उत्पादक कंपनी citroen ने भारतात citroen eC3 नावाचं स्वस्त कार लाँच केली आहे. या कारमध्ये २९.२ kwh ची बॅटरी दिली आहे. सिंगल चार्जमध्ये ही कार 246 किमी रेंज देतेय. कंपनीने दावा केला आहे की या कारची बॅटरी फक्त ५७ मिनिटांमध्ये ८० टक्के चार्ज होईल. या कारमध्ये डुअल एअरबॅग्य, पार्किंग सेंसर, ABS फिचर्स दिले आहे.
advertisement
6/9
Tata Tiago EV ही एक बेस्ट ऑप्शन आहे. या कारची किंमत 8.57 लाख रुपये आहे. या वाहनाच्या 3.3kW XT MR व्हेरिएंटची किंमत 9.61 लाख रुपये आहे. तर Tiago EV च्या 3.3 KW XT LR व्हेरिएंट सुद्धा उपलब्ध आहे. टाटाच्या सगळ्या गाड्यांना ५ स्टार सेफ्टी रेटिंग मिळालेले आहे.
advertisement
7/9
MG Comet EV- MG मोटर भारतात आपली इलेक्ट्रिक कार परवडणारी बनवण्यासाठी बॅटरी-एस-ए-सर्व्हिस (BaaS) प्रोग्राम चालवतेय. ज्या अंतर्गत कॉमेट ईव्ही 4.99 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध आहे. MG Comet EV ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 4.99 रुपये आहे. 2.5 रुपये प्रति किलोमीटर बॅटरी भाडे म्हणून द्यावे लागेल. MG Cometची रचना अतिशय मजबूत आहे आणि ती एक मिनी कार आहे जी खूपच आकर्षक दिसते. GSEV (ग्लोबल स्मार्ट इलेक्ट्रिक व्हेईकल) प्लॅटफॉर्मवर बेस्ड, MG Comet EV ही दोन-डोर असलेली टॉल-बॉय हॅचबॅक आहे जी 4 सीट्स देते.
advertisement
8/9
महाराष्ट्र वाहन धोरण २०२५ चा कसा होईल फायदा? या धोरणानुसार, सर्व इलेक्ट्रिक वाहनांना मोटार वाहन करातून तसेच नोंदणी प्रमाणपत्राच्या किंवा नुतनीकरण शुल्कातून माफी देण्यात आली आहे. इलेक्ट्रिक दुचाकी, तीन चाकी, चारचाकी (परिवहनेत्तर), राज्य परिवहन उपक्रमाच्या बसेस (M3,M4) तसेच खासगी, राज्य/शहरी परिवहन उपक्रमांतील बसेस यासाठी मूळ किंमतीच्या १० टक्के सवलत दिली जाणार आहे. तर इलेक्ट्रिक तीनचाकी मालवाहू वाहने, चारचाकी (परिवहन -M1), चारचाकी हलके मालवाहू वाहन, चारचाकी मालवाहू वाहने (एन २, एन ३) तसेच शेतीसाठीचे इलेट्रिक ट्रॅक्टर व एकत्रित कापणी यंत्र वाहनांसाठी मूळ किमतीच्या १५ टक्के सवलत दिली जाणार आहे.
advertisement
9/9
टोल माफ - या धोरणांतर्गत मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग, अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग (समृद्धी महामार्ग) यावर प्रवास करणाऱ्या सर्व चारचाकी प्रवासी इलेक्ट्रिक वाहनांना व बसेसना पथकर पूर्ण माफ करण्यात येणार आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील अन्य राज्य व राष्ट्रीय महामार्गावर चारचाकी इलेक्ट्रिक वाहनांना पथकरात पन्नास टक्के इतकी सवलत देण्यात येईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
पेट्रोल-डिझेल गाड्या विकून टाका, घ्या 4 लाखांपर्यंतच्या EV कार; सरकारकडून 15 टक्के सूट अन् टोलमाफ!