TRENDING:

Ola चा झाला गेम, ही स्कुटर ठरली नंबर 1; किंमत आणि फिचर्स कारपेक्षा कमी नाही!

Last Updated:
मार्केटमध्ये अनेक दमदार अशा इलेक्ट्रिक स्कुटर लाँच झाल्या आहेत. त्यामुळे चांगलीच स्पर्धा वाढली आहे. पण, या स्पर्धेत एप्रिल महिन्यात TVS मोटर्सने बाजी मारली आहे.
advertisement
1/8
Ola चा झाला गेम, ही स्कुटर ठरली नंबर 1; किंमत आणि फिचर्स कारपेक्षा कमी नाही!
वाढत्या इंधनाच्या दरामुळे सध्या इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. त्यामुळे आता मार्केटमध्ये अनेक दमदार अशा इलेक्ट्रिक स्कुटर लाँच झाल्या आहेत. त्यामुळे चांगलीच स्पर्धा वाढली आहे. पण, या स्पर्धेत एप्रिल महिन्यात TVS मोटर्सने बाजी मारली आहे. TVS ची iqube ही एप्रिल महिन्यात बेस्ट सेलिंग स्कुटर ठरली आहे.  
advertisement
2/8
एप्रिलमध्ये TVS कंपनीने पहिल्यांदाच धडाकेबाज कामगिरी केली आहे.  गेल्या महिन्यात ९१,७९१ युनिट्सची जबरदस्त विक्री झाली. जी वार्षिक (YoY) ४०% जास्त आहे. एप्रिल २०२५ च्या आकडेवारीने एप्रिल २०२३ मधील ६६,८७८ युनिट्सचा मागील विक्रम मोडला. हे सर्व विक्रीचे आकडे वाहन डेटाबेसवर आधारित आहेत. एप्रिल २०२५ मध्ये टीव्हीएसच्या विक्रमी विक्रीत टीव्हीएस मोटरने अव्वल स्थान पटकावले आहे. 
advertisement
3/8
तर, TVS ने ओला इलेक्ट्रिकला फक्त २७ युनिट्सने मागं टाकलं. कंपनीने १९,७३६ युनिट्सची विक्री केली. ३० एप्रिल रोजी अक्षय्य तृतीयेला १,५३४ युनिट्सची वाढ झाली. सुमारे २२% बाजार हिस्सा असलेल्या, टीव्हीएसने कोणत्याही दुचाकी ईव्ही कंपनीने एका दिवसात सर्वाधिक विक्री नोंदवली.
advertisement
4/8
TVS ची  iQube ही सध्या मार्केटमध्ये धुमाकूळ घालत आहे. या स्कुटरमध्ये इलेक्ट्रिक २.२kWh बॅटरी  आहे.  TVS iQube इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत ८९,९९९ रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते.
advertisement
5/8
एकदा पूर्ण चार्ज केल्यावर ७५ किमी चालते. तर ०-८०% चार्जिंग वेळ २ तास ४५ मिनिटे आहे. ही स्कुटरसाठी तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे - पर्ल व्हाइट, वॉलनट ब्राउन आणि टायटॅनियम ग्रे ग्लॉसी.
advertisement
6/8
TVS iQube ची विक्री iQube, iQube S आणि iQube ST या तीन वेगवेगळ्या व्हेरिएंटमध्ये केली जात आहे. त्याच्या टॉप मॉडेलमध्ये, कंपनीने 3.4 kWh क्षमतेचा न काढता येण्याजोगा बॅटरी पॅक दिलाय. कंपनीच्या दाव्यानुसार, पूर्ण चार्ज केल्यावर ते 145 किलोमीटरची रेंज देते. माहितीनुसार, हा बॅटरी पॅक बदलण्याची किंमत 56,000 ते 70,000 रुपये आहे. कंपनी बॅटरीवर 3 वर्षे किंवा 50,000 किलोमीटरची वॉरंटी देते. यानंतर जर बॅटरी खराब झाली तर त्याचा संपूर्ण खर्च तुम्हाला सहन करावा लागेल.
advertisement
7/8
ओलाची घसरण एप्रिल २०२४ मध्ये ओला इलेक्ट्रिकचा बाजार हिस्सा ५२% होता, जो आता २१% पर्यंत कमी झाला आहे. वाद आणि डीलरशिपच्या खराब अनुभवामुळे नाराज असलेले ग्राहक ओला इलेक्ट्रिकपासून दूर गेले आहेत.
advertisement
8/8
तर तिसऱ्या क्रमांकावर बजाज ऑटो आहे. जी एप्रिलमध्ये तिसऱ्या स्थानावर घसरली. चेतकच्या १९,००१ युनिट्सची विक्री केली आणि वर्षानुवर्षे १५१% वाढ नोंदवली. एप्रिलच्या शेवटच्या दिवशी वाहनाने, बजाज ऑटोने १,२५८ इलेक्ट्रिक स्कूटर विकल्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
Ola चा झाला गेम, ही स्कुटर ठरली नंबर 1; किंमत आणि फिचर्स कारपेक्षा कमी नाही!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल