TRENDING:

दुचाकीला इन्शुरन्स नसेल तर दंड किती लागतो? गाडी खरेदी करताना अजिबात टाळू नका विमा

Last Updated:
Bike Insurance: सध्याच्या काळात जवळपास प्रत्येकाच्या घरात दुचाकी आहे. तुम्हीही नवी गाडी घेत असाल तर इन्शुरन्सकडे दुर्लक्ष करु नका.
advertisement
1/5
दुचाकीला इन्शुरन्स नसेल तर दंड किती लागतो?गाडी खरेदी करताना अजिबात टाळू नका विमा
दुचाकी वापरणाऱ्यांची संख्या ही झपाट्याने वाढतेय. दुचाकी वाढताय तशाच दुचाकी चोरीच्या घटनांमध्येही वाढ झालीये. पुणे शहरात वर्षभरात 2 हजार दुचाकींची चोरी झाल्याची माहिती आहे. दरम्यान बाईक इन्शुरन्स काढणाऱ्यांचे प्रमाणही वाढलेय.
advertisement
2/5
ग्राहकांच्या फायद्याची बातमी आहे. कारण आयआरडीएायद्वारे कार इन्शुरन्सच्या नियमांमध्ये देखील बदल करण्यात आले आहेत. तुम्ही गाडी कशा पद्धतीने चालवता आणि किती नियम पाळतात यावर तुमच्या कार इन्शुरन्सचा प्रीमियम ठरवला जाईल. तसंच तुमच्या घरात एकापेक्षा जास्त गाड्या असल्यास, सर्वच गाड्यांना एकच इन्शरन्स लागू होईल. बाईक असो किंवा कार, यांना वेगळ्या इन्शुरन्सची गरज भासणार नाही.
advertisement
3/5
आता गाडीचं इन्शुरन्स काढलेलं नसेल तर गाडी चालवणं गुन्हा होतो का? याचं उत्तर म्हणजे मोटर व्हेईकल्स कायदा 1998 नुसार, कार इन्शुरन्स पॉलिसीशिवाय वाहन चालवणे कायद्याच्या विरोधामध्ये आहे. भारतामध्ये थर्ड पार्टी लायबिलिटी इन्शुरन्स हा मॅडेट असतो अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
advertisement
4/5
दरम्यान पुणे शहरात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढलेय. 2023 या वर्षामध्ये 1 हजार 945 दुचाकी चोरी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यामधील 527 दुचाकी पोलिसांनी शोधल्या आहेत. तर उर्वरित दुचाकींचा शोध अद्याप सुरुच आहे.
advertisement
5/5
इन्शुरन्स नसेल तर कितीचा दंड? : मोटर व्हेईकल कायद्यानुसार रस्त्यांवर चालवण्यात येणाऱ्या सर्व वाहनांसाठी वाहन इन्शुरन्स असणे अनिवार्य असणार आहे. पॉलिसीधारकाकडे न चुकता मूलभूत थर्ड पार्टी इन्शुरन्स असणं गरजेचं आहे. यासोबतच वाहनाची मालकी असलेल्यांनी स्वतःकडे इन्शुरन्ससंबंधित डॉक्यूमेंट जवळ बाळगायला हवं. पॉलिसी डॉक्यूमेंट नसेल तर व्यक्तीकडून दोन हजारांपर्यंत दंड आकारला जातो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
दुचाकीला इन्शुरन्स नसेल तर दंड किती लागतो? गाडी खरेदी करताना अजिबात टाळू नका विमा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल