Car च्या डॅशबोर्डमध्ये हा लाईट लागला तर लगेच थांबा, 99 टक्के लोकांना माहित नाही नेमका अर्थ!
- Published by:sachin Salve
Last Updated:
कारमध्ये काही बिघाड झाला तर नेमकं काय घडलं, हे बेसिक तरी आपल्याला कळलं पाहिजे. तुमच्या स्टेअरिंगच्या समोर असलेल्या डॅशबोर्डमध्ये बरेच असे संकेत असतात ते 99 टक्के लोकांना माहित नाही.
advertisement
1/6

आपल्याकडे एक चांगली कार असावी असं प्रत्येक जणांचं स्वप्न असतं. काही जण हे स्वप्न सत्यातही उतरवतात. पण कार घेतल्यानंतर काही तांत्रिक गोष्टी माहित असणे गरजेचं आहे. कारण, कारमध्ये काही बिघाड झाला तर नेमकं काय घडलं, हे बेसिक तरी आपल्याला कळलं पाहिजे. तुमच्या स्टेअरिंगच्या समोर असलेल्या डॅशबोर्डमध्ये बरेच असे संकेत असतात ते 99 टक्के लोकांना माहित नाही.
advertisement
2/6
Car LED Light: जर तुमच्या कारच्या डॅशबोर्डमध्ये एलईडी लाईट चमकताना दिसत असेल तर लगेच कार थांबवून बाजूला घ्या. मॅकेनिकला बोलावून घ्या आणि सर्व्हिस करून घ्या.
advertisement
3/6
Battery Warning - बॅटरी वॉर्निंगचा लाईट जर चमकत असेल तर याचा अर्थ बॅटरीमधील चार्जिंगबद्दल काही तरी बिघाड झाला आहे. त्यामुळे कार कधीही बंद होऊ शकते, सोबत इतरही इलेक्ट्रिक सिस्टमवर याचा प्रभाव पडू शकतो.
advertisement
4/6
Braking System -ब्रेक सिस्टम वार्निंग लाईटचा अर्थ ब्रेक फ्लूड कमी आहे, ब्रेक्समध्ये काही तरी समस्या निर्माण झाली आहे. ब्रेक सिस्टमबद्दल काही अलर्ट आला असेल तो धोक्याचा असू शकतो. त्यामुळे लगेच गॅरेजला गाडी घेऊन जा.
advertisement
5/6
इंजिन तापमान वार्निंग लाइट (Engine Temperature Warning Light) याचा अर्थ असा होता की, इंजिन हे प्रचंड गरम झालं आहे. कारच्या कुलिंग सिस्टमध्ये ओव्हरहिटिंगचे संकेत देत आहे. त्यामुळे कार लगेच गॅरेजला नेण्याची गरज आहे.
advertisement
6/6
ऑयल प्रेशर वार्निंग लाइट (Oil Pressure Warning Light) - जर डॅशबोर्डमध्ये अचानक Oil Pressure Warning Light लागला असेल तर इंजिनमध्ये ऑईलचा दबाव बरोबर नाही. इंजिनमध्ये ऑईल कमी झालं असेल तर इंजिनचं मोठं नुकसान होऊ शकतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
Car च्या डॅशबोर्डमध्ये हा लाईट लागला तर लगेच थांबा, 99 टक्के लोकांना माहित नाही नेमका अर्थ!