Car Tips: 10 रुपयांच्या पाण्याच्या बाटलीमुळे कारमध्ये लागू शकते आग, 'हे' आहे खरं कारण!
- Published by:sachin Salve
Last Updated:
पाण्यामुळे आग लागू शकते असं तुम्हाला कुणी सांगितलं तर विश्वास बसणार नाही. पण कारमध्ये हे प्रकार वारंवार घडत आहे.
advertisement
1/6

पाण्यामुळे आग लागू शकते असं तुम्हाला कुणी सांगितलं तर विश्वास बसणार नाही. पण कारमध्ये हे प्रकार वारंवार घडत आहे. पाण्याची एक बाटली तुमची लाख मोलाची कार जाळून कोळसा करू शकते. आता असा विचार जरी केला तरी हे लवकर कुणाला पटणार नाही. पण सध्या उन्हाळ्याचे दिवस आहे. त्यामुळे पाण्याची पारदर्शक बाटली ही सूर्याच्या किरणामुळे कारमध्ये आग लावू शकते. जर तुमच्या कारमध्ये ज्वलनशील पदार्थ जसे परफ्युमची बाटली असेल आणि तर आग लागण्याची शक्यता असते.
advertisement
2/6
लेंस इफेक्ट (Magnifying Effect): जर पाण्याची बाटली ही पारदर्शक आहे, साहजिक ती जर पाण्याचे भरली असेल तर सुर्याच्या किरणांना ती एक लेंस सारखी काम करते. जेव्हा सूर्याची किरण या बाटलीवर पडतील तेव्हा त्यातून जो प्रकाश बाहेर पडेल त्यामुळे कारमधील असलेल्या परफ्युम, कापड, सीट, पेपर, प्लास्टिक यांच्या संपर्कात आला तर तापमान वाढून कारमध्ये आग लागू शकते.
advertisement
3/6
पाण्याची बाटलीची कशी काळजी घ्यावी? - पाण्याची बाटली जर कारमध्ये ठेवणार असाल तर सर्वात आधी ती सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येणार नाही, अशा ठिकाणी ठेवावी. पाण्याची बाटली ही कधीही समोरील काचेच्या खाली ठेवू नका. ज्यामुळे आग लागण्याची जास्त शक्यता असते.
advertisement
4/6
पाण्याची बाटली ही नेहमी एखद्या कापडामध्ये गुंढाळून ठेवावी किंवा पेपरमध्ये झाकून ठेवावी.
advertisement
5/6
कारमध्ये पाण्याची बाटली ही सीट किंवा डॅशबोर्डवर न ठेवता डोअरला असलेल्या होल्डरमध्ये ठेवावी, कारण त्या ठिकाणी सूर्यप्रकाश पोहोचू शकत नाही.
advertisement
6/6
कार कधीही उन्हामध्ये उभी करू नका, कारला नेहमी सावली जिथे असेल अशाच ठिकाणी उभी करावी. जर ओपन कार पार्किंग असेल तर अशा ठिकाणी कारला झाकून ठेवावं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
Car Tips: 10 रुपयांच्या पाण्याच्या बाटलीमुळे कारमध्ये लागू शकते आग, 'हे' आहे खरं कारण!