रिअल रेंज टेस्टमध्ये MG windsor EV चं सत्य आलं समोर, फुल चार्जमध्ये इतकीच किमी धावली कार!
- Published by:sachin Salve
Last Updated:
या कारमध्ये दिलेला स्पेस आणि फिचर्समुळे अल्पवधीत या कारने अख्खं मार्केट गाजवलं. त्यानंतर आता एमजी मोटर्सने windsor EV प्रो मॉडेल लाँच केलं.
advertisement
1/8

JSW MG Motor ने भारतात windsor EV कार लाँच केली. सुरुवातील या कारच्या वेगळ्या लूकमुळे फारशी चर्चा झाली नाही. पण या कारमध्ये दिलेला स्पेस आणि फिचर्समुळे अल्पवधीत या कारने अख्खं मार्केट गाजवलं. त्यानंतर आता एमजी मोटर्सने windsor EV प्रो मॉडेल लाँच केलं. आधीच्या कारमध्ये ज्या कमतरता होत्या त्या सगळ्या पूर्ण केल्या. कारमध्ये मिळणार स्पेस, कम्फर्ट आणि बॅटरीची रेंज ही या कारची जमेची बाजू आहे. पण या कारची रेंजची ऑन रोड चाचणी घेण्यात आली, तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली.
advertisement
2/8
MG मोटर्सने विंडसर EV स्टँडर्डमध्ये दिलेल्या बॅटरीनुसार रेंज ३३२ किमी असेल असा दावा केला होता. पण जेव्हा प्रत्यक्षात रस्त्यावर चाचणी केली तेव्हा धक्कादायक निकाल समोर आला आहे. विंडसर ईव्ही पूर्ण चार्ज केल्यानंतर फक्त 308 किमी धावली. कंपनीने दिलेल्या रेंजपेक्षा २४ किमी कमी धावली.
advertisement
3/8
विंडसर EV प्रोची रेंज रिअल ड्रायव्हिंगमध्ये ९९ टक्के बॅटरी संपल्यावर ३७५ किमी धावते. पण कंपनीने केलेल्या दाव्यापेक्षा ती जवळपास ७० किमी कमी आहे. याच टेस्ट दरम्यान कारचा एसी सुरू होता. पण काही रिपोर्टनुसार, ही कार ४०० किमी रेंज देऊ शकते.
advertisement
4/8
दरम्यान, Windsor Pro मध्ये Level 2 ADAS, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम, 6 एअरबॅग्स, टायर प्रेशर मॉनिटरिंग, हिल-होल्ड असिस्ट, 360-डिग्री कॅमेरा आणि ESC सारखे फिचर्स दिले आहे. या कारमध्ये 52.9kWh LF बॅटरी पॅक दिला आहे. संपूर्ण चार्ज केल्यावर ही कार 449 किलोमीटर इतकी रेंज देते. नवीन Windsor PRO मध्ये G-Jio इनोव्हेटिव्ह कनेक्टिव्हिटी प्लॅटफॉर्मचं अपग्रेड दिलं आहे. यामध्ये 100+ AI-पावर्ड व्हॉईस कमांड्स आणि रिअल-टाइम नेव्हिगेशन दिलं आहे.
advertisement
5/8
सुरुवाती मॉडेल BaaS (Battery-as-a-Service) किंमत 12.49 लाख + 4.5/किमी इतकी आहे. तर एक्स-शोरूम किंमत 17,49,800 इतकी आहे. बुकिंगसाठी फक्त 8,000 युनिट्स उपलब्ध करण्यात आले होते, पण अवघ्या काही तासांमध्ये ही बुकिंग फुल झाली.
advertisement
6/8
फिचर्स : 52.9 kWh च्या बॅटरीसह 449 किमी रेंज दिली आहे. सुरक्षेसाठी 12 प्रमुख ADAS Level-2 फिचर्स जसे ट्रॅफिक जाम असिस्ट, ऑटोमेटिक इमर्जन्सी ब्रेकिंग आणि फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग दिलं आहे. तसंच पावर्ड टेलगेट, रिक्लाइन होणारे 135 डिग्री एरो लाउंज सीट्स आमि 15.6” टच डिस्प्ले दिला आहे.
advertisement
7/8
JSW MG Motor India आणि Dream11 ने आर्थिकदृष्या एकत्र येऊन Battery-as-a-Service योजना आणली आहे. कंपनीने पहिला मालकाला लाइफटाइम बॅटरी वारंटी आणि 3 वर्षांमध्ये 60% बायबॅक ऑफर दिली आहे.
advertisement
8/8
Windsor Pro EV ची किंमत १७.४९ लाख रुपये ठेवण्यात आली. या कारची बॅटरी-ए-सर्व्हिस (BSA ) प्रोग्रामचा पर्याय निवडला तर Windsor Pro EV ची किंमत 12.49 लाख रुपयांपासून सुरू होते. यामध्ये बॅटरीचा पर्याय वगळण्यात आला आहे. ही एक बेस्ट बिझनेस क्लास अशी कार आहे. या नव्या Windsor Pro EV मध्ये सेफ्टी फिचर्स दिले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
रिअल रेंज टेस्टमध्ये MG windsor EV चं सत्य आलं समोर, फुल चार्जमध्ये इतकीच किमी धावली कार!